ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी (संघ कामिनी)
लघुकथा फेरी (संघ कामिनी)
शीर्षक- कर्म चुकत नाही...
आज नवरात्रीचा पाचवा दिवस होता. मीनाक्षीच्या मनात घालमेल सुरू होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तिच्या आईचा म्हणजेच नंदा बाईंचा नऊ दिवसांचा उपवास होता. मीनाक्षीच्या लग्नाला दहा बारा वर्ष झाली होती, पण तिने एकदाही आईसाठी नवरात्र फराळ वाढून नेला नव्हता. तिच्या दोन्ही नणंदा मीनाक्षीच्या सासूबाईसाठी कालच फराळ घेऊन आल्या होत्या. नाही म्हटलं तरी मीनाक्षीला देखील आईसाठी फराळ न्यावा वाटतं होता. एकुलत्या एका लेकीने चालीरीती पार नाही पाडल्या तर माहेरचे लोकं काय बोलतील... तिला मान्य होतं इतकी वर्ष तिचा संसार गरिबीचा होता पण आज परिस्थिती वेगळी होती. दोघेही जॉब करत करत होते. पैश्या अडक्याने घर समृध्द झालं होतं...
"काय झालंय मीना? इतकी का टेन्शन मधे आहेस?" गिरीशने विचारले.
"अहो... यावर्षी तरी आईला नवरात्रीचा फराळ न्यायचा का?" मीनाक्षीने चाचरत विचारले.
"मीना... तुला आधीच मी कितीतरी वेळा बोललोय. मला या प्रथा अजिबात आवडत नाहीत. फक्तं आईसाठी हे सगळं मी सहन करतोय. ताईला देखील किती वेळा समजावून, रागावून सांगितलं तरी ती ऐकत नाही. काय गरज आहे हे सगळं करण्याची? तू फराळ नाही नेलास तर कोणी उपाशी राहत नाही. तरीही तुला जायचं असेलच तर तू जाऊ शकतेस" गिरीश खूपच रुडली बोलला होता. साहजिक मीनाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. गिरीशला आणि तिला स्वतःला देखील चांगलच माहिती होतं ती एकटी कधीचं कूठे जात नव्हती. तिची डिलिव्हरी झाली तेव्हा किती आणि काय केलं होतं तिच्या आई बाबांनी... ती त्यांच्यासाठी इतकही करू शकत नव्हती...
"अहो... यावर्षी तरी आईला नवरात्रीचा फराळ न्यायचा का?" मीनाक्षीने चाचरत विचारले.
"मीना... तुला आधीच मी कितीतरी वेळा बोललोय. मला या प्रथा अजिबात आवडत नाहीत. फक्तं आईसाठी हे सगळं मी सहन करतोय. ताईला देखील किती वेळा समजावून, रागावून सांगितलं तरी ती ऐकत नाही. काय गरज आहे हे सगळं करण्याची? तू फराळ नाही नेलास तर कोणी उपाशी राहत नाही. तरीही तुला जायचं असेलच तर तू जाऊ शकतेस" गिरीश खूपच रुडली बोलला होता. साहजिक मीनाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. गिरीशला आणि तिला स्वतःला देखील चांगलच माहिती होतं ती एकटी कधीचं कूठे जात नव्हती. तिची डिलिव्हरी झाली तेव्हा किती आणि काय केलं होतं तिच्या आई बाबांनी... ती त्यांच्यासाठी इतकही करू शकत नव्हती...
अभ्यासाला बसलेल्या चिऊच मात्र सगळं लक्ष दोघांच्या बोलण्याकडे होतं.
***
***
दुसऱ्याच दिवशी मीनाक्षी छान तयार झाली होती. तिने घरातील कामे आवरली. आजतर चिऊला शाळेत देखील पाठवलं नव्हतं.
"सूनबाई... आज कूठे निघालात? ऑफिसला तर सुट्टी आहे ना?... " सासूने हटकून विचारलं.
"सूनबाई... आज कूठे निघालात? ऑफिसला तर सुट्टी आहे ना?... " सासूने हटकून विचारलं.
"आई... मी माहेरी जातेय फराळ घेऊन 'आईसाठी'..." सासूबाईंच तोंड काहीस वाकडं झालं.
"अगं पण गिरीशला असल्या प्रथा आवडत नाहीत ना?"
"अगं पण गिरीशला असल्या प्रथा आवडत नाहीत ना?"
"हो नाहीच आवडत त्यांना... म्हणूनच मी आणि चिऊ निघालो आहोत."
"अगं पण असं एकटीने जाणं शोभेल का?"
"आई काल वहिनी एकट्याच तर आल्या होत्या ना?"
"मीना... ऊगाच वाद घालू नको सकाळ सकाळ..." नुकताच उठलेला गिरीश म्हणाला.
"म्हणजे मी वाद घालते आणि तुम्ही? तुम्ही स्वतःच्या मनासारखं वागून बोलून मोकळं होता. नेहमी मला गृहीत धरून चालता त्याच काय? नेहमी मीच माघार घ्यायची... मी काही घर विकायला नाही निघाले फक्तं प्रेमाने, आपुलकीने एका लेकीच कर्तव्य पार पाडायला जात आहे. त्यासाठी, त्या साध्या फराळासाठी इतका आकातांडव?" मीनाक्षी शिकली सवरलेली असूनही लग्न झाल्यापासून सासरी प्रत्येकाचं मनं सांभाळत आली होती भले तिला स्वतःच मन का मारावं लागेना; पण आज ती गप्प बसणार नव्हती कारण गेली दहा वर्षे ती हेच ऐकत होती.
"खरंतर मला तूझ्या घरी यायची मुळीच ईच्छा नाही. काय दिलं मला आपल्या लग्नात काहीच नाही दिलं. मी आहे म्हणून गप्प आहे." गिरीशचा राग सातव्या आस्मानावर होता.
"पण गिरीश तुम्ही तर या चालीरीती, परंपरा, प्रथा यांना कधीचं मानत नाही ना? मग तुम्हाला हुंडा दिला काय अन् नाही दिला काय... काय फरक पडणार आहे? ... नाही का?" मीनाक्षीने त्याच्या वर्मावर बोट ठेवलं होतं.
"बाबा... माझं लग्न झालं ना... मी पण तुझ्याकडे येणारं नाही आणि आईसाठी फराळ पण आणणार नाही." नाही नाही म्हणता चिऊचे शब्द गिरीशला चांगलेच लागले होते. त्या चिमुकल्या जीवानं त्याच्या परिपक्व मेंदूला विचार करायला भाग पाडलं होतं.
***
***
"अगं बाई... मीनू..." आईने मीनाक्षीला पाहतच मिठी मारली. चिऊचे पापे घेऊ लागली.
"जवाईबापू दिसत नाहीत?" आईने मीनाक्षीच्या पाठीमागे बघत विचारलं.
"अगं आई... त्यांना आज ऑफिसच काम होतं खूप म्हणून नाहीत आले." मीनाक्षीने खोटच सांगितलं.
"आजी... बाबा आईशी भांडले. मुद्दाम आले नाहीत." चिऊने मात्र पंचायत केली. नंदा बाई लेकीच्या चेहऱ्याकडे बघू लागल्या पण त्याच वेळी डोळे मोठे करून मीनाक्षी चिऊकडे बघत होती.
"मला समजलं सगळं... अगं ते नको बोलत होते तर कशाला यायचं?"
"आई... मी स्वतः एकटीने आलेय. शिवाय हा माझा स्वखर्च आहे. जाऊ दे ना... ही बघ कशी आहे साडी? तुझ्यासाठीच आणलीय.
"चांगली आहे. मी पाच सुवासिनी बोलावते तू बसं" असं म्हणून आई बाहेर निघून गेली.
थोड्याच वेळात घरात शेजारी बायका जमल्या होत्या. आपापसात कुजबुज सुरू झाली होती.
' नवरा नाही आला.'
'अगं तो खूपच घमंडी आहे.'
'पण निदान आज तरी'
' जाऊ दे आपल्याला काय करायचं.'
हळदी कुंकू झाला. तरी एका बाईने हटकलेच.... "नवरा नाही आला?"
तोच चिऊ आजीची मांडी सोडून धावत दरवाजाकडे गेली.
"बाबा"...
"बाबा"...
दारात उभ्या गिरीशने तिला उचलून घेतलं. बायका खाली मान घालून निघून गेल्या.
"गिरीश!".... मीनाक्षीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं होतं. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच तो तिच्या माहेरी आला होता.
"मीनाक्षी... सॉरी... जरा जास्तच बोललो... पण या चिमुकल्या जीवाने माझे डोळे उघडले. एका हाताने घ्यायचं असलं तरी दुसऱ्या हाताने द्यायच पण असतं याची आज जाणीव झाली. 'कर्म' कोणालाही चुकत नाही. चिऊच्या रुपात देवीने डोळे उघडले.... माफ करा आई..." गिरीशने नंदा बाईंचे पाय धरले.
चिऊच्या मुखातून जणू देवीच वदली होती.
समाप्त!
लेखिका - प्रणाली निलेश चंदनशिवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा