कर्दळीवन - गाथा जंगल सफरीची (भाग - दोन)

कर्दळीवन चा पुढील भाग


प्रसाद आपली बाईक साईडला पार्क करतो. आणि कार जवळ येऊन काचेवर टक टक करतो तोच काच उघडली जाते. प्रसाद त्यांना विचारतो.
"नमस्ते, मी प्रसाद कुलकर्णी तुमचा ड्रायव्हर म्हणत होता तुम्ही मला बोलावत. काही काम होत का?"
कारमध्ये बसलेले स्वामी आनंदगिरी (नाव काल्पनिक आहे). म्हणतात.
"हे माझं व्हीझीटिंग कार्ड. काम मला नाही पुढच्या काही दिवसात तुलाच माझ्याशी पडणार आहे. तुझा देवावर विश्वास नाही न येत्या काही दिवसात तुला खूप काही अनुभव येणार आहेत. एक अपूर्ण राहिलेलं काम आहे जे तुला पूर्ण करायचं आहे. आपण लवकरच भेटुत."
एवढं बोलून स्वामी आपल्या कारची काच लावून घेतात. आणि तेवढ्यात सिग्नल सुटत.
प्रसाद मात्र कारकडे नुसताच एकटक बघत उभा असतो. कार कधीच निघून गेलेली असते याची पण त्याला शुद्ध नसते.
काही क्षणा नंतर...
तिथे गाड्यांचे हॉर्न वाजू लागतात तेव्हा तो भानावर येतो. आणि भांबावलेल्या स्थितीत घामाघूम झालेला प्रसाद तशीच आपली गाडी काढतो आणि थेट आपलं घर गाठतो.
तो पर्यंत त्याच्या घरचे सगळे आलेलेच असतात. आणि त्याची वाट पहात असतात. सगळ्यांना आलेलं बघून एक क्षण आपण काय बोलाव हेच त्याला सुचत नाही.
त्याची अशी भांबावलेली स्थिती बघून नयनला (प्रसादची आई) त्याची खूप काळजी वाटते आणि ती त्याला विचारते.
"बेटा, काय झाल कुठे गेला होतास इतक्या रात्री. शेजारच्या काकू सांगत होत्या तुझी तब्येत ठीक नाही म्हणून काही तरी बोल बेटा."
प्रसादच तिच्या बोलण्याकडे लक्षच नसत. तो आपल्याच विचारात मग्न असतो. तेवढ्यात त्याचे वडील अविनाश त्याला भानावर आणत विचारतात.
"अरे, प्रसाद तुझ्याशी आई काही तरी बोलतीये कुठे लक्ष आहे तुझ."
वडलांचा आवाज ऐकून प्रसाद भानावर येतो आणि दिवसभरात घडलेला प्रकार सांगतो.
हे ऐकताच सगळेच विचारात पडतात.
काही वेळा नंतर...
न रहाऊन प्रसाद विचारतो.
"आज्जी, लहानपणा पासून हे स्वप्न पहातोय तुम्ही बऱ्याच जणांना माझी पत्रिका दाखवलीत सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली \"सगळ काही छान आहे\" मग तरी अस का होत आहे. आणि आपल्या घरात कुठल काम अपूर्ण राहील आहे का?"
हे ऐकताच सगळ्यांनाच प्रसादची काळजी वाटू लागते. आणि हळूच नयन अविनाशला म्हणते.
"अहो, जे आज पर्यंत आपण प्रसादला सांगायच टाळत आलोय तेच त्याच्या समोर आलय. म्हणजे त्याला सत्य सांगायची वेळ आली आहे की काय."
नयनच्या बोलण्याने सगळ्यांच्याच मनात एक भीती निर्माण होते. आणि त्यामुळे पूर्ण घरात एक क्षण शांतता पसरते.
काही क्षणानंतर...
विषय बदलायचा म्हणून प्रसादच्या आज्जी सुलक्षणा बाई म्हणतात.
"चला, सोडा आता तो विषय. पोरग किती थकून आलय बघा. (प्रसादला) बाळा जा आता जास्त विचार करू नकोस फ्रेश हो मग बघूत आपण (बाकीच्यांना) तुम्ही सुद्धा फ्रेश व्हा जा आपापल्या खोलीत."
सुलक्षणा बाईचं बोलण ऐकताच सगळे शांत होतात आणि आपापल्या खोलीत निघून जातात. पण प्रसादला सगळे आपल्या पासून काही तरी लपवत आहेत याची जाणीव होते. आणि तो मनाशीच ठरवतो.
"आता काही झालं तरी चालेल. पण आपण या सगळ्याचा शोध घ्यायचाच. माझा देवांवर विश्वास नाही आहे पण हे ही तितकच खर आहे. जो पर्यंत मी या स्वप्नाचा आणि त्या अर्धवट कार्याचा छडा लावत नाही तोपर्यंत मला हे स्वप्न पडतच राहणार आणि हे सगळ थांबवायचं असेल तर मला शोध घ्यावाच लागणार."
आणि असा विचार करून आपल्या खोलीत निघून जातो.
त्याच दिवशी रात्री...
त्याचा डोळ्याला डोळा लागत नाही. तो रात्रभर घरच्यांनी लपवलेल्या सत्याच्या विचारात असतो. बऱ्याच वेळा नंतर त्याला झोप लागते.
त्याच वेळी...
तो पुन्हा त्याच जंगलातून चालत असतो. एक सारखा पुढे पुढे जात असतो. बरच अंतर पार केल्या नंतर परत त्याचे पाय एका ठिकाणी येऊन थांबतात. पण यावेळी त्याच्या समोर त्याचच रूप असत. ती व्यक्ती त्याच्याकडे स्मित हास्य करून बघते. तेजस्वी डोळे प्रसन्न चेहरा आणि त्यांचं मोहित करणार हास्य बघून प्रसाद त्यांच्याकडे बघतच रहातो. व त्यांना विचारतो.
"आपण कोण आहात? अगदी माझ्या सारखेच दिसत आहात."
ती व्यक्ती सांगते.
"मला नाही ओळखलस. मी तुझे पणजोबा. आपण एकमेकांसारखे दिसतो कारण तु म्हणजे च माझा दुसरा जन्म आहेस."
प्रसादला यावर विश्वासच बसत नाही तो परत त्यांना विचारतो.
"हे कसं शक्य आहे. जर तुम्ही माझ्या रुपात नव्याने जन्म घेतला आहे तर तुम्ही मला कस दिसत आहात. आणि जितकं मला माहित आहे एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो आणि ती व्यक्ती जेव्हा दुसऱ्या रुपात जन्म घेते तेव्हा ती आत्मा रहात नाही. पण इथे तर तुम्ही माझ्या समोर आहात."
ती व्यक्ती स्मित हास्य करत सांगते.
"हीच तर नियती आहे बाळा. या भूतलावर काय घडेल हे कुणीच सांगू शकत नाही इथे तुला अशी अनेक रहस्ये कळतील जे तुला अजून माहीतच नाही आहे. आपण जे वागतो जे बोलतो जे करतो ते आपल्या कडून करवून घेणारे तेच आहेत परम पिता परमेश्वर. तु नास्तिक आहेस हे ही त्यांनीच ठरवलेली माया आहे. आणि आज मी तुला एका अपूर्ण कार्याची आठवण करून द्यायला आलो आहे हे ही त्यांनीच ठरवलेल्या उद्देशामुळे. पण जो पर्यंत तुझा दैवी शक्तींवर विश्वास बसणार नाही तोपर्यंत तुला या सगळ्यांचा अनुभव घेता येणार नाही आणि ते कार्यही पूर्ण होणार नाही. यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील कारण जे कार्य घडणार आहे ते तुझ्याच कडून घडणार आहे आणि हेच सत्य आहे. जे कधीच बदलू शकत नाही."
प्रसाद आता प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकत असतो. तो त्यांना विचारतो.
"पणजोबा आजोबा मग आता मी काय करू."
ते सांगतात.
"बेटा, तु देवावर विश्वास ठेव अस मी आज्जीबात सांगणार नाही. कारण मनुष्य हा बुद्धीजीवी असतो. जो पर्यंत स्वतः पहात नाही अनुभव घेत नाही तो पर्यंत विश्वास ठेवत नाही. आणि नास्तिकता ही सुद्धा अशीच असते. पण जर का तुला यातून बाहेर पडायचं असेल तर तुला अस्तिकते शिवाय पर्याय नाही हे ही तितकच खर आहे. आता हे तुला ठरवायचं आहे अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आणि या चिंतेतून मुक्त होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकायचं की, नास्तिकतेच्या जाळ्यात अडकून रहायच."
एवढ बोलून ते अदृष्य होतात आणि प्रसाद जागा होतो.
दुसरा दिवस...
वेळ सकाळी सात वाजताची...
आजचा दिवस प्रसादसाठी खूपच वेगळा ठरणारा दिवस असतो. कारण नेहमी उठल्या बरोबर हातात आधी न्यूज पेपर घेणारा प्रसाद आज पहिल्यांदा अविनाश आणि नयनच्या पाया पडतो. आज्जी आजोबांच्या पाया पडतो. हे बघून खर तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो पण ते सत्य असत. आयुष्यात ज्याने स्वतः व्यतिरिक्त कुणालाच मान दिलेला नव्हता. \"मी म्हणजे कोण\" अशी त्याची वृत्ती होती तो आज पहिल्यांदा आपल्या आई वडिलां समोर झुकलेला असतो. कारण आता त्याची एक नवीन सुरुवात झालेली असते.

नोट : पण हा त्याचा नवीन प्रवास सोप्पा आहे? नाही बिलकुल नाही. मोठ्यांना मान देण देवाला अगरबत्ती लावण म्हणजे देवावर विश्वास बसला असा त्याचा अर्थ होत नाही तर मनात देखील तसे भाव यावे लागतात. आता हा त्याचा नवीन मार्ग नवा स्वभाव त्याला कुठे नेतो बघूत पुढील भागात.


🎭 Series Post

View all