Login

Kanamagun Ali Ani Tikhat Zali Part - 3 अंतिम

Jalad Lekhan Kanamagun Ali Ani Tikhat Zali Part - 3
"एका हाताने टाळी वाजत नाही भाग - 3 अंतिम

मागच्या भागात आपण पाहिले मंदाताईची चिडचिड खुप वाढली होती. त्यांना वाटायला लागले आता आपल्याला घरात काही किंमत नाही. पुढे

त्यामुळेच कुटुंबापासून दुरावत होत्या. मुकुंदराव त्यांना पदोपदी समजावून सांगत.आपण वेगळे राहूया असा प्रस्ताव एकदा मुकुंदरावांनी मंदाताईंच्या समोर मांडून पाहिला.त्यालाही मंदाताईंचा नकार. लोक काय म्हणतील?

मुकुंदराव मंदाताईंच्या कलेने घेत त्यांना समजावत. "मंदा, तू अजूनही सर्वांसाठी तितकीच महत्त्वाची आहेस. तुझं महत्त्व स्वयंपाकघरात आणि कष्ट करण्यात नाही, तर आजी म्हणून तूच कुटुंबाचा मोठा आधार आहेस."

​पण मुकुंदरावांचे समजावून सांगणे आणि मेधाची शांत,अनाक्रमक वृत्ती मंदाताईंच्या मनावर नकळत परिणाम करत होती.

आजकाल त्या दिवसभर स्वतःच्या कोपऱ्यात जपमाळ घेऊन बसत, पण त्यांचे कान मात्र मेधाने चिन्मयला कशी शिकवण दिली किंवा महेश मेधावर किती विसंबून असतो, यावरच असायचे.


​मात्र आजची संध्याकाळ जरा वेगळीच, चैतन्यमय झाली. आज चैतन्य शाळेतून आल्यावर धावतच मंदाताईंच्या खोलीत गेला. त्याच्या डोळ्यात काळजी होती.

तो म्हणाला, "आजी, आज तू भाजी केली होतीस का, बटाट्याची तिखट तिखट? मेधाआईला आवडते बघ ती?"

"नाही रे, मी नाही केली. मी तर स्वयंपाकघरात जास्त जातच नाही."
"मग मेधा आई कशी म्हणाली, 'मंदा आजीची भाजी!' मला ती खूप आवडली. घरी येऊन पाहिले तर भाजी संपली. मला अजून हवी आहे.

आई म्हणते, 'थांब, आता मी ऑर्डर करते.'" मंदाताईंना क्षणभर काय बोलावे हे कळेना. लगेच त्या म्हणाल्या,​"काय बाहेरून ऑर्डर करते ही साधी बटाट्याची भाजी! ती माझ्या नातवासाठी.

आलेच मी तिला सांगायला.काय, तुझ्या त्या पोळ्या कर, मी करते भाजी.थोडी थिडकी नाही, एक किलोची! तुझ्या बाबाला नाहीतर आबाला सांग, बटाटे नसतील घरात तर घेऊन या.आजीची ऑर्डर आहे म्हणावं!"

आपल्या कामाची प्रशंसा 'सासूबाईंची रेसिपी' म्हणून मेधाने केलेली, नातवाच्या तोंडून ऐकून मंदाताई अचंबित झाल्या. मेधाने हेतूपुरस्सर आपली जागा घेतली नाही, तर आपल्याला मान देऊन आपल्या कामाची कदर केली, हे त्यांच्या लक्षात आले.

'खरंच, आपण किती मूर्ख आहोत!' मंदाताईंच्या आवाजातील कटुता विरघळली होती.

​"आजी, तुला सांगू? आईनं तुला सकाळी विचारले होते,'आई, आज कोणती भाजी करू?' पण तू म्हणालीस, 'तुमचे तुम्ही ठरवा.' म्हणून तिनं म्हणे तिच्या सासूबाईंच्या स्टाइलने ती भाजी केली," चिन्मय हसत हसत म्हणाला.

"लब्बाड आहात तुम्ही सगळे," म्हणत त्या खळखळून हसल्या.

त्यांचे डोळे पाणावले 'माझे श्रेय कोणी हिरावून घेत नाहीये, तर माझा वारसा पुढे घेऊन जात आहे,' ही जाणीव त्यांना झाली.कामाचा पाढा वाचण्यात जेवढी ऊर्जा खर्च केली, त्यापेक्षा जास्त समाधान त्या एका क्षणात त्यांना मिळाले.

त्यांनी चिन्मयला जवळ घेतले. मंद स्वरात म्हटले,"बाहेरची ऑर्डर नको बेटा.तू शांत बस.आज स्वयंपाकघर माझ्या ताब्यात. पांडुरंगाने आता खऱ्या समाधानाची बुद्धी दिली आहे." आणि स्वयंपाकघराकडे जाताना मंदाताईंच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी एक निखळ, समाधानी हास्य उमटले.

"किती दिवस आपण या क्षणाची वाट पाहत होतो. जे आपल्याला शक्य झाले नाही, ते नातवाला बरोबर जमले," म्हणून मुकुंदरावांनी चैतन्यला जवळ घेतले.

"तर सासूबाई, येऊ का मदतीला? की मीच आज रात्रीला कोणती भाजी करू ते सांगाल?" स्वयंपाकघरात डोकावत मेधा म्हणाली.

"तू माझी जपमाळ ओढत देवघरात बस," म्हणत मंदाताईंनी मेधाला कोपरखळी मारली आणि एकच हशा पिकला. यामध्ये महेश देखील सामील झाला.
समाप्त
0

🎭 Series Post

View all