क्षण एक शांत नाही
उमजेल का जीवाला
नव्हते आपुले कधीच काही...
कल्लोळ चाललाहे
मज मुक्तताच नाही
मायेस का पुरावा
देताच येत नाही....
मज मुक्तताच नाही
मायेस का पुरावा
देताच येत नाही....
कल्लोळ अंतरीचा
सांगू कुणा कुणाला
जगतास कान नाही
मम आर्त व्यर्थ जाई
सांगू कुणा कुणाला
जगतास कान नाही
मम आर्त व्यर्थ जाई
कल्लोळ शांतवाया
येगा आता विठाई
लावून वेड जीवा
हाकेस ओ ही नाही....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा