Login

काना मागून आली ( भाग २)

काना मागून आली
"आक्कासाहेब बोलतात दोघांनाही  तिथेच थांबा".
"सोहम तू या मुलीला घेऊन आपल्या घरात येऊ शकत नाही कोणाच्या परवानगीने तू हे लग्न केलेस".
आक्का साहेबांचा रागाचा पारा पाहून दादासाहेब  आक्का साहेबांना बोलतात हे बघ पार्वती आत्ता आपण त्या दोघांनाही घरात घेऊ .जे काही असेल ते आपण नंतर सविस्तर बोलू. आता आपण घरात नाही घेतले तर आपली बाहेर खूप इज्जत जाईल.
मयुरी त्या दोघांचही औक्षण करते .तेजल घराचं माप ओलांडून घरामध्ये प्रवेश करते.
दुसऱ्या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवली जाते . सोहम तेजला बोलतो लवकर रेडी होवून खाली ये. आज आपल्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा आहे.
हो हो येते....
तेजला साडी नेसता येत नाही त्यामुळे ती ड्रेस घालूनच खाली येते, ड्रेस घातलेला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आठ्या पडतात अगं पूजेच्या दिवशी कोणी ड्रेस घालून येता का आक्कासाहेब म्हणतात .
तेजल बोलते हो पण मला साडी नेसताच येत नाही म्हणून मी ड्रेस घातला.
  आक्कासाहेब मोठ्या  सुनेला सांगतात. सुनबाई जावा यांना साडी नेसून या. थोडेसे दागिने गळ्यात घाला आणि खाली पूजेला आणा.
पूजा व्यवस्थितपणे पार पडते.
दुसऱ्या दिवशी सकाळी तेजल निवांत उठून खाली येते.
आक्कासाहेब तिला किचनमध्ये सर्वांसाठी ब्रेकफास्ट बनवण्यासाठी सांगतात.
तेजल विचारते काय बनवू सर्वांसाठी ?
आक्कासाहेब बोलतात तूप घालून गोडाचा शिरा बनव.
गोडाचा शिरा कसा करायचा हे तेजला माहितीच नव्हते. तीने गोडाचा शिरा खाल्लेला असतो पण कधीही तो बनवलेला नसतो. पण तरी ती घरातल्यांचा मान ठेवण्यासाठी किचन मध्ये गोडाचा शिरा बनवण्यासाठी जाते.
मोबाईल मध्ये बघून ते शिरा बनवायला जाते परंतु तिला शिरा बनवता येत नाही शिरा अत्यंत चिकट आणि कमी गोड झालेला असतो ती प्लेटमध्ये सर्वांना शिरासाठी देते तिचा बनवलेला शिरा खाऊ सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो.
आक्कासाहेब धाकट्या सुनेला दुसरा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी सांगतात आणि सोहमला बोलतात कुठून शोधून हा दगड गळ्यामध्ये बांधलायस काय माहिती हिला कोणताचं काम येत नाही काय बघून  प्रेमात पडलास हिच्या?
सोहम काहीच उत्तर न  देता ऑफिसला निघून जातो.
तेजलला घरातलं कोणताच काम येत असल्यामुळे ती कोणाच्याच पसंती मध्ये उतरत नाही तिला पाहिलं की सगळ्यांच्याच कपाळावरती आट्या यायला सुरुवात होते. तेजल जरी बेधडकअसली तरीही ती घरामध्ये कोणालाही उलट उत्तर देत नव्हती.
  स्वयंपाकाचं राहू दे अग पण तुला घरातील देवाची देवपूजेची तयारी तरी करता येईल ना?
तेजल हो बोलते.
उद्यापासून तू पूजेचे सर्व तयारी करायची .
आक्कासाहेब बोलतात बागेमध्ये जाऊन बागेतून पूजेसाठी फुले तोडून आण.
तेजल बागेमध्ये जाते पण पूजेसाठी नक्की कोणत्या प्रकारची फुले लागतात हे काही तिला माहिती नव्हते. बागेत इतक्या प्रकारची  फुले होती यातली नक्की कोणती फुले पूजेसाठी लागतात या विचाराने ती गोंधळून जाते.
तितक्यात तिथे मयुरी येते व तिला पूजेसाठी लागणारी फुले तोडण्यासाठी मदत करते.

क्रमशः

🎭 Series Post

View all