विषय - कौटुंबीक कथामालिका
शीर्षक - कंगोरे भावनांचे
भाग - 9....."आठवण येत असेल ना आईची? बरं, तू मला आई म्हणत जा. आणि ह्यांना बाबा. आम्हीही तुझे आईवडीलच आहोत नां, आज ह्यांच्याशी बोलते. तुला घरीपण जायचे आहे नां, आता घरी जाऊनच बोल मनसोक्त आईवडीलांशी."
मनोमन प्रियु हरखून गेली.
भाग - 10
बाबा घरी आल्यावर आई त्यांच्याशी बोलली. मग ते अर्जुनशी बराच वेळ हळू आवाजात काहीतरी बोलत होते. नंतर त्यांनी आईला बोलावून घेतले. तिच्याशीही काहीतरी दोघेही बोलत होते. मग प्रियुला आईने बाहेर बोलावले.
"प्रियु बेटा आता तयारी करुन ठेव. उद्या सकाळी बाबा आणि अर्जुन येतील तुझ्या सोबत माहेरी तुला सोडायला."
हरखून जाऊन प्रियुने तयारी केली.
सकाळीच प्रियु ऊठली. आंघोळ आटोपून जायच्या तयारीनिशी हातात सुटकेस घेऊन बाहेर आली. बाबा आणि अर्जुन तयार होऊन नाश्ता करत होते. तिच्या हातात भली मोठी सुटकेस बघून, अर्जुन चपापलाच आणि तिला म्हणाला,
"म्हणजे तू कायमची जाणार आहेस?"
"काय...."प्रियु त्याच्याकडे बघतच राहीली.
"अरे काय रे तू, अगं प्रियु गंमत करतोय तो...
अरे मुलींचं भरपूर सामान असतं. छोट्या बॅगेत मावत नाही. म्हणून तिने मोठी सुटकेस घेतली." आता त्याचे समाधान झाले होते, त्याच्या चेहर्यावरुन प्रियुला कळले.
अरे हा काय बावळट आहे का? काय ओरडला, आणि कसा प्रश्न होता ह्याचा. म्हणजे मी माहेरी जावू नये, असच काहीस हा सुचवत होता...नाही का ? मनोमन पुन्हा एकदा प्रश्न घेवून सुखावली प्रियु.
अचानक प्रियुला घरी आलेले बघून, संजु आणि शिना टिनाने तर आरडा ओरडाच केला आनंदाने. आईने पटकन पुढे होऊन प्रियुला कवेत घेतले. ह्या पुर्वी कधीच आईने तिला असे प्रेमाने आलिंगन दिलेले तिला आठवत नव्हते. फक्त लग्नात घेतले होते जवळ तेवढेच. प्रियुचे बाबा नुकतेच बँकेत गेले होते. ते संध्याकाळ शिवाय परत येणार नव्हते. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर. अर्जुनचे बाबा जायला निघाले. पण शोभनाच्या आधीच, अर्जुन म्हणाला,
"बाबा थांबा ना तुम्ही पण.
तसेही तुम्हाला तर सुट्टी आहे ना आज?"
"हो हो दादा, तुम्ही पण थांबा, प्रियुच्या बाबांना मी थोड्यावेळाने फोन करते. येतील ते सुट्टी टाकून."
शोभना म्हणाली.
शोभनाने फोन केल्यावर बाबाही लवकर घरी परतले.
आग्रहाने जेवण खाणे झाले.
प्रियुच्या बाबांनी जावया सकट त्याच्या बाबांनाही थांबवले.
सकाळी उठल्याबरोबर अर्जुनने प्रियुला तयारी करायला सांगितली. आपल्याला घरी जायचे आहे. बाबांना आॅफीस आहे. मलाही आॅफीसला जायचे आहे.
आधी तुला घरी सोडतो मग उशीरा आम्ही आॅफीसला जाऊ.
आईबाबा, प्रियु त्यांच्याकडे बघत राहीले.
मग कुणीच काही बोलले नाही.
आणि त्यांनी प्रियुला निरोप दिला.
बाबांसमोर आई काही बोलली नाही. पण ते आॅफीसमध्ये गेल्यावर ती संजुला म्हणाली,"का गं प्रियु थांबणार होती ना ? केवढी सुटकेस भरुन आणली होती तिने. आपल काही चुकलं का? सकाळी उठल्या बरोबर ह्या लोकांनी परत जायची तयारी केली. काही कळलं नाही. आणि प्रियु सोबत किती गप्पा गोष्टी करायच्या होत्या. तिकडे काय काय झाले. सगळ्यांचे कसे स्वभाव आहेत. कशी वागणूक देतात तिला. काहीच बोलण झालं नाही. वाटल होतं हे लोक गेले की, निवांत गप्पा मारु तिच्याशी. पण सगळच राहील. बरं संजु, काॅलेज बाबत काय म्हणाली का ती..?"
"अच्छा म्हणजे आता तुला तिच्या काॅलेजची फिकीर वाटते का ? नवलच आहे. आधी तिला फासावर अडकवायचं नंतर गळा दुखला का म्हणून विचारायचं...अजब कारभार आहे तुझा...!" संजु फणकार्याने म्हणाली.
"अरे देवा, काय मुलगी जन्माला घातली. सरळ बोलतच नाही. जा तू तुझ काम कर..! जा काॅलेजला." आई तिच्यावर खेकसलीच.
प्रियुला आईकडे राहता नाही आले पण ज्या अधिकाराने अर्जुनने तिला सोबत घरी चलण्या बाबत म्हंटले, ते मनोमन प्रियुला आवडले. मला एकट सोडायला हा तयार नाही. ही भावनाही तिला आवडली.
घराच्या बाहेरच प्रियुला सासूबाई दिसल्या.
"अरे लवकरच आलीस. थांबायचे असते ना आईसोबत..."हळूच त्यांनी म्हंटले.
प्रियुने न बोलता अर्जुन कडे इशारा केला.
सासूबाई समजून गेल्या.
आज माळ्याचा मुलगा आला होता.
तो फुलझाडांची मशागत करत होता.
प्रियु उभी राहून ते बघत होती.
तिने एका नवीनच काळ्या रंगाच्या कळीला उमलताना बघितले.
ह्या रंगाचे गुलाबाचे फूल ती पहिल्यांदा बघत होती.
कुतूहलाने ती माळ्याच्या मुलासोबत बोलत होती.
झाडांबद्दलची माहिती घेत होती.
तेव्हढ्यात अर्जुन आला,"तुझं नाव काय ?"
"शाम आहे सर...बाबांची तब्येत बरी नव्हती. म्हणून मी आलो."
"बरं, तू गेलास तरी चालेल. ह्या नंतर फक्त बाबांना पाठवायचे. त्यांना बरे वाटले नाही तर दुसर्या कुणीही इथे यायचं नाही. जा आता लगेच." शाम खाली मान घालून परत गेला.
"अरे, का बरं पाठवले त्याला परत? ह्या मुलाला झाडांची चांगली जाण आहे. छान माहिती देत होता." त्याच्याकडे बघत
हसून प्रियु म्हणाली.
"तेच तर म्हणत होतो मी. म्हणूनच आला तो इथे. त्यादिवशी तो आला तेव्हा खिडकीतून तू त्याचं निरीक्षण करत होतीस. परवा शेजारच्या काकूं कडे तो झाडाला पाणी टाकतं होता तेव्हा तू टेरेस वरुन त्याला बघत होतीस. तुला आवडतो का तो? बोलावू का परत?" डोळे वटारुन तो तिच्याकडे बघत होता.
कल्पनाच केली नव्हती प्रियुने, अस काही हा बोलेल म्हणून.
ती काहीच न बोलता घरात गेली. पण काही केल्या त्याचे शब्द तिच्या डोक्यातून जात नव्हते. असे का बोलला हा मला?
तीन चार दिवस असेच गेले. एक दिवस आईने जबरदस्तीने अर्जुनला आणि प्रियुला बाहेर फिरुन यायला सांगितले.
ठरले असे की हिंदमाता मार्केटला जाऊन काही ड्रेसेस प्रियुला घेऊन द्यायचे. आणि थोडं भटकून परत यायचे.
त्यानुसार दोन बसेस बदलून ते हिंदमाताला आले.
मग पुढे मार्केट थोडे पायी फिरायचे असे ठरवून निघाले.
पण बस मधून उतरल्या बरोबर, गर्दीत अर्जुन दिसेनासा झाला.
प्रिया भांबावून इकडे तिकडे बघू लागली.
क्रमशः
संगीता अनंत थोरात
03/08/22
टीम - अमरावती
ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
०००००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा