Login

करंजी

Karanji Recipe
आजपर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारांमध्ये करंजी खाल्ली असेल आणि बनवली ही असेल काहीच शंका नाही.
पण आजचा हा लेख मी लिहिणार करंजी बनवण्याच्या पारंपारिक पद्धतीला घेऊन.
आणि फक्त असं नाही की पारंपारिक पद्धत सांगणार म्हणजे आजकाल मार्केटमध्ये जी करंजी बनते तिला सोडून देणार ह्या रेसिपी मध्ये आपण सगळं काही कव्हर करणार आहोत तेव्हा वेळ वाया न घालवता त्याला सुरुवात करूया.
"करंजी म्हणजे मैद्याच्या खुसखुशीत पापडी मध्ये भरलेल्या मेजवानीची गमतीदार डिश."
आता हे वाक्य मी याकरता वापरलं कारण तुम्हाला समजेल की करंजी नेमकी असते कशी आणि ही स्वीट डिश सुरुवातीला कशी बनवली जात होती किंवा अजूनही तिचा मूळ स्वरूप काय आहे ‌. रेसिपी थोडी वेगळी असणार तर समजून वाचा आणि नंतर नक्की ट्राय करा.


साहित्य.

1)एक किलो गहू.
2)अर्धा किलो साखर
4) एक पाव खोबरा कीस (हे स्किप देखील करू शकता)
5) इलायची
6) एक पाव मैदा
7) अर्धा पाव रवा
8) तुप किंवा वनस्पती घी
9 )तेल
हे पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या करंजी साठी लागणारे साहित्य आहे जर तुम्हाला बाजारात मिळते तशी किंवा सुक्या मेव्यापासून बनणारी करंजी बनवायची असेल तर ह्याच साहित्यातील एक किलो गहू हा पदार्थ स्किप करायचा आणि  खालील साहित्य वाढवून घ्यायचे.
10)हव्या त्या क्वांटिटीमध्ये सुकामेवा
यामध्ये तुम्ही काजू बदाम खारीक खोबरे ह्या सगळ्यांचे मिक्स किंवा नुसते खोबरा असता कुठलाही पदार्थ वापरू शकता आपल्याला फक्त करंजीच्या आतली फिलिंग बनवणे महत्त्वाचे आहे.


पाककृती

★जसं की मी सांगितलं होतं पारंपारिक पद्धतीने जी करंजी बनते त्यामध्ये गव्हाच्या पिठाची फिलिंग असते पण कृती पूर्णपणे वेगळी आहे.

★सर्वात अगोदर आपल्याला एक किलो गहू घ्यायचे ते दोन-तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे.

★हे धुतलेले गहू एका घट्ट कॉटनच्या कपड्यात गाठ बांधून अर्ध्या तासासाठी ठेवायचे यात पाणी असता कामा नये.

★आता गव्हाची गाठ सोडून थंड जागेतच गहू वाळत घालायचे थोड्या वेळातच ते सुकतील नाहीत चुकले तर उन्हात ठेवू शकता.

★आता हे वाळलेले गहू आपण चक्कीतून काढून आणायचे घरी ग्राइंडर ची सुविधा असेल आणि त्यात गहू निघत असतील तर तिथेही काढू शकता.

★आता या पिठासोबत तुम्ही एक बदल अनुभवाल तो म्हणजे गव्हाच्या वरचा जो लाल पोर्शन आहे तो सगळा चाळणीत वर राहील सोबतच गव्हाचे जाड कण सुद्धा वरती थांबतील खाली पडेल फक्त मैद्यासारखं बारीक पीठ आणि ते पण पांढराशुभ्र.

★हे पांढरे शुभ्र पीठ म्हणजेच पारंपारिक करंजीच्या आतली फिलिंग.
चाळणीच्या वर निघालेल्या एक्स्ट्रा भागातून तुम्ही गव्हाचा लालसर पोर्शन बाजूला करून जाड रवा घरच्या घरी मिळवू शकता हा रवा खाण्यास खूप टेस्टी असतो आणि वेगळा ही.

★एक किलो गव्हापासून तुम्हाला जवळजवळ अर्धा किलो किंवा त्यापेक्षा थोडं जास्त पीठ खाली मिळेल.
गॅसवर कढई तापायला ठेवून त्यामध्ये तूप किंवा वनस्पती घे जे आवडत असेल ते ऍड करा.
पण या स्टेजला तेल ऍड करू नये कारण काही दिवसानंतर तेलाचा वास येतो आणि आपली करंजी जास्त दिवस स्टोअर करता येत नाही.

★तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ थोडं थोडं करून टाकत चला मोठ्या आकाराची कढई नसेल तर अर्ध अर्ध पीठ वेगळं भाजून घ्या हे पीठ लालसर होईपर्यंत भाजायचा आहे पण जळता कामा नये.
चाखून बघा जर कच्च्या कणिक चा फ्लेवर येत असेल तर अजून थोडा वेळ राहू द्या.

★आता हे मस्तपैकी थोडं लालसर गोल्डन भाजून झाल्यानंतर थंड करण्यासाठी एका परातीत काढून घ्या.

★जेवढे पीठ तयार आहे तेवढीच साखर ग्राइंडर मधून फिरवून घ्या हे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण समान साखर हे प्रमाण योग्य आहे.

★पीठ थंड झालं असेल तर पिठीसाखर चाळून घ्या आणि सोबतच याच पिठीसाखर मध्ये तुम्ही इलायची ऍड करू शकता किंवा इलायची चे दाणे पिठीसाखर सोबत काढून घेऊ शकता.

★आता हे थंड झालेलं दोन्ही मिश्रण व्यवस्थितपणे समान पोर्शनमध्ये एकत्र मिक्स करून घ्या.
आणि तयार झाला आहे तुमचं पारंपारिक करंजीचं फिलिंग.


★आता हे सगळं करत असताना तासभर अगोदर एक पाव मैदा आणि त्याचा चौथा भाग रवा , त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं गरम तूप घाला नंतर पाण्याच्या मदतीने एक मस्त सॉफ्ट डो बनवून घ्या. आणि तो एका पॅक भांड्यात बाजूला ठेवा.

★एक दीड तास रेस्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा मळून घ्या आणि पापडी बनवण्यासाठी आता हा डो तयार आहे.

★अगदी अर्ध्या  लिंबाच्या आकाराचा गोळा तोडून घ्या आणि अंडाकृती लाटी बनवून घ्या हातावर ही लाटी टाकून त्यामध्ये आपण बनवलेली पिठी ऍड करा.

★कडांना काडीच्या सहाय्याने पाणी लावा आणि करंजी मस्त आकारात जोडून घ्या.
अशाच पद्धतीने सगळ्या करंजी बनवून एका कपड्याखाली झाकून ठेवा खाली सुद्धा कपडाच हवा.

★काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे की ह्या बनवलेल्या करंज्यांना हवा लागता कामा नये मग पापडी कडक होते आणि ती हवी तशी फुलणार नाही किंवा  फाटून जाईल.

★आता करंजी तळत असताना सर्वात अगोदर तेल गरम करण्यासाठी ठेवा.
तुम्ही तूप किंवा वनस्पती घी देखील वापरू शकता पण करंजीवर जे छोटे छोटे बबल्स दिसतात ते तेलामुळे येतात आणि त्यामुळे एक परफेक्ट लोक इथे पाहायला मिळतो.

★आता तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम करा आणि चार किंवा पाच करंजी एका टाईमला कढईत घाला फक्त काही सेकंदाच्या कालावधीत करंजी बनवून तयार होते म्हणून घाई घाई ह्याला पलटत चला.

★झाल्याच्या सहाय्याने वरून तेल टाकलं की मस्तपैकी फुगे म्हणजेच बबल्स करंजीवर तयार होतात आणि ही परफेक्ट करंजी खाण्यासाठी रेडी आहे


★आता काही लोकांचा अपवाद असेल की अशी करंजी आम्ही पाहिलेली नाही किंवा ऐकलेली नाही तर सुक्या मेवांची करंजी किंवा ज्याला हिंदीमध्ये गुजिया म्हणतात ती कशा पद्धतीने बनवायची त्यासाठी कृती आपण पाहूयात.


★तुमच्याजवळ उपलब्ध असणारा सगळ्या सुकामेवा तुपात भाजून घ्या नंतर ग्राइंडर मध्ये फिरवून घ्या त्याच्या सेम कॉन्टिटी मध्ये किंवा त्यापेक्षा कमी साखरची पिठी त्यामध्ये ऍड करा आणि वर सांगितलेल्या पद्धतीने फिलिंग करा.

★जर यापेक्षा दुसरी पद्धत तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर सगळे सुके मेवे तसेच  तुपात भाजून ग्राइंडर मध्ये फिरवून घ्या आणि मैद्याच्या थोड्या जाड्या लाटणी मध्ये ही फिलिंग भरा.

★दुसरीकडे कढई तापवून त्यामध्ये साखरेचा पाक बनवा अगदी गुलाब जामुन बनवण्यासाठी जो साधा पाक आपण बनवतो तोच पाक यासाठी वापरा लो फ्लेमवर पाच दहा मिनिट करंजी चांगल्या प्रकारे फ्राय होऊ द्या आणि नंतर ह्या पाकात सोडा यामध्ये तीन-चार मिनिट रेस्ट केल्यानंतर बाहेर काढून घ्या आणि अशा पद्धतीने तुमची करंजी रेडी आहे.

★सोपं सांगायचं झालं तर मैद्याच्या पापडी मध्ये आपल्या आवडीच्या मेरे मिठयांना भरून जो गोड पदार्थ बनवला जातो त्याला करंजी म्हणतात तुम्ही तुम्हाला हव्या त्या टेस्ट आणि फ्लेवर मध्ये करंजी ही रेसिपी बनवू शकता.
0