Login

काना मागून आली( भाग १)

काना मागून आली भाग 1
तेजल बुलेट घेऊन भाजी मार्केट मधून सुसाट जाते. तीच्या बुलेटचा आवाज ऐकून सगळेच मागे वळून पाहतात. त्याच भाजी मार्केटमध्ये आक्का साहेब आणि त्यांची मुलगी मयुरी देखील भाजी घेण्यासाठी आलेल्या असतात .  गाडी चालवताना बघू मयुरी बोलते . आई ती मुलगी बसलेली ना ती दादाची बुलेट होती.
" गप ग तू, दादाची बुलेट एक मुलगी कशाला चालवेल".
' किती हा गाडीचा वेग' मुलगी असून बुलेट चालवते.
ही मुलगी ज्या घरची सून होईल त्या घराचं शंभर टक्के  वाटोळ होणार.
मयुरी आई काहीही बोलू नको , बुलेट चालवणाऱ्या मुली घर सांभाळू शकत नाही तसं तुला कोण बोललं.
आक्कासाहेब अगं एवढी सुसाट बुलेट चालवणारी मुलगी कशावरून घर चालवेल .
अशी मुलगी माझ्या घरात आली तर मी तिला सून म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही.
बोलता बोलता आक्कासाहेब व मयुरी दोघी घरी पोहोचतात.
घरी आल्यानंतर आक्का साहेबांच्या दोन्ही सुना ममता आणि रागिनी त्यांच्या हातातील सामान घेण्यासाठी पुढे येतात रागिनी लगेच त्यांना पाणी आणून देते.
आक्का साहेबांच्या पुढे त्यांच्या सुनांच काही चालत नसत.  घरातील प्रत्येक काम त्या चोख पार पाडत.
घरातील सर्व रितीरिवाज ,परंपरा , घर बांधून ठेवण्याचे काम मयुरी आणि रागिनीने अगदी व्यवस्थित पार पाडलेले होते.
तेवढ्यात समोरून सोहम येतो. सोहमला पाहून आक्कासाहेब बोलतात. सोहम हे बघ गुरुजींनी तुझ्यासाठी काही मुलींचे फोटो पाठवले आहेत कोणती मुलगी तुला आवडते ते फक्त सांग.
"सोहम बोलतो आई मला आत्ताच लग्न नाही करायचं".
अक्कासाहेब आताच लग्न नाही करायच म्हणजे ? आता तुझं वय झालेल आहे.
सोहमला तेजल आवडत होती पण हे तो आईला सांगू शकत नव्हता. कारण तेजलचा स्वभाव अतिशय बेधडक होता. तिला स्वयंपाक येत नसला तरी बाहेरच्या जगामध्ये कोणतेही काम ते अतिशय ठामपणे करू शकत होती.
आक्कासाहेब  बोलतात" अरे कुठे हरवलास सोहम". मी काय म्हणते याच्यामधली तुला कोणती मुलगी आवडली ते सांग .
माझ्या दोन्ही सुना खूप छान आणि सुसंस्कृत आहेत. आणि तुझी बायको देखील मला या दोघींच्या सारखीच हवी आहे.
सोहम बोलतो आई मला आत्ताच लग्न नाही करायचे. मला एक अर्जंट काम आहे मी जातो असे बोलून सोहम घरातून बाहेर पडतो.

लगेच तो तेजला  भेटण्यासाठी जातो.

तेजला  भेटल्यानंतर तो बोलतो आईने मला मुली बघण्यासाठी सुरुवात केलेली आहेआणि आईला कशी सुन पाहिजे या बद्दलची सर्व मत तिला सांगतो.
तेजल सोहमला बोलते तुझ्या आईचे मत जे असेल ते असू देत .
तुझं मत काय आहे ते मला सांग?
काय करायचं आपण तू तुझ्या घरी सांगणार आहेस आपल्या नात्याबद्दल की आपण दोघांनीही पळून लग्न करायचं.
सोहम तेजाला आपण पळून जाऊ लग्न करू असा पर्याय सांगतो. दोघेही दोन-तीन दिवसांनी  एका मंदिरामध्ये लग्न करतात.
तेजल आणि सोहम दोघेही घराच्या उंबरठ्याजवळ येऊन उभे राहतात. त्या दोघांना बघून मयुरी आक्कासाहेब , ममता आणि रागिनी धावतच दरवाज्याजवळ येतात .सोहमला आणि तेजला बघून  सगळ्यांनाच धक्का बसतो.