Login

कर्ज

Pay Loan
मागच्या आठवड्यात एका लग्ना साठी गावी जाण झाल. लग्न तसे हॉल वर असलेमुळे फारसे काम करायला लागत नव्हते. जेवण झाले वर सहज आराम करावा म्हणून एके ठिकाणी बसलो. तेव्हड्यात एक ओळखीचे ग्रहस्थ् भेटले. खूप नाराज दिसत होते. मी मुद्दाम जवळ जाऊन बोलते केल त्यांना. विचारले काय नक्की झालाय .
तेव्हा ते बोले , " देवा मला एक सांग बाप स्वार्थी असतो का रे? त्यानं आयुष्यभर कष्ट करायचे का फक्त? कोणाकडे पैसे मागायचे नाहीत का? "
मी बोलो त्यांना काय झालाय ते सविस्तर सांगा. मग मी काहीतर पर्याय सांगेल.
" मी माझा भाऊ एकत्र कुटुंब आहे तुला तर माहीतच आहे. भावा ची मोठी मुलगी आणी माझा लहान मुलगा दोघे बरोबरचे आहेत. लहानपणा पासून दोघात भेदभाव कधी केला नाही आम्ही.दोघांचं शिक्षण पूर्ण करायला मी माझ्या नावे 6 लाख रुपये कर्ज काढले आहे. जेणेकरून मुले नोकरी ला लागले की परतफेड होईल. आता दोघेपण नोकरीला लागून एक वर्ष झालाय. मुलाला पगार 45 हजार आहे आणी भावा च्या मुलीला 40 हजार .पण झालाय असे की कर्ज फेडायला माझा मुलगा च पैसे देतोय . त्याच्या मुलीला विचारले तर म्हणते पगार पुरत नाही मला. आज लग्न आहे म्हणून मुलगी आलेली तर मी तिला सहज बोलो तुला लग्ना साठी दागिने करायचे आहेत तर एक वर्ष झाले तु पैसे दिलेले नाहीस घरी तर 1 लाख रुपये दे त्यात थोडे पैसे घालून तुला मंगळसूत्र करून ठेवू.ती सरळ भावाला आणी भावजयी ला घेऊन आली त्यांच्या पुढे बोली बघ काका माझ्याकडे पैसे मागत आहेत. भावजयी बोली मला माझ्या मुलीकडून एक रुपया ही मागायचा नाही. लाज वाटते का मुली कडून दागिने करायला आणी कर्ज फेडायला पैसे घेताय?
माझं काय चुकले? आयुष्यभर कष्ट केल दोघांना शिकवले आता घरच्या पुरुषां नी मुलीकडून पैसे घ्यायचे नाहीत असे काही नियम आहेत का?की कर्ज फक्त मुलांनी फेडायचं आणी मुलींनी स्वातंत्र्या च्या नावाखाली उधळपट्टी करायची. कर्ज दोघांना शिकायला काढलाय तर परतफेड पण समान व्हायला हवी न? मी माझ्या चैनी साठी थोडीच पैसे मागतोय?असे बोलताना त्यांना जरा तर काही वाटले नाही का की माझ्या मनाला काय वाटेल?"
मी क्षणभर शांत झालो ऐकून.त्यांच्या चेहऱ्या कडे पाहिले तर डोळे पाण्याने भरले होते. साहजिक च आहे हे एवढे कष्ट करून मुलीला शिकवले त्याची जाण न ठेवता जर आपलीच माणसे लायकी काढत असतील तर कोणत्या पुरुषां च्या डोळ्यात पाणी येणार नाही. तसे ते बोले ते पण चुकीचं नाही . लहान पणा पासून दोघात भेदभाव केला नाही तर आता तरी का करावा. मुला सारखं मुलीला शिकायला पैसे कर्ज कडून पैसे दिले तर त्याची परतफेड करणे पण तिच काम आहे. किंबहुना तिच्या आई वडिलांनी तसे तिला पण सांगायला पाहिजे की तु पैसे दे घरी .फक्त मुलावर च अन्याय का? स्वतःची आई जर अशी बोलत असेल माझ्या मुलीकडून एक रुपया चा हिशेब घ्यायचा नाही तर मुलगी ते कसे देईल?
" हे बघा जे झाल ते झाल . आता त्यांच्याकडे पैसे मागू नका. लांब च्या लांब राहा. तिच्या लग्नाचं तिचे आई वडील बघतील. तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्या. कर्जफेड झाली की त्यांच्या समोर स्वतःच्या होणाऱ्या सुनबाई ना दागिना करून ठेवा. मग त्यांना कळेल आपण किती मोठी चुक केलीय ती. जी मुलगी 40 हजार पगार असून एका वर्षात 1 लाख रुपये जर सेविंग करत नसेल त्याला जबाबदार तुम्ही नाही तिचे आई वडील आहेत. त्यामुळे जे झाल ते झाल टेन्शन नका घेऊ. जमले तर वेगळे राहा आता म्हणजे पुढचा खर्च टळेल ."
मी बोललो कदाचित त्यांना पटले सुद्धा . त्यांनी डोळे पुसले आणी हसून बोले हा बरोबर बोलास तु .मी असा विचार केलाच नव्हता. होणाऱ्या सुने ला लेकी सारखं दागिने करून ठेवले तर उलट आनंद च आहे मला. आता तसेच करेन. माझा आणी त्यांच्या काही संबंध नाही असेच वागेन आता."
हॉल बाहेर जाताना त्याच मुलीची आई कोणाला तर सांगत होती . " माझ्या मुलीला 40 हजार पगार आहे. त्यामुळे तिचा नवरा पण चांगला लाखभर रुपये पगारा चा असावा."
मी फक्त ऐकून मनात हसलो. पैसा आला की माणसाच्या इचछा वाढतात ते ठीक आहे पण ज्याच्या कष्टा च्या जीवावर हे सर्व झाले त्याला दुःखी करून तुम्ही सुखी व्हाल च कसे?

0