Login

लेखिका कामिनी खाने : प्रगल्भ लिखाणाकडे वाटचाल

ईरा : शब्दांचा झरा

निरागस बालपण संपत आणि शालेय जीवनाकडे आगेकूच सुरु होते. बालपणात तासनतास खेळात मन रमलेले असते त्यामुळे आईवडिल आणि शिक्षकांचे सतत अभ्यासासाठी बोलणे खावे लागते.यातूनही कांही छंद मनाला आनंद देत असतात अशावेळी नकळत मन तिकडे ओढले जाते.मनात प्रचंड उर्जा असते.मिळेल त्या क्षणाचा वापर करुन अनेक अडचणीना सामोरे जात मनाला विरंगुळा देणारे छंद जोपासले जातात यातूनच अनेक कलाकार , लेखक , लेखिका अशा सर्व क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती निर्माण होतात.लहाणपणी योग्य गुणांची पारख करुन चालना दिल्यास हरहुन्नरी व्यक्ती तयार होतात अशाच लहाणपणापासून लेखनाच्या छंदाला मनापासून जपणा-या कामिनी खाने या उदयोन्मुख लेखिका आहेत.

सध्या शालेचे शिक्षणात व्यस्त असणा-या कामिनीजी लेखनाचा बाज तितक्याच समर्थनपणे पेलत आहेत.वाचनाची आवड त्यातूनच त्यांना लिहण्याचा छंद लागला आहे.या छंदामुळे त्यांना ईरा व्यासपीठाची ओळख झाली.अफाट निरिक्षणक्षमता व नाविन्याची आवड यामुळे त्यांचे लेखन दर्जेदार आहे.विविध विषय हाताळण्याची त्यांची कला सुरेख आहे.नात तुझं माझं , त्याच्या जबाबदा-या गृहीतच , मी कशाला आरशात पाहू गं , आरोग्यगम् धनसंपदा , प्रेमाची गोष्ट , समाजाचं देणं , मैत्रगंध , घन व्याकूळ , ओढ मिठीची , प्रतिक्षा प्रेमवर्षावाची , तु गं दुर्गा , चराचरात तू , ग्रंथ हेच गुरु , गंधखुणा , गोष्ट एका वृद्धाश्रमाची अशा अनेक कथांनी ईरावर वाचकांना आकर्षित केले आहे.ओघवती भाषाशैली , संवादाची रेलचेल , अभ्यासपूर्ण लेखन , विषयांचे वेगळेपण , वाचकांचा आदर यामुळे कामिनीजी यांचे लेखन सर्वांना भावते.त्यांच्यातील उत्साह नवलेखकांंना प्रेरणादायक आहे.ईराच्या चॕम्पियन ट्राॕफी , राज्यस्तरीय स्पर्धा , जलद लेखन अशा अनेक स्पर्धेत भाग घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांची ही प्रभावी कामगीरी दर्जेदार लेखिका असल्याचे सुचित करते.

आदयुक्त बोलणे , मैत्रीचे बंध जोडणे , सातत्यपूर्ण लिहणे यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व उठावदार वाटते.त्यांची लिहण्याची कला अशीच वृद्धीगंत व्हावी , शैक्षणिक यश मिळावे यासाठी त्यांना खूपसा-या शुभेच्छा व आशीर्वाद ...!!