Login

कानामागून आली अन तिखट झाली... भाग -२

पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण
जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय- कानामागून आली अन तिखट झाली
भाग -२

'समझनेवाले को इशारा काफी होता है'
राजूने हे म्हटले खरे पण त्यानीही ते द्व्यर्थीच म्हटले होते.

रेवा या घरात मागूनच तर आली होती. सासू सासरे नवरा सगळ्यांना गुंडाळून ठेवून स्वतःचाच डांगोरा मिरवत होती. सगळ्यांवर वरचढ झाली होती. 'हम करे सो कायदा'
घरात याच नियमाने तिचे वागणे होते.

पण उघडपणे राजू म्हणाला,
"मी तुला कुठे काही म्हटले मी त्या पाश्चिमात्य संस्कृती विषयी बोलतोय."
आपली संस्कृती ही नाही गं. भारतीय कुटुंब व्यवस्था म्हणजे गोकुळ एका छताखाली चार चार पिढ्या अगदी हसत खेळत गुण्या गोविंदाने नांदत.
'फोडा व राज्य करा' या नीतीचा अवलंब करूनच त्यांनी भारतावर राज्य केले. स्वतःची संस्कृती त्यांनी भारतीयांच्या गळी उतरवली.

त्यांना माहिती होते यांची कुटुंब व्यवस्था एवढी मजबूत आहे की यांना फोडल्याशिवाय आपण राज्य करू शकणार नाही.
आम्ही कमी पडलो त्यांची नीती समजून घेण्यात .आम्ही आमच्या संस्कृतीला,परंपरांना सहज तिलांजली दिली आणि त्या भोगवादी संस्कृतीच्या आहारी गेलो.
ते गेले तरी त्यांची संस्कृती येथे ठेवून गेले हेच खरे दुर्दैव.
या जोखडाला जेव्हा आपण दूर लोटू त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होवू.
पण आम्ही आधुनिकतेचा बुरखा पांघरून सहज त्या संस्कृतीला आपलेसे केले.
'एकाची हो चार घरं खाणाऱ्याचं हो भलं'
ही आपली म्हण त्यांनी चरितार्थ केली.
त्यांना व्यापार पैसा या गोष्टीशी मतलब.
एकाची चार घर झाली. वस्तूंची मागणी वाढली. विक्री वाढली. आम्ही विदेशी कंपन्यांच्याच घशात घालतोय आमचा पैसा.
भारतीय संस्कृतीच्या मुळावर घाव घालून त्यांनी सर्वप्रथम कुटुंब व्यवस्था उध्वस्त केली. आज एकत्र कुटुंब, जिथे तीन चार पिढ्या एकत्र नांदत ते जवळजवळ इतिहास जमा झालेत. विभक्त कुटुंब त्यातही हम दो हमारे दो करत करत आता हम दो हमारा एकच कुठे कुठे तर तेही नको.
कुटुंबाचा आकार लहान लहान होत गेला.
याचा परिणाम घरातील छोट्या बालकांवर झाला.
घरातील आजोबा आजी नातवांना संस्कारक्षम गोष्टी सांगायचे. त्यांची जडणघडण व्हायची.
आज अनापसनाप पैसे भरून तथाकथित चांगल्या म्हणजे महागड्या शाळेत टाकले की मुलं संस्कारीत होतात हा भ्रम आणि त्यांना सर्व सुखसोयी पुरवल्या की आपली जबाबदारी संपली.ही पाश्चिमात्य जीवनशैली आम्हाला जवळची वाटली.
ज्या वयात मुलांना आई-वडिलांचा आजी-आजोबांचा सहवास हवासा वाटतो त्याच वयात ती एकटी पडतात मग ती मोबाईल टीव्ही आदी मीडियाच्या नादी लागतात.
जगण्याच्या बदलत्या संकल्पना, घरातील अबोल झालेल्या संवादामुळे कुटुंब संस्था मोडकळीस येते आहे.

कुटुंब संस्था संस्काराचं पहिलं विद्यापीठ. कुटुंब मिळूनच समाज बनतो. सुदृढ समाजासाठी सुदृढ कुटुंब व्यवस्था हा पाया आहे.
या असल्या घाणेरड्या संस्कार देणाऱ्या सिरीयल मुळे
कौटुंबिक ,सामाजिक ,नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतोय.
भावी पिढीच्या भविष्यावर परिणाम होतोय.
आपण त्यांना पंगु तर बनवत नाही आहोत ना या गोष्टीचा विचार व्हायला हवा.
भावी पिढी वेगळ्याच गोष्टीत भविष्य शोधु पाहत आहे.
त्यांच्या संकल्पना आणखी एक पाऊल पुढेच आहेत.
हे असेच सुरू राहिले तर येणारे भविष्य आम्हाला माफ करणार नाही.
ते किती घातक आहे ते पुढील भागात बघुयात.
क्रमशः
भाग -३मधे
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all