कन्यादान भाग १
"आई,आई कुठे आहेस तू?"
मयुरी हाक मारतच किचन मध्ये गेली. आई तिथे नाही बघून तिने हॉलमध्ये काम करत असलेल्या मावशींना विचारले,
"मावशी आई कुठे आहे.?
"ते बघा."
जिन्यावरून उतरत येणाऱ्या सायलीकडे हात करत मावशी म्हणाल्या.
जिन्यावरून उतरत येणाऱ्या सायलीकडे हात करत मावशी म्हणाल्या.
सायली, मयुरी ची आई.
आईला बघून मयुरी धावतच गेली आणि आईला बिलगली.
आईला बघून मयुरी धावतच गेली आणि आईला बिलगली.
"अगं हळू जरा. काय झाले काय? तुझा आवाज ऐकून किती घाईत आले मी खाली."
"आई तुला खूप आनंदाची बातमी सांगायची आहे. आमच्या कॉलेजची ट्रिप मनाली ला जाणार आहे पुढच्या आठवड्यात आणि मी सुद्धा जाणार आहे. यासाठी मला तुझी परमिशन हवी आहे ती तू दे."
मयुरी ने एका दमात सगळे सांगून टाकले.
मयुरी ने एका दमात सगळे सांगून टाकले.
"अच्छा!अशी परमिशन मागतात. आधी सरळ जाणार आहे सांगायचं आणि मग परमिशन मागायची. तू ठरवून मोकळी झालीच आहे तर मग विचारतेच कशाला?"
"आई, तुला माहितीये तुझ्या आणि बाबांच्या शब्दा बाहेर मी जात नाही त्यामुळे तू प्लीज नाही म्हणू नको माझे सगळे फ्रेंड्स जाणार आहेत ग."
मयुरी तोंड फुगवत म्हणाली.
मयुरी तोंड फुगवत म्हणाली.
"मी दिली तरी बाबांनी दिली पाहिजे ना परमिशन."
"तू त्यांची काळजी करू नको त्यांना मी बरोबर तयार करेन."
मयुरी डोळे मिचकवत आईला म्हणाली.
मयुरी डोळे मिचकवत आईला म्हणाली.
"मग मलाही काही प्रॉब्लेम नाही."
सायली असं म्हणाल्याबरोबर मयुरी आईच्या गळ्यात पडली आणि म्हणाली,
"थँक्यू थँक्यू सो मच माय डियर मॉम."
सायली असं म्हणाल्याबरोबर मयुरी आईच्या गळ्यात पडली आणि म्हणाली,
"थँक्यू थँक्यू सो मच माय डियर मॉम."
रात्रीच्या जेवणावेळी मयुरीने ट्रीप ला जायचा विषय काढला तसा सतीश ने नकार दिला.
सतीश, मयुरीचे बाबा.
सतीश, मयुरीचे बाबा.
"बाबा हे काय;असं काय करता तुम्ही. मी आता मोठी झाली आहे. माझे सगळे फ्रेंड्स जाणार आहेत. तुम्ही अजूनही मला लहान मुलांसारखं ट्रीट करतात."
"नाही म्हणालो ना मी एकदा."
सतीश जरा चढ्या आवाजात म्हणाला.
सतीश जरा चढ्या आवाजात म्हणाला.
"आईsss..." म्हणून मयुरी सायली कडे वळली.
तिचा तो नाराज झालेला एवढासा चेहरा पाहून सायली म्हणाली,
तिचा तो नाराज झालेला एवढासा चेहरा पाहून सायली म्हणाली,
"अहो असं काय करता कॉलेजची ट्रिप आहे. एरवी तर अभ्यासच चालू असतो तिचा.जाऊद्या ना.करू द्या तिला तिच्या कॉलेजचे दिवस एन्जॉय."
"अग पण..."
सतीश पुढे काही बोलणार तोच त्याला मध्येच थांबवत ती पुढे म्हणाली,
सतीश पुढे काही बोलणार तोच त्याला मध्येच थांबवत ती पुढे म्हणाली,
"आपण नाही का केले आपल्या कॉलेजचे दिवस एन्जॉय."
असं म्हणून सायलीने एक प्रेम पूर्ण कटाक्ष सतीश कडे टाकला तसा सतीश मंद हसला आणि म्हणाला,
असं म्हणून सायलीने एक प्रेम पूर्ण कटाक्ष सतीश कडे टाकला तसा सतीश मंद हसला आणि म्हणाला,
"ठीक आहे पण लक्षात ठेव रोज न चुकता फोन करायचा. आणि स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची."
"एसSS... "मयुरी जोरात ओरडली.
****
"नो SS नो.. का? का नाही म्हणाले मी. का दिली परमिशन तुला जायची?"
असे म्हणून सायली बेडवर स्वतःचे हात आपटत मोठ्याने रडायला लागली.
सतीश घरी आला मावशीने दार उघडले तसे त्याने त्यांना सायली कुठे आहे विचारले,
मावशींनी इशाऱ्यानेच त्याला सायली बेडरूम मध्ये असल्याचे सांगितलं.
सतीश बेडरूम जवळ गेला तसा त्याला सायलीचा रडण्याचा आवाज आला. तो तिच्याजवळ गेला तिच्या खांद्यावर हात ठेवला.
सायली मयुरी चा फोटो हातात घेऊन बसली होती.
सतीशच्या स्पर्शाने ती भानावर आली आणि त्याला बी लागली. रडत असताना म्हणाली,

"सतीश का? का झाले हे माझ्याच बाबतीत? मीच गुन्हेगार आहे.जे झालं ते माझ्याच मुळे झालं. तू नको म्हणत होता तरी मी तिला जाऊ दिले."
सतीश ने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला,
सायली सावर स्वतःला,अजून किती दिवस हेच बोलणार आहेस. पाच वर्षे झाले याला. जे घडायचं होतं ते घडलं यात कोणाचाच दोष नाही. अजून किती दिवस स्वतःलाच असे दोष देत बसणार आहेस. ती माझी ही मुलगी होती ग पण तरी सावरलं ना मी स्वतःला."

काय घडले मयुरी सोबत वाचा पुढील भागात...
क्रमशः
क्रमशः
सुजाता इथापे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा