कारण की

कारण की
" कसली मतलबी सुन आहेस ग तु. तुला जरा वेळ नाही. आईशी फोन वर बोलायला.? "

प्रणव घरी आल्या आल्या मैथीली वर बरसला. तिला समजेना हा अस काय म्हणत आहे. याला काय झालं चिडायला. पण आज प्रणवचा मूड खुप खराब होता. मैथिलीला त्याचं कारण माहीत नव्हत.

पण तो आताच ऑफिस मधून थकून भागून घरी आला आहे. तर आधी त्याला फ्रेश होवू दे. नंतर तोच सगळ काही सांगून टाकेल. असं मनाशी म्हणत ती किचन मध्ये गेली. तिने दोघांच्या साठी चहा बनवला. सोबत खायला म्हणून पटकन उपमा केला. थोडे पापड पण तळले. तो पर्यंत प्रणव फ्रेश होवून आला होता.

इतक्यात त्यांची छोटी मुलगी काव्या पण उठली. दोन तीन दिवस झाले तिची तब्येत बरी नव्हती. तिला ताप येत होता. सात महिन्यांची काव्या तिला दात येत होते. त्यामुळे तिला ताप येत होता. तिची चिड चिड होत होती.

मैथिली ने अजुन जॉब जॉइन केला नव्हता. त्यामुळे ती काव्याच सगळ स्वतः करत होती. दुपारी काव्या झोपली होती. तर ती आताच उठली होती. समोर बाबा ला बघून त्याच्या सोबत खेळायला लागली. काव्या सोबत खेळत असताना प्रणव त्याचा राग काही वेळा पुरता तरी विसरला होता.

मैथिली ने त्याला चहा आणि नाष्टा खायला दिला. काव्याला खेळायला खाली मॅट वर ठेवलं. खेळायची खेळणी दिली.नी चहाचा घोट घेत प्रणवला विचारलं ,

" काय झालं प्रणव मगाशी आल्यावर तु मला अस का म्हणाला मी मतलबी सुन बाई आहे म्हणून ?.."

" मी चुकीचं काय म्हणालो.? तुला गरज होती तेव्हा दररोज तु आईला एकदा फोन करायचीस. आता काय गरज नाही. तर तू आईला कधी फोन केला सांग "

त्याने तिला विचारलं. चहाचा घोट घेउन तो कपाच्या बाजूने तिचा चेहरा न्याहाळत होता. ती तिच्या विचारात हरवलेली बघुन तो पुढ म्हणाला.

" तू एक मुलगी आहेस तर वेळात वेळ काढून आईला फोन करते. पण माझ्या आईला एक सुन म्हणून तुला तुझ्या सासूला फोन करायचं म्हणजे."

"काय.." तिने विचारलं.

" तुला एक साधा फोन करण म्हणजे ते सुधा एक काम वाटतं." त्याने टोमणा मारला.

" अरे अस काही नाही. ते तर दोन दिवस काव्या खुप आजारी पडली होती. रात्रीची झोप पण नीत नाही होत. त्यामुळे मला जमल नाही फोन करायला." ती गुळमुळीत उत्तर देत म्हणाली.

" हाच फरक असतो. तु तूझ्या आईची मुलगी आहे तर वेळात वेळ काढून तिला फोन करते. दिवसातून किमान एक तरी फोन करतेसच. तेव्हा तुला वेळ नाही मिळाला. पण सासूला फोन करायचा असेल तर तुला ते काम वाटतं. जे काम करायला तुला वेळ काढावा लागतो." प्रणव ने पुन्हा टोमणा मारला.

" अरे अस काही खरचं नाही. तिला फोन नाही केला तर तिला काळजी वाटतं राहते." मैथिली म्हणाली.

" कामातल्या कामात आणि वेळात वेळ काढून तुला तिला फोन करायला जमतो. पण आईला फोन करायला म्हणलं की अंगावर काटा येतो काय?" प्रणव सरकास्टीकली म्हणाला.

" अरे पण मी म्हणाले ना तुला मला काव्या च्या आजारपणामुळे आईंशी बोलायला वेळ नाही मिळाला." मैथीली त्याची माफी मागत म्हणली.

तिची चुक तिला मान्य होती. तिने तिच्या आईशी या दोन दिवसात आईशी बोलली होती. अगदीं पोळी करत असताना फोन स्पीकर वर ठेवून बोलत होती.

काल तर ती काव्याला घेऊन सोसायटी कंपाऊंड मध्ये वॉक करायला घेउन गेली होती तर तेंव्हा काव्या ला बेबी प्रॅम मधे ठेवून तिला फिरवत मैथिली तिच्या आईशी बोलतं होती. कारण फक्त एकच तिला त्यांची काळजी वाटू नये म्हणून.

पण तिला सासू बाईना एक फोन करायला जमलं नव्हतं. तर प्रणवच तिच्यावर रागावणं , चिडण तिला योग्यच वाटलं.एकदम रास्त होत. म्हणून तिने त्याची माफी पण मागितली.

" हे असच असत. तुला तिला आपली काळजी वाटू नये म्हणून नाही फोन करायची गरज वाटली. पण आईशी नाही बोलली तर आईला काळजी वाटते म्हणून ती महत्वाची गोष्ट आहे. नाही का.?"

आता मात्र प्रणवच्या बोलण्याची हद्द पार झाली होती. मैथिली त्याच्याकडे बघत होती. तर तो निवांत पणे पापड कुरुम कुरूम आवज करत खात होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू होत. आज त्याने तिला तिच्या चुकी साठी जे पकडल होत. त्याचं हसू बघून तिला राग तर आला होता.

" अरे एकदा काय चूक झाली तर किती वेळा बोलून दाखवत आहेस?" ती म्हणाली.

" मग मी चुकलो तर तु एक संधी सोडत नाही मला टोमणा मारण्याची?" त्याने तिला चिडवलच.

" हो तुझ म्हणणं पटलं मला. एका सूनेन तिच्या सासरी दोन तीन दिवसातून फोन नाही केला तर सुन मतलबी होते. तिच तिच्या सासू सासऱ्यांच्या कडे अजिबात लक्ष नाही. हे एकदम बरोबर आहे. मान्य केल. पण. "

असं म्हणून ती एक क्षण थांबली. एक मोठा श्वास घेतला. तिचं हे वागणं बघुन पापड खाणारा त्याचा हात थांबला. तो कान देऊन तिच बोलणं ऐकू लागला. सावध झाला होता.

" मी वेळात वेळ काढून आईना फोन केला नाही तर मी चुकले. पण गेले चार पाच महिने झाले तु माझ्या आईशी बोलू शकला नाही. तुला कंपनी मध्ये काम होत. प्रमोशन मिळाले आहे. कधी बाहेर गेलो होतो. तर कधी मित्र त्यांच्या सोबत आहे. एक नाही अनेक बहाणे आहेत तुझ्याकडे." तिच्या बोलण्यावर त्याच्या तोंडाचा आ वासला होता.

"माझ्या आईने स्वतः हुन फोन केला तरी देखील तुला तिच्याशी बोलायला वेळ नाही. पण तरी देखील मी तुला अस नाही म्हणु शकत की किती मतलबी जावई आहे. गरज असेल तर त्याला फोन करायला लगेचच वेळ मिळतो. तेव्हा त्याच्याकडे कोणताही बहाणा नसतो. तरी देखील मी समजुन घ्यायचं." ती त्याच्या कडे बॉक्स टाईप स्माईल करून बघत होती.

" एकदा काय झालं मला तीन चार दिवसात आईंना फोन करायला जमला नाही तर मी मतलबी सुन झाले. पण चार महिने जावयाने एक साधा फोन केला नाही तरी देखील तो मतलबी, बेजबाबदार नाही. बरोबर बोलत आहे ना "
तिने त्याला टोमणा मारलाच.

मगाशी चिडलेला प्रणव आता खाली मान घालून चूप चाप उपमा खात होता. बोलायला रागवायल त्याच्या कडे काही कारणच नव्हतं. आता चुक त्याची होती. कामाच्या गडबडीत, त्याला त्याच्या आईशी बोलायला वेळ झाला होता. पण सासुशी बोलायला त्याच्याकडे बहाणे होते.

खरं आहे ना.!

©® वेदा

कॉमेंट मध्ये सांगा.


🎭 Series Post

View all