विषय - कौटुंबीक कथामालिका
शीर्षक - कंगोरे भावनांचे
भाग - 7......दोघीही बस मध्ये चढल्या.
"ए चल इथे खालीच बसू," म्हणत प्रियु डबल डेकर बसच्या खालच्या भागात गेली. "हे काय झाले, आज काही वेगळचं..."
तिच्या मागे येत हळूच मोना म्हणाली. आज त्यांना बसायला जागा मिळाली नाही......
भाग - 8
दोघीही काॅलेजमध्ये आल्या. अभ्या, चिमण्या समोरच उभे होते. तिकडून बाकीचेही फ्रेंड धावतच आलेत. सगळ्यांनी प्रियुची चौकशी केली. हातावर मेंदी का ? हा प्रश्न पुन्हा आला. तिने नातेवाईकांच्या लग्नात गेले होते. सांगून वेळ मारुन नेली.
आता प्रियुचे लक्ष अभ्या कडे गेले,
"का रे तू त्यादिवशी कुठे गायब झालास?"
तिने अभ्याला विचारले.
"अगं हा तर आता तुझ्या आधीच आला काॅलेज मध्ये. मी त्याला एवढे दिवस गायब व्हायचं कारणच विचारत होतो." चिमण्या म्हणाला.
"अरे सांग ना लेका, मुहूर्त शोधत आहेस का यार..बोल ना यार..." विराट घायकुतीला येऊन म्हणाला.
"हो हो सांगतो ऐका, मी स्वयंसेवक आहे..." त्याच बोलण तोडत चारु म्हणाली,"म्हणजे ते काय असत....?"
"अरे बाबा सोताच्या मर्जीने कुठं तरी विना मोबदला काम करणारे म्हणत्यात तेला...येडचाप कुठली !" विनीत बोलला.
"ऐ तुझ्यातर कुणाला येडचाप म्हणतो. आम्ही मुली काय तुला येडचाप वाटतो का...?"चारु रागावून बोलली.
"चारु ये बाई माझी चारु, आम्ही नाय बां त्यात. तो फक्त तुलाच येडचाप बोलला. बाकीच्या मुलींना त्यात धरु नकोस, का रे भावा...!" मोना विनीतला टाळी देत म्हणाली.
एकच हास्य विनोदात सगळे रमले.
"ऐ अभ्या सिरीअसली बोल नां, आमच्या चोरुन कोणी "डाव" तर नाहीयेना तुझी भलतीकडे...?"विराट चिडवत बोलला.
"अरे बाबा असे काही नाही. एका वर्षी असाच मी स्कूलफ्रेंड्स सोबत पिकनिकला गेलो होतो. अर्थात टिचर्स सोबत. तिथे घाटात आमच्या गाडीचा अॅक्सीडेंट झाला होता. पोलीस पोहोचायच्या आत जवळपासची रेस्क्यू टीम आमच्या मदतीला आली होती. बहूतेक ट्रेकर्सचं त्यात होते. दुर्गम ठिकाणी हे लोकं स्वतःहून मदत करायला येतात. आम्हालाही अश्याच टिमने दरीतून बाहेर काढले होते. इतकेच काय हे ट्रेकर्स पावसात, पुरात अडकलेल्या, रानात, डोंगरात पडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जातात. तेव्हाच मी ठरवले होते, मी मोठा झालो की ह्यांना जाॅईन करेन. तेव्हा मी आठवीत होतो. दहावी झाल्यावर मी ट्रेकर्सला गाठलेच. आणि हो, त्यादिवशी एका रुग्णाला अर्जंट A+ रक्ताची गरज होती. हाॅस्पीटल मधून फोन होता. लगेच निघालो आणि रक्तदान केले मी. तिथूनच घरी गेलो तर कळले मावशीच्या मुलाचा अॅक्सीडेंट झाला. मग आम्ही गावाला गेलो. कालच परतलो. आणि आज तुमच्यासमोर आहे लेक हो !" मोठ्यांने हसतच अभ्या म्हणाला.
बघतो तर काय सगळे स्तब्धपणे त्याच्याकडे बघत होते.
"काय अभिनवराव आम्हाला तर ह्यातलं काहीच माहित नव्हत.
आम्ही तर तुम्हाला असेच आलतू फालतू डायलाॅग मारत होतो राव !" चिन्मय तोंडाला हात लावत म्हणाला.
पण हे सगळ ऐकूण मित्रांनी अभ्याला खांद्यावर उचलून घेतले. त्याच्या नावाचा जयजयकार केला. आज खर्या अर्थाने सगळ्यांना फार आनंद झाला. आपला मित्र एक सामाजीक भान ठेऊन समाजासाठी काही तरी करतोय, ही भावना मित्रांना सुखावून गेली. आणि गरज पडल्यास आम्हालाही सोबत नेत जा. किंबहूना सांगत जा. असे आश्वासन अभिनव कडून त्यांनी घेतले. आज अभ्या बद्दल त्यांना अभिमान वाटत होता.
पुढचे दोन दिवस प्रियु नेहमी सारखी काॅलेज मध्ये आली. तिने कुणालाच साखरपुड्या बाबत सांगितले नाही.
तिने मह् तप्रयासाने मनाला आवरले आणि "गॅलरी" कडे अजिबात लक्ष दिले नाही. पण तिला जाणवत होते. दोन डोळे तिला बघत होते. पाठी येत होते. प्रियु दुर्लक्ष करत होती.
शनिवारी ठरल्या प्रमाणे शोभनाच्या माहेरचे आले. आत्याला साखरपुड्याला बोलावले पण तिने कळवले ती लग्नाला येणार, आता येण होणार नाही. जवळच्याच हाॅल मध्ये साखरपुडा यथासांग पार पडला. आज अर्जुन, प्रियुला आनंदी वाटला. त्याने तिच्याकडे बरेचदा बघितले सुद्धा. जेवताना तर आपसूकच तो तिला म्हणाला,
"आज तू खुप सुंदर दिसत आहेस."
प्रियु तर सुखावलीच, कुठे तरी आपले स्वातंत्र्य हिरावल्याची भावना मनात होती...ती जाऊन तिला आता होत असलेल्या विधींमुळे, अर्जुनशी थोडे बोलल्यावर तिच्या मनाला त्याची ओढ वाटू लागली.
माझ्या बाबांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे, हे तिला पटले होते. त्यातच एकांत मिळताच तिने शिक्षण पुर्ण करण्यासंबंधी अर्जुन सोबत बोलली. त्याने लगेच होकार भरत, आवाज देऊन बाबा आईला बोलावले. आणि त्यांना पण सांगितले तिच्या शिक्षणा बद्दल. तेही आनंदाने तुला हवं तेवढं शिक म्हणाले.
आता किंतुपरंतु प्रियुच्या मनात उरलाच नव्हता. ती आनंदाने स्वाहा व्हायला तयार झाली.
घरात आनंदी आनंद होता. एका महीन्यानेच लग्नाचा मुहूर्त निघाला. लग्नाची तयारी जोमात सुरु होती.
घरात संजुची नेहमी सारखी धुसफुस सुरु होती,
"काय घाई आहे ह्या लोकांना काय माहित. अरे तिची परिक्षा तर होऊ द्या. एवढा भार होत आहे का मुलीचा. प्रियु तुला पण अक्कल नाही. आपली तू तर भलतीच खुश दिसत आहेस. मग ते अश्रू का ढाळत होतीस मागे? ह्या संसारवेड्या पोरींचे पण काही खरे नाही. हॅटटट लेकींनो...जा मरा तिकडे सासरी!"
संधी मिळताच ती प्रियुसमोर काहीबाही बोलायची आणि प्रियु मंद हसून तिच्याकडे दुर्लक्ष करायची.
काही दिवसाने भीतभीतच प्रियुने आपल्या फ्रेंड्सना पण लग्ना विषयी सांगितले. आधी तर सगळे अवाक् झाले. पण प्रियुने त्यांना खात्रीशीर सांगितले. तिचे काॅलेज सुरु राहणार. तिला सासरच्यांनी आश्वासन दिले आहे. सगळे आश्वस्त झाले आणि तिच्या आनंदात सहभागी झाले.
पाहता पाहता लग्नाचा दिवस जवळ आला. घर भर शोभनाच्या माहेरचे पाहुणे होते. लग्नाच्या चार दिवस आधी आत्या पण परिवारा सकट घरी आली. शेजारी पाजारी, आईबाबांचे मित्रमंडळी, संजु प्रियुचे फ्रेंड्स सगळा आनंदी आनंद होता.
लग्नाआधीचे विधी करण्यासाठी बाबांनी दोन दिवसांसाठी जवळचेच सभागृह आरक्षित केले होते. थाटामाटात प्रियुचे लग्न लागले.
आईबाबांना अश्रू आवरले जात नव्हते. आज आई मात्र धाय मोकलून रडत होती. जणू आता पर्यंत ती जेवढीही तिला रागावली असेल त्या सर्वांबद्दलचा तिला पश्चाताप होऊन ती अश्रू वाटे बाहेर काढत होती. ह्याच दिवसा साठी मी माझी माया हात राखून वापरत होती. जणू ती स्वतःलाच समजावत होती. प्रियु सकट संजू शिना टिना सगळेच रडत होते.
क्रमशः
संगीता अनंत थोरात
02/08/22
टीम - अमरावती
ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
०००००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा