Login

टोपली करवंदाची

आपल्या आजूबाजूला नेहमी अनेक कथा सुरू असतात त्यातूनच उचललेली एक भावस्पर्शी कथा.


#बस स्टॉप वरची आठवण

बस स्टॉप वरच्या अनुभवांना खरतर सीमाच नाही.
प्रत्येक वेळी तिथे गेल्यावर तिथल्या गर्दीत ,गोंधळात काहीतरी असं असतं जे मनाला स्पर्शून जातं.
मग ते खूप वेगवेगळ्या प्रकारच असतं.
अचानक गर्दीत एखादा लहान लेकरू रडताना दिसतं आणि त्याच्यावर दया येते.
कधी ओसाड पडलेल्या बस स्टॉप वर फारच थोडे जण असतात आणि ती शांतता देखील नकोशी वाटते.
\" बस \"आली की धावत जाणाऱ्यांच्या गर्दीत कुणाची पर्स, कुणाचा चष्मा, तर कुणाची वॉटर बॉटल इतरांच्या पायाखाली येते आणि ती शोधता शोधता जीव नाकीनऊ येतो.
आपल्या भारताची तर गोष्टच वेगळी,,,बस थांबली की अर्धे जण गर्दी करून वर जाण्यासाठी धावपळ करतात तर अर्धे जण स्वतःच मफलर ,रुमाल किंवा बॅग विंडो मधून आत टाकून स्वतःची जागा सिक्युअर करतात.....आणि त्यांना जागा मिळते सुद्धा... हे मात्र दुसरीकडे कुठे होणार नाही
एखादा व्यक्ती बस स्थानकावर एका कोपऱ्यात बसून जेव्हा ही सगळी मजा पाहतो ना, तेव्हा त्याला असंख्य कहाण्या आणि हजारो नवे नवे अनुभव पाहायला मिळू शकतात.
मोबाईल मध्ये गुंतून पडलेल्या एखादा व्यक्ती असो की ,,, कामावर जाणारी धावपळ करणारी मंडळी,, बस येत नाही म्हणून चिडणारे असोत की कुठे चाललोय हेसुद्धा माहीत नसणारे काही महानुभाव.
प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्टोरी लपलेली असते.
शाळेसाठी जेव्हा मी सुद्धा बस ने जाते..नेहमी एका तरी अनोळखी व्यक्ती सोबत बोलते ...का, माहिती नाही.
खूप वाईट आहे हे. पण माझा छंद आहे.
मैत्रिणी ओरडतात सुद्धा कधी कधी पण खरं सांगू काहीतरी वेगळं ऐकायला मिळत आणि आपण आपल्या लोकांसोबत असं काही शेअर करू शकणार नाही असं काही तरी तो स्ट्रेंजर व्यक्ती आपल्यासोबत शेअर करतो.
पुरे आता एक अनुभव सांगायचा होता आणि मी इतकी बडबड केली अनुभवाकडे वळायचं झालं तर आजचा ताजा आणि विचित्र अनुभव.
कॉलेज मधून बाहेर पडलो तेव्हा कडाक्याचं ऊन होतं आणि बस स्टॉप वर पोहोचेपर्यंत हवा वादळ आणि टपटप बरसणाऱ्या सरी सुरू झाल्या.
गावी येण्यासाठी दुसरे वाहन नव्हतं म्हणून आम्ही सगळा ग्रुप एका कोपऱ्यात, जागा सापडून बसून राहिलो.
माझा मोबाईल घरी विसरला होता म्हणून अचानक एका मित्राचा मोबाईल घेऊन मी फोटो काढायला सुरू केलं,, त्याने हातातून हिसकावून घेतला ती गोष्ट वेगळी कारण त्याला त्याचं  मोबाईल स्टोरेज भरू नये ही भीती होती.
पाऊस येत होता आणि सगळे जण आत येऊन बसले होते ‌.
मी मात्र इतक्या गर्दीत सुद्धा कुठेतरी एक स्टोरी शोधत होते आणि ती भेटली पण...
डोक्यावर दोन साडीच्या कपड्याने बांधलेले टोपले घेऊन दोन बायका अर्धवट भिजलेल्या आत आल्या.
का रे पोरांनो+_#**जाणारी बस गेली की आहे.

अहो काकू,, तू मला काय विचारत आहे ,,तिकडे चौकशी कक्षात विचाराना.. आमचा रस्ता तो नाही तर तिकडच्या बसेस माहिती नाही.
आमच्याच मित्रमंडळी पैकी एक जण म्हटला.

गप ग सखू,, ह्या पावसाला थोडं निवांत होऊ दे मग निघू यात घरी... उन्हातानात तपून अंग गरम झालं होतं या पावसात भिजल्यावर माती इरते तसं वाटतंय.
त्यातली एक बाई दुसरीला म्हटली.

अवं मावशी संध्याकाळी भाकरी ला उशीर होतं... आणि अशा वार उधाणाची लाईन बी जाते.. संध्याकाळच्या आत करून ठेवलं म्हणजे निपचित पडता येतं आरामात.
दुसरीने उत्तर दिलं.

मला तर घरी जावस वाटत नाही सखू... बघ ना आज भी करवंद पूर्ण विकल्या गेले नाही.
तुझ्या टोपली सारखी,,,ही पण टोपली रिकामी झाली असती तर आजची चिंता मिटली असती .
तसं मी दोन माणसांना खायला लागते काय.
अगदी हताश होत ती बाई त्या टोपली कडे पाहत म्हटले.

दुसरी ने सुद्धा तिच्याकडे हुंकार भरत पाहिलं आणि भिजलेल्या पावसापेक्षा जास्त पूर त्या दोघींच्याही डोळ्यात दिसत होता.
अश्रू नव्हते मुळीच पण दाटून आलेल्या लहरा काही कमी नव्हत्या.

छकुला अचानक काय सुचलं माहिती नाही आमच्या पासून थोड्याच अंतरावर बसल्या होत्या मागे वळून म्हटली,,, शाळेची लेकर ना तुम्ही ,,करवंद खाणार का बाळांनो??
सकाळपासून वीस रुपयात पाव किलो विकत आहोत तुम्हाला दहा दहा रुपयाचेच देऊ. सगळ्यांकडे पाहत ती बाई म्हटली.

ग्रुप मध्ये सगळ्यांनी कुजबुज केली आणि पावसाने भिजले असतील,,,गारा  झाला असेल त्यांचा स्वच्छ नसतील आणि त्या बायकांचे कपडे पाहीले... किती फाटके ते आणि पावसाने पुर्ण
अंग सुद्धा भिजलय त्यांचं.
ह्या आणि अशा खूप सारा वर्णनात्मक गोष्टी करून शेवटी  नाही घ्यायचं असं ठरलं.
कोणी काही बोललं नाही... आता मी काही हिरोईन नव्हते त्या सीन ची की मी जाऊन विकत घ्यावे आवडत नाहीत मला करवंदं ......इच्छा खूप होती पण,, सगळ्यांच्या गप्पा ऐकून मी सुद्धा माझं मन मारलं.
खूप वाटत होतं जाऊन विकत घ्यावे पण सगळ्या जणांनी पुन्हा चिडवायला सुरू केलं असतं..की आम्ही नाही म्हटलं की तुला हिरोगिरी करायला मजा येते.
मी सुद्धा गप्पच राहिले.

थोडावेळ त्यांच्या अशाच संसारिक गोष्टी ऐकू येत होत्या....आज पहिल्यांदाच पावसापेक्षा इंटरेस्टिंग त्यांच्या गप्पा वाटत होत्या आणि शेजारी मैत्रिणी बडबड करत होत्या पण तो आवाज येत नव्हता येत होता तो फक्त त्या दोघींच्या मधल्या संवादाचा आवाज.
खूप काही होतं ....कुणाचं लग्न त्यासाठी अहेर ,,, दिवसभर जमा करून आणायला की ती उन्हात गेल्या आणि पायातली चप्पल कशी फाटली,, दुसरी चप्पल घ्यायला पैसे कसे जमवणार.. घरी दोन बकऱ्यांची पिल्लं आहेत त्यांना नवऱ्याने पाणी पाजलं असेल का (दारू पिऊन पडलेला असतो तो दिवसभर म्हणून)
एकी ची मुलगी बाळंतपणासाठी घरी येईल तर घरात राशन शिल्लक आणावा लागेल म्हणून गळ्यात घाछलेलीपोथ गहाण ठेवणार... आणि असल्या अजून खूप साऱ्या गोष्टी.
हरवल्यासारखं झालं त्या सगळ्यांमध्ये आणि पाऊस कधी वाढला कळलच नाही...
आम्हाला इथून सात च किलोमीटर दूर जायचं होतं संध्याकाळ झाली तरी चिंता नव्हती,, म्हणून आम्ही सगळे बिनधास्त होतो पण त्यांचं गाव खूप दूर होतं.
हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून येथे बाजार चांगला असतो म्हणून तेवढ्या टोपल्यात त्यांची करवंद विकायला,, एसटीचा स्वस्त भाड्यात त्या इथपर्यंत पोहोचल्या.
त्यांच्या गप्पा ऐकल्या नंतर राहवलं नाही आणि मी चौकशी कक्ष समोर जाऊन त्यांनी सांगितलेल्या गावाला जाणारी बस कधी येणारे विचारलं आणि त्यांना ऐकू येईल इतक्या मोठ्याने मागे फिरून सांगितलं.

अरे राघव #**++ या गावाला जाणारी पाच मिनिटांनी बस लागणार आहे.त्यानंतरची बस रात्री सातला आहे. पावसामुळे लेट होऊ शकते.
आता हे चुकून घडलं कसं घडलं मला माहिती नाही .
मित्रांनी परत एक ऑकवर्ड लूक देत माझ्याकडे पाहिलं पण एवढं मी सहन करून घेतलं.

त्यांना गोष्ट समजली होती आणि बस लागताच सगळ्या गर्दी सोबत त्या दोघींनीही धाव घेतली.
त्या मावशीच्या पायातली चप्पल खरच खूप फाटकी होती वाटतं दुसऱ्याचा पाय त्यांच्या वर पडला आणि त्यांच्या डोक्यावर साडीने घट्ट बांधलेला ते टोपलं खाली निसटला आणि अचानक सुटलं ही...
एका क्षणासाठी तर मी विचार केला हे खरंच माझ्या स्टोरीमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी आहे का.
ही गंमत पण खरंच ,, त्यांची उरलेली करवंद खाली पडली आणि त्या पावसात कित्येकांच्या पायांनी ती तुडवलेल्या गेली.
दुपारच्या किती उन्हात त्यांनी आणली असतील ती घरी आणि दिवसभर किती जपलं असेल त्यांच्या जेवणाची सोय लावणारी शिदोरी होती.

परत एकालाही हात लावता आला नाही रिकामी टोपली उचलून घाईघाईत कसबसं लुगडं कमरेला खोचून त्या मावशी बसमध्ये बसल्या..... बस निघून गेली परत स्थानक रिकामं होतं 24 होत्या यात माणसं चढत उतरत होती ती जागा मात्र कमी झाली आणि पावसाच्या सरी तिथे जोरात पडू लागल्या.
मला सापडलेली स्टोरी इथे संपली होती पण अनुत्तरित राहिलेले प्रश्न अजूनही डोक्यात फिरत आहेत.
किती विचित्र बाब आहे ना खरंच,, आम्ही सहजासहजी भिकारी सापडला की त्याला पाच दहा रुपये देतो.
आपण सगळेच देतो. मंदिरात देवाच्या पाया पडायला गेलो की पन्नास ची नोट कधी पेटीत जाते कळतही नाही.
दररोज ची आईस्क्रीम पाणीपुरी यावरचा खर्च तर अमाप असतो.
पण अशा एखाद्या गरजू ची योग्य रीतीने मदत करणे का अशावेळी सुचत नाही.... ती आजी गेल्यानंतर काय काय फिरून गेलं माझ्या डोक्यात ते शब्दात व्यक्तही करू शकत नाही.
खूप वेळा असं सुद्धा पाहायला मिळत बसमध्ये की खुप सारी गर्दी पडलेल्या आणि खूप सारी चिल्लर कंडक्टरला एखादी व्यक्ती देतो दोन रुपये कमी पडले की कंडक्टर ओरडतो.....खूप वेळा माझ्या मनात येतं की इतकी भरगच्च भरलेली एसटी एकाचा भाडं नाही घेतलं तर त्या कंडक्टरचा काय बिघडणार.....
"एसटी महामंडळाकडे पगार वाढीसाठी भांडण करतात आणि एवढीशी सुद्धा चिटिंग करत नाहीत खरंच सगळे जण गरिबांना खायला उठलेत. "असं परखड बोलणं अचानक डोक्यात येतं... हे सगळं का कसं प्रत्येक जण जो रोजच्या भाकरीसाठी खूप मेहनत करतो त्याच्यासाठी आपण खरच काही करू शकतो का...??
त्या आजी आणि मावशी सारख्या अजून भरपूर असतील ना ??
आता त्यांच्या घरी जेवण बनला असेल ना??
किती मेहनत वाया गेली आणि करवंद....त्यामुळे डोळे तर पाणावले अअसतीलचना ??
एसटीत बसल्यावर भिजलेल्या अंगात आणि अर्धवट रिकाम्या राहिलेले पोटात परत चिंतेच्या वेदना उठल्या असतील ना.....??
खूप काही राहिलाय शिल्लक माहित नाही कस लीहावं.