Login

काना मागून आली (भाग ५)

काला मागून आली
देवाचे दर्शन घेऊन आता दोघी घरी येतात . ममता आक्का साहेबांना लिंबू सरबत करून घेऊन येते.
आक्कासाहेब बोलतात उद्या गुढीपाडवा आहे तर सर्वांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत पुरणपोळीचा सर्व नैवेद्य तयार करू गुढी उभारण्यासाठी सर्वांनी अंगणात या.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नऊ वाजेपर्यंत तयार होईल अंगणात येतात .
ममता देखील तयार होऊन खाली येते.
ममता घरातली मोठी सून असल्यामुळे गुढीपाडव्याची पूजा ही दरवर्षी ममताच्याच हातून होत असे.
परंतु यावर्षी मात्र अक्कासाहेब ममताला सांगतात ममता यावर्षी नवीन सुनेच्या हातून गुढीची पूजा होईल हे ऐकल्यानंतर ममताला खूप राग येतो ती रागातच मागे जाते.
परंतु तेजल मात्र खाली येत नाही म्हणून अक्कासाहेब   तेजलला बोलवण्यासाठी सोहमला वरती पाठवतात.
तेजल अजून अंथरुणात झोपलेली असते हे पाहून सोहम तिला उठवतो व तयार होण्यासाठी सांगतो.
तेजलला तयारी करून येण्यासाठी एक तास जातो.
ममता बोलते काय हो भाऊजी एवढा वेळ का लागलाय ? काय करते आहे तेजल वरती?
मुहूर्त निघून जातोय त्याच्यापेक्षा मीच गुढीची पूजा केली असती तर ती वेळेवर तरी झाली असती.
अक्कासाहेब बोलतात एकदा सांगितलं ना गुडीची पूजा ह्या वर्षी नवीन सुनेच्याच  हातून होणार मग कोणीही आवाज चालवायचा नाही......
सोहम बोलतो वहिनी येईलच ती खाली.
तेजल मस्त काष्टासाडी नेसून खाली येते हे बघून अक्का साहेबांना खूप आनंद होतो. दोन्ही सूना तेजलकडे डोळे वटारून पाहू लागतात. ही साडी नेसायला शिकली तरी कधी हा प्रश्न दोघींनाही पडतो?
तेजल आणि सोहम गुढीची पूजा करतात.
तेजलला ममता विचारते अगं तुला तर साडी नेसता येत नाही मग ही काष्टासाडी तुला नेसवली कोणी.
तेजल बोलते नाही कोणी नेसवली नाही ही मी माझ्यासाठी काष्टासाडी शिवून घेतली.
गुढी उभारून झाल्यानंतर सर्वजण हसत आनंदने जेवण करतात.
आक्कासाहेब तेजाला जवळ बोलतात व गुढीपाडव्यासाठी तिला एक सोन्याचा हार भेट म्हणून देतात.
तेजल बोलते सासुबाईंनी मला एवढा छान सोन्याचा हार भेट म्हणून दिला तर माझ्याकडूनही सर्वांसाठी ट्रीट म्हणून मी आता लगेच पाच मिनिटात तुमच्या सर्वांसाठी आईस्क्रीम घेऊन येते.
तेजल काष्टा साडीतच घराबाहेर जाते अंगणात उभ्या असलेल्या बुलेट वरती बसते डोळ्यांना गॉगल लावते आणि सुसाट बुलेट घेऊन गेटमधून बाहेर जाते.
सर्वांसाठी आईस्क्रीम घेऊन ती पाच मिनिटात घरी येते.
सर्वजण आईस्क्रीम हसत आनंदात खातात.
तेजल बोलते सासुबाई कस वाटलं आईस्क्रीम.
सासुबाई बोलतात ..आईस्क्रीम छान आहे, पण आज पासून तुम्ही तिघींनी मला सासूबाई न म्हणता आई असाच आवाज द्यायचा.
सुरुवातीला तेजलचे वागणे घरात कोणालाही आवडत नव्हते परंतु हळूहळू तेजल सर्वांना आवडू लागली ... काना मागून  आलेली सून सर्वांच्या पसंती उतरू लागली.
समाप्त.


🎭 Series Post

View all