जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय- कानामागून आली अन तिखट झाली
भाग -३अंतिम
विषय- कानामागून आली अन तिखट झाली
भाग -३अंतिम
"रेवा, आई वडील म्हणून आम्ही कुठे कमी पडतो आहोत का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पिढ्यान् पिढ्या सहजगत्या होणारे संस्काराचे संक्रमणावर आम्ही आमच्या आधुनिक जीवनशैलीच्या अट्टाहासापायी त्याला बांध घातला.
आपल्या परंपरा आणि संस्कारांना तिलांजली देऊन आम्ही वाटचाल करायला तर निघालोय पण समोर काय वाढून ठेवलेय याचा विचार आम्ही केलाच नाही .
आपल्या परंपरा आणि संस्कारांना तिलांजली देऊन आम्ही वाटचाल करायला तर निघालोय पण समोर काय वाढून ठेवलेय याचा विचार आम्ही केलाच नाही .
ही आधुनिक जीवनशैली आत्मसात करताना आम्ही आत्मघात तर करत नाही आहोत ना...
याचा विचार करण्याची हीच वेळ आहे रेवा.
मुलांचं सोनेरी बालपण त्यांचं भावविश्व आपण नासवतोय का?
याचा विचार करण्याची हीच वेळ आहे रेवा.
मुलांचं सोनेरी बालपण त्यांचं भावविश्व आपण नासवतोय का?
विभक्त कुटुंब पद्धती, आपण दोघेही आपापल्या कामात व्यस्त, मुलांना पुरेसा वेळ देऊ न शकणे, मग त्यांना खुश ठेवण्यासाठी केलेले त्यांचे फाजील लाड या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे मुले भरकटत आहेत. एकलकोंडी होत आहेत. हट्टी होत आहेत.
फार काही बोलायला गेलो तर टोकाचा मार्ग अवलंबत आहेत. अशामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.
आपण त्यांच्यावर अतिविश्वास करतो. कधी चुकीचं वाटलं तरी बोलण्याची हिंमत आपल्या ठिकाणी नसते. आज मुलांना मोबाईल आदी माध्यमं सहज उपलब्ध आहेत. ते त्यावर काय बघतात यावर आपलं नियंत्रण राहत नाही.
"रेवा परिस्थिती हाता बाहेर जाण्या अगोदर पालक म्हणून आपल्याला सजग व्हावे लागेल, सावध व्हावं लागेल.
आपण कोणाला दोष देण्या अगोदर उद्या मुलं आपल्यालाच दोष देतील.
आपण कोणाला दोष देण्या अगोदर उद्या मुलं आपल्यालाच दोष देतील.
तेव्हा सर्वप्रथम मुलांशी सुसंवाद साधायचा असेल तर या असल्या सिरीयल बघणे बंद कर . त्यांना चांगलं काय वाईट काय याची समज द्यावी लागेल. नकार पचवण्याची शक्ती त्यांच्या ठिकाणी निर्माण करावी लागेल.
आई बाबांना इथे बोलावून घेऊ तेच संस्काराचं खरं विद्यापीठ आहे.
आता जर आपण त्यांचं बोट पकडून सुयोग्य मार्ग दाखविला तर भविष्यात ते न भरकटता आपला योग्य मार्ग निवडतील यात शंका नसावी.
मजबूत आधार, निर्व्याज प्रेम, अतूट विश्वासाची शिदोरी घेऊन भविष्याचा प्रवास ते आत्मविश्वासाने करतील.
त्यांच्या उज्वल भविष्यातच आपला आनंद ,आपलं सुख समाधान दडलेलं असेल.
या भोगवादी संस्कृतीत नाही.
या भोगवादी संस्कृतीत नाही.
आपला आनंदी संसार पाहून आई बाबाही आनंदी होतील गं.
या वयात त्यांना दुसरं काय हवं.
या वयात त्यांना दुसरं काय हवं.
रेवा अंतर्मुख झाली.
तिनेच टिव्ही बंद करत मोबाईल हाती घेतला. सासू सासऱ्यांना फोन करण्यासाठी.
तिनेच टिव्ही बंद करत मोबाईल हाती घेतला. सासू सासऱ्यांना फोन करण्यासाठी.
आईबाबाही अत्यानंदाने 'हो'म्हणाले.
राजूला आनंद कसा व्यक्त करावा कळतच नव्हते.
त्याने मुलांना हृदयाशी कवटाळले.
आता संस्कार पिढ्यान् पिढ्या संक्रमित होतील.यात शंका उरली नव्हती.
समाप्त
©®शरयू महाजन
त्याने मुलांना हृदयाशी कवटाळले.
आता संस्कार पिढ्यान् पिढ्या संक्रमित होतील.यात शंका उरली नव्हती.
समाप्त
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा