करावे तसे भरावे

आपण जे पेरणार आहोत तेच उद्या उगवणार आहे


मानव आणि इतर प्राणी यांच्या मधला संघर्ष परत एकदा समोर आलाय. गर्भार असलेली हत्तीण भुकेने व्याकुळ होऊन मानवी वस्तीत आशेने आली होती.पण तिला फटाक्यांनी भरलेलं अननस/ फणस खाऊ घातलं किंवा तिने ते खाल्लं अस समजू ..काहीजण असही म्हणत आहेत की असे प्राणी मानवी वस्ती मध्ये येऊन त्रास देतात म्हणून अशी खबरदारी घेतली जाते ते तिने स्वतःहून खाल्लं. ही घटना केरळमध्ये घडली..! जरी अस समजलं की तिला जाणीवपूर्वक दिल नाही तिने खाल्लं असेल तरीही कुणी दिलाय हा हक्क आपल्याला...???
पहिल् अतिक्रमण कुणी केलाय कुणाच्या वस्तीत...प्राणी स्वतःहून आले का जंगलाच्या बाहेर...आपण जंगल नष्ट केली तर ते बाहेरच येतील ना???
आपण इतके दरिद्री आहोत पण त्यापेक्षाही पाशवी आहोत...! तिची भूक नाही भागवता आली नाहीच पण तिला वेदना मात्र दिली..आणि तिच्या गर्भाला..! आपले किती नखरे असतात गरोदरपण म्हणजे दुसरा जन्म वैगरे...म्हणजे खरंच आहे पण हाच नियम तिलाही लागू होता..प्राणी सगळं स्वतःच स्वतः निस्तारतात...ते स्वावलंबी आहेत.. ना कुठला डॉक्टर लागत...ना सुईण की अजून काही..हे पूर्वी माणसाठी ही असच होत...आपण काही फार अवलंबून नव्हतो वैद्यकीय सेवांवर..सगळं घरात सुलभ होत होतं काही अपवाद वगळता...पण आपण जितके निसर्गाला दूर करू तितका तो आपल्याला दूर करेल..आहेस ना तु मोठं स्वावलंबी आणि बुद्धीमान मग निस्तर तुझं तु..!
तिचा विश्वास तुटला तिने वेलीयार नदीत जलसमाधी घेतली..बाहेर काढायला आलेल्या माणसांवरही तिने विश्वास दाखवला नाही..! आज एक जनावर दाखवून गेलं की "तुम्ही माणसं जे जनावरासारखं वागू नको म्हणता ना ते किती फोल आहे. उलट निदान आमच्याइतकं तरी चांगलं वागा..!"ती उधळली असती तर सहज खूप काही करू शकली असती....पण स्वतःच्या वेदनेवर सूड हा एकमेव मार्ग नसतो हेच ती दाखवून गेली...!
या आधीही अश्या अनेक प्राण्यांच्या हत्या होत असतात... काही दिवसांपूर्वी वाघाची हत्या झाली होती . ते मानवी वस्तीत येतात म्हणून..पण शिकार करायला म्हणून आजही किती माणस जंगलात जातात..
घरी आलेल्या सापाला तरी आपण जीवंत जाऊ देतो का...?? तो चावेल म्हणून आधीच मारतो पण कुठलाच प्राणी ( माणूस सोडून ) आपण त्याला त्रास दिला तरच स्वसंरक्षणासाठी प्रतिकार करतो.
उगाच काही हे असे साथीच्या रोगाचे तांडव नाही माजलेय..उगाच काही ही वादळ सुसाट वाहत आहेत...?? तो विधाता ही आज हळहळला असेल...!
"इतकं काही घडवून.. सार जग थांबवून ही मी माणसातला क्रूरपणा थांबवू शकत नाही ..!!"
एक दिवस कदाचित तो आपल्या सगळ्या मानवाना संपवून ही पृथ्वी त्या निरागस प्राण्याच्या हाती सोपवेल...!
अशी कृत्ये होतात... त्याची फळे मात्र सगळ्या मानव समूहाला भोगावी लागतील...आम्ही नव्हतो गेले मारायला असे म्हणून आपण काही यातून वेगळे नाही होऊ शकत...!
पेरलं तेच उगवणार आहे आणि करू तसेच भरावेही लागणार आहे...!!
????????????