कन्हैया ( कान्हा)

रुबिनाला आपली सून म्हणून अय्यानच्या आईला अजिबात आवडत नव्हती


" मैंने पहलें हीं कहां था आपकों यें लड़की हमारे अय्यान के लायक नहीं है।पर इस घर में मेरा कोई सुनें तो गनिमत"

रुबिनाची सासू जोरात ओरडून सांगत होती.

तिला तिचा नवरा म्हणजे अय्यानचे अब्बा "चुप भीं करों अय्यान कि अम्मी ।क्यों बिचारी को इतना बोलतीं हों" असे म्हणाले.

आत खोलीमध्ये रुबीना पलंगावर रडत बसली होती.अय्यान तिचा नवरा तिच्या समोर तिची समजूत काढत बसला होता.

कारण ही तसेच होते.आजच रुबिनाला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला होता.तिचे सलग तीनवेळा मिसकेरेज झाले होते.

आणि यावेळी तर ती स्वत: यामधुन जीवानिशी वाचली होती.

डॉडॉक्य्ला अय्यानला बोलावून सांगितले होते कि रुबिनाचे गर्भाशय कमजोर आहे.
मुल सांभाळून घेण्याची क्षमता कमी आहे.आणि यापुढे काळजी घ्यावी.पुन्हा ही गरोदर राहिली तर हिची वाचण्याची शक्यता कमी . त्यामुळे मी एक सल्ला देऊ शकतो.कि तुम्ही जितक्या लवकर होईल तितक्या लवकर गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर बरे होईल."

‌हे ऐकून अय्यानच्या पायाखालची जमीन सरकली.त्याला काहीच सुचत नव्हते.त्याच्या डोळ्यासमोर रुबिना दिसत होती.तो डॉ.ना ठिक आहे डाॅ.आम्ही विचार करून निर्णय घेतो.असे म्हणून बाहेर आला.

दवाखान्याच्या बाहेर छोटासा फुल झाडाचा बगीचा होता.तिथे काही लहान मुले खेळत होती.ते पाहून त्याच्या डोक्यात पाणी आले.
त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे पुर्वीचे दिवस आठवले.

अय्यान
शेख कुटुंबातील एकुलता एक मुलगा.दोन मोठ्या बहिणी.दोघींचीं चांगल्या घराण्यात लग्ने करून दिली होती.अय्यानचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच कॅम्पस सिलेक्शन झाले होते.तो आता चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली होती.

त्याच्याच कंपनीत रुबिना नोकरीला होती.अगदी चुणचुणीत मुलगी.हसमुख चेहरा.अगदी सगळ्यात मिळून मिसळून राहायची‌.तिच्या कामाची कायम प्रशंसा व्हायची.अगदी मन लावून इमानदारीने काम करण्याचे बाळकडू तिच्या वडिलांकडून मिळाले होते.

तिचे वडील शिक्षक होते.आई आणि एक भाऊ .तो शिकत होता.

आॅफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी दहा लोकांची टिम निवडली होती.त्यामध्ये अय्यान आणि रुबिना हे देखील होते.

तिथे दोघांची मैत्री झाली.नंतर त्या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले हे कळलेच नाही.

दोघे रोज आॅफिस सुटल्या नंतर बाहेर कॅफे मध्ये जाऊन एकांतात बसत.आता दोघांच्याही घरात त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती.

अय्यानच्या मामाची मुलगी करणेचा अय्यानच्या आईचा विचार होता.त्या दिवशी रात्री जेवताना आईंने हा विषय काढला." आज भाई का फोन आया था।अपने अय्यान को दामाद बनाने कि ख्वाहिश़ जाहीर कि हैं।"

" अरे ,,अच्छी बात है। लेकिन जिसे शादी करना है उसे तों पुछ लों।" अय्यानचे वडिल बोलले.

" इसे क्या पुछना.ये क्या हमारे बात के बाहर है क्या" अय्यानची आई बोलली.

आतापर्यंत सगळे ऐकून एकदम अय्यान बोलला." अम्मी,अब्बु तुम्हाला मी सांगणारच होतो,पण कसे सांगू हे कळतच नव्हते.पण आज आईने विषय काढला आहे .तर मी ...म्हणजे...मला...!"

" अरे काय ते स्पष्ट बोल"

" अब्बू माझे आमच्या कंपनीत माझ्या बरोबर काम करणाऱ्या मुलीवर प्रेम आहे.आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे."

तोच त्याची आई जोरात ओरडली." अरे कोण कुठली,जातीची न पातीची.मुर्खपणा करु नको.तुझ्या दोन्ही बहीणी चांगल्या घरी नांदतात.तुझा एक चुकीचा निर्णय त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करेल\"

" अम्मी ,ती चांगल्या घरातील आहे.तिचे वडील शिक्षक आहेत.तु भेट तिला म्हणजे पटेल."

पण त्याची आई काही ऐकून घेत नव्हती.तोच त्याचे वडील बोलले" अरे तो इतके म्हणतो तर एकदा भेटु त्या मुलीला.मगच काय तो निर्णय घेऊ"
" तुमचे तुम्ही बघा काय ते.मला यामध्ये गुंतायचे नाही" म्हणत आई आत निघून गेली.

अय्यानच्या वडिलांना आणि तिच्या बहीणींना रुबिना खुप आवडली.तसे तिच्यामध्ये नाही म्हणन्यासारखे काहीच नव्हते.
तिच्या आई-वडिलांना देखिल अय्यान आणि त्याचे आई-वडील बहीणी यांना भेटून समाधान वाटले.
दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले.जरे दिवस दोघांनी सुट्टी घेतली.नंतर पुन्हा दोघे कामाला जाऊ लागले.

अय्यानचे वडिल सुनेवर खुप खुश होते.ती देखील आपले सगळे काम अगदी मनापासून करत होती.तरीही आई कोठे न कोठे तिची चुक काढायची.पण ही अगदी सहजपणे त्या गोष्टीला हसून सामोरे जायची.

त्या दिवशी सकाळी उठल्यावर रुबिनाला अचानक उलट्या सुरू झाल्या.
" अरे काय झाले बाळा" अब्बूंनी आवाज दिला.
" हुं.काहीतरी खाल्ले असेल बाहेर रात्री.ते काय पिझ्झा कि काय ते ." आईने ठसक्यात म्हटले.
रुबिनाला एकदम अस्वस्थ वाटू लागल्याने लगेच अय्यानने दवाखान्यात नेले.
" ओहो. तोंड गोड करा.अय्यानजी.तुमच्या घरी नन्हा मेहमान आनेवाला है." डॉ.बोलले.
रुबिनाचा चेहरा लज्जेने लाल झाला.दोघांनी ही गोड बातमी आई-बाबांना सांगितली.आणि त्यादिवशी पहिल्यांदा आईने सुनेला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
सगळेजण खुप आनंदात होते.अय्यानने तर लहान बाळाचे कपडे,पाळणा,बुट,खेळणी आणून खोली सजविले होती.
.
" रुबिना बाळ आता कामाची फार दगदग करु नको.चौथा महीना लागला आहे.जरा आराम कर" आई म्हटली.." हो अम्मी.आता घरुनच काम करणार आहे." असे म्हणून रुबिना किचनमध्ये जाऊ लागली तोच " अम्मी
अम्मी
या अल्लाह
असे म्हणून पटकन खाली बसली. आईं पण पळत गेली.काय होतंय बाळा.अगं असे का करतेस.उठ उठ चल तिथे खुर्चीवर बस चल."
" नाही ओ मला उठताच येत नाही आहे.पोटात खुप दुखतं आहे" म्हणून ती रडू लागली.

" सॉरी मि.अय्यान तुमच्या पत्नीचे मिसकेरेज झाले आहे" डॉ.बोलले.
एकच स्मशान शांतता.काही महीन्यांनी रुबिनाने पुन्हा आॅफिस जाॅईन केले.पण ती आतून तुटलेलीच होती.कोठेतरी तिला खालीपण जाणवत होते.
तिच्या बरोबर काम करणाऱ्या तिच्या मैत्रिणी तिची समजूत काढून तिला पुन्हा एकदा पहील्यासारखे करण्याचा प्रयत्न करत होत्या.

आणि पुन्हा एकदा आशेचा किरण तिच्या आयुष्यात आला.तिला आई होणार याची जाणीव झाली.आता ती जरा जास्तच खबरदारी घेऊ लागली.घरात पुन्हा एकदा आनंदाची लहर उठली.पण पण जेव्हा तिला चौथा महिना लागला तेव्हा पुन्हा तसेच तिचे मिसकेरेज झाले
.

आता तर ती खुपचं खचली.तिला आयुष्य नकोसे झाले.कशातच तिला उत्साह वाटत नव्हता.

त्यादिवशी तिची खास मैत्रीण जी शाळेपासून कंपनीत जाॅईन होईपर्यंत तिच्या बरोबर होती तिचे लग्न होते.तिला खुप आग्रह केल्यावर ती तिथे गेली.पण ती कोणात फारशी मिसळली नाही.एकांतात बसली.तिच्या मनाची घालमेल अय्यानला जाणवत होती.
आईचे तर आता दिवसभर टोमणे सुरू होते.

" ऐक ना रुबिना.कसे सांगू..तिची मैत्रीण तिच्या जवळ येऊन तिला म्हणाली.
" हा.बोल ना
काय बोलणार आहेस." रुबिना म्हटली.

" अरे यार ...आय एम प्रेग्नंट"
ओह. congratulations"
हे म्हणने रुबिनाला अगदी मनावर दगड ठेवून बोलल्यासारखे .

त्या दोघी रोज दुपारी लंच टाईम वेळी गप्पा मारत बसत होत्या.तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याचा मोठा बिझनेस होता.त्यासाठी तो वारंवार बाहेरच्या देशात जात होता.
.
त्यादिवशी ती रुबिनाला म्हटली" उद्या पासून वर्क फ्रॉम होम घेतेयं गं.आता बेबी मोठा झाला कि येणार आॅफिसला.तु येत जा ग घरी"
" अं हो हो येईन सुट्टीच्या दिवशी"

त्यादिवशी सकाळीच रुबिनाला तिच्या मैत्रिणीचा फोन आला" हैलो..बोल ना कशी आहेस.तब्येत काय म्हणते.औषध घेते न वेळेवर"
" हो ग रुबिना मी बरी आहे.पण यांची तब्येत बरी नाही न.एकसारखा ताप येत आहे.एक आठवडा झाला ग ते भारतात येऊन.तिथेपण होताच म्हणे ताप त्यांना.खोकला पण आहे ग.काही समजतं नाही.आज त्यांचे रक्त तपासणी करायची आहे."

‌" अरेरे.जा पहीलं त्यांच्या तपासण्या करून घे." रुबिना म्हटली.

रुबिनाला तिच्या मैत्रिणीचा फोन ऐकून टेंशन आले.ती आॅफिस मध्ये तोच विचार करत बसली.लंच टाईम झाला म्हणून ती तिच्या खुर्चीवरून उठायला गेली आणि एकदम चक्कर येऊन पडली.

‌ " प्लिज यावेळी खुप काळजी घ्या.बेडरेस्ट हवी.पुर्ण नऊ महिने.आता कसलीही रिस्क घ्यायला नको" डॉ.नीं अय्यानला सांगितले.घरामध्ये आनंद अधिक काळजी सुरू झाली.

आणि त्यादिवशी सकाळी रुबिना बाथरूममध्ये गेली तोच तिला ब्लिडिंग सुरू झाले.

"मि.अय्यान"
नर्स च्या आवाजाने अय्यान भानावर आला.

डिस्चार्ज घेऊन दोघे घरी आले.घरात जणू काही मातमच .कोणी जेवण्यास तयार झाले नाही.अय्यानच्या बहीणी पण आल्या होत्या.

‌आता तर अय्यानची आई त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलू लागली होती.

रात्रीचे बारा वाजले होते.बाहेर पाऊस धोधो कोसळत होता.तसे कोणाला झोप लागली नव्हती.कशी लागेल. तोच दारावर जोरात कोणीतरी थाप दिली. कोण असेल इतक्या रात्री.तेही पावसात म्हणत अय्यानचे वडिल बाहेर आले.
" कोण आहे ? "

" दार उघडा.मी रुबिनाच्या मैत्रिणीचा भाऊ आहे"

दार उघडले तर समोर एक तरुण हातामध्ये छोटेसे बाळ घेऊन उभा होता.

"कोण आपण? कोण हवंय?" वडिलांनी विचारले.


"रुबिना दिदी आहे का? मी तिच्या कडे आलो आहे."

‌"हो हो आहे .या बसा तुम्ही.मी बोलावतो तिला."
"रुबिना बेटा कोई आया है मिलने.जरा बाहर आजा बेटा"

तशीच रुबिना बाहेर आली. "अरे इतक्या रात्री तु.आणि हे काय हे कोणाचे बाळ.पावसात इतक्या लहान बाळाला घेऊन कशाला आलास? रुबिनाने त्या तरुणास म्हटले.

हे ऐकताच तो तरुण रडू लागला" दिदी दिदी
खुप वाईट झाले.
जिजूंना कोरोना झाला होता त्यात ते गेले.त्यांची लागन ताईला झाली.तिला क्वारंन्टाईन केले होते पण तिची त्यामध्ये सातव्या महिन्यात डिलेव्हरी झाली.तिला मुलगा झाला.देवाच्या कृपेने हे बाळ निगेटिव्ह आहे.पण पण ताई पॉझिटिव्ह निघाली.आणि ती सुद्धा जीजूंच्या पाठोपाठ आम्हाला सोडून गेली.

तिच्या पर्समध्ये आम्हाला तिची एक चिठ्ठी सापडली.त्यामध्ये तिने लिहिलेलं होते कि,"मला माहित आहे कि मी आता जगणार नाही.पण जर देवाच्या कृपेने माझे बाळ या जगात आले आणि तो किंवा ती जे काही असेल ते निगेटिव्ह असेल तर त्या बाळाला माझ्या जिवलग मैत्रिणींच्या ओटीत द्यावे.आणि तिला आई होण्याचा अधिकार द्यावा.


त्याची आई रुबिना", असे म्हणत त्या तरुणाने ते बाळ रुबिनाच्या हातात दिले.तोच बाहेर गोपाळ जन्माचा सोहळा सुरू झाला.


आज पुन्हा एका देवकीचा तान्हा यशोदेचा कान्हा झाला. बाहेर पडणारा पाऊस आणि रुबिनाच्या सासु सासरे यांच्या डोळ्यातुन ओघळणारे अश्रू धारा.

अय्यान आणि रुबिना दोघांनी त्या बाळाला अलगद हातात
घेतले. मेरा कन्हैय्या ,मेरा कन्हैय्या करत बाळाचे पापे घेतले.

©® परवीन कौसर
बेंगलोर