गेल्या दोन महिन्यांत तर घरच्या स्त्रियानां कामावरून सक्तीची सुट्टी घ्यावी लागली होती आणि घरातल्या कामांचा रगाडा,घराबाहेरच्या स्त्रियांच्या हाती सोपवायला लागला होता.... सुरुवातीला काही गोष्टी अश्विनने ऍडजस्ट करून घेतल्या, पण जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसा तो हक्काच्या बायकोकडून आणि जन्मदात्या आईकडून मिळालेल्या आयतेपणाची अपेक्षा या कामासाठी रुजू करून घेतलेल्या व्यक्तींकडून करू लागला होता....
घरातल्या कामात चुकूनही काही कसूर झाला, तर अश्विनच्या बोलण्याची सवय त्यांना पडून गेली होती.... कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.... आणि एवढ्या कारणावरून घर मोडण्याइतक्या त्या दोघींही असमंजस नव्हत्या.... त्यामुळे दिवसामागून दिवस असेच चालले होते..... पण घरकामासाठी आलेल्या बाई म्हणजे 'काम के बदले दाम' अशाच वागणाऱ्या असतात. सोबतच अश्विनचा या अतिपरिपूर्णतेच्या सवयीमुळे त्याला न पटणाऱ्या कामांबद्दल कुणी बाहेरची व्यक्ती का बरं ऐकून घेईल,ही चिंता शताब्दीला होतीच..... आणि त्यादिवशी, ज्याची भीती होती तेच झालं....
अनायासे रविवारची सुट्टी आली होती.... आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच ठरवून त्याने सकाळी सकाळी आलेल्या सुंदराबाईंना जाब विचारायला सुरुवात केली.....
"काकू.... काय हो,आजकाल लक्ष नाही तुमचं कामात.... दोन महिने झाले कामावर येऊन,कधी भाजीत तिखट जास्त,कधी वरणात मीठंच नाही,आणि पोळ्या तर तुमच्या अशा सुंदर असतात.... प्रत्येक घासाला दात राहतोय की जातोय हा प्रश्न पडतो..... तुमच्या घरी पण तुम्ही एवढ्या जाड पोळ्या करता की इथे काम उरकायचं असतं म्हणून...."
"नाय रे बाळा,तसं कायबी नाय.... आसं कसं करीन म्या.... आरे,बाईजन्म म्हंजी शंबर इचार,शंबर वझी घेऊन चालावा लागतुयं.... होतंय कधीतरी जास्त कमती.... आरे काम हुरकायचं म्हून करायचं आसतं,तर रोजंच काईबाई करून ठिवलं आसतं....."
"तुम्ही मला तुमची रडगाणी गाऊन दाखवू नका.... पैसे चोख मोजून घेता ना,मग तशी कामं करा.... मी माझ्या आई आणि बायकोला चुकीबद्दल सोडत नाही.... तुम्ही बाहेरच्या म्हणून फक्त बोललो.... पुढल्या वेळी चूक करताना दहा वेळा विचार करा...." इति अश्विन....
"आरं त्यासनी बी नको बोलत जाऊ उगा कामावरनं.... चुका परत्येकाकडून होत्यात.... आन् त्या तुज्याच घरासाठी खपत्यात न्हवं..... तुज्या खुशीत त्यांची खुशी हाये.... कामधंदा करून,घर दार,पोरंसोरं बगुन दिसभर, घर नीट ऱ्हावं म्हून सवताच्या आवडी मागं टाकून नवरा,पोरं,बाप,सासू,सासऱ्यांचा इचार करीत बसत्यात..... घरच्या लक्ष्मी आन् अन्नपूर्णेला बोल लावू नये बाळा....." पोळ्या करता करता सुंदराबाई अश्विनला समजावू पाहत होत्या....
"काकू,मी तुम्हाला स्वयंपाकाचे पैसे देतो,कीर्तन सांगायचे नव्हेत....." एवढं बोलून अश्विनने धाडकन् स्वयंपाकघराच्या दरवाजा आपटला आणि बेडरूममध्ये येऊन लॅपटॉपवर काही काम घेऊन बसला..... आपलं म्हणणं न ऐकता,आपल्यालाच शहाणपणा शिकवण्याचा आगाऊपणा ही सुंदराबाई कशी करू शकते याचा विचार करत असतानाच मंजुळा आल्याची चाहूल अश्विनला लागली.... एरव्ही कुणाचंही विनाकारण तत्वज्ञान ऐकून न घेणारा अश्विन सुंदरा काकूंसमोर आवरत्या शब्दांत बोलला,याचं कारण म्हणजे एक तर त्या वयाने मोठ्या होत्या,आणि समजावणुकीच्या सुरात बोलत होत्या.... पण मंजुळाचं आज काही खरं नव्हतं... ती वयाने लहान आणि बोलण्यात फटाकडी होती.... कोणाच्याही "आरे" ला "कारे" केल्याशिवाय ती गप्प बसत नसे.... आणि ही गोष्ट शताब्दीला ऐकिवात होती.....
अश्विन तिला जाब विचारायला जाणार इतक्यात नवऱ्याच्या हितास्तव तिने अश्विनला समजावण्याचा प्रयत्न केला....
"अश्विन.... अरे सुंदरा काकूंना बोललास ते बोललास,पण हिला आज नको.... तुझा बीपी उगाच शूट होतो.... आधी मी एकदा बोलते तिच्याशी,आणि मग नाहीच काही फरक पडला तर तू बोल मग सरळ.... प्लिज एक ना माझं...."
रागाच्या निखाऱ्यावर हलकेच पाणी शिंपडावं तसं शताब्दीच्या शब्दांनी अश्विनचा राग काहीसा निवळला.... आणि....
पुढच्या पाचव्या क्षणाला कॉफीचा मग फुटल्याचा आवाज आला....

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा