चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
कर्माचे फळ.
" आई, काय गं तू कशाला तिला त्रास देतेस? ती एक तर ऑफिसमधून थकून आलेली असते. काय होतं तिने काम नाही केलं तर? तू आहेस ना थोडी मदत केलीस, तर काय होते?"
ऑफिसवरून आल्या आल्या विनय त्याच्या रडणाऱ्या बायकोची तक्रार ऐकून आईला चिडूनच बोलू लागला.
ऑफिसवरून आल्या आल्या विनय त्याच्या रडणाऱ्या बायकोची तक्रार ऐकून आईला चिडूनच बोलू लागला.
" अरे, पण मी करतेच की घरातली कामं दिवसभर, तिने येऊन थोडं कामाला हातभार लावला तर काय हात झिजणार आहेत तिचे? मी एकट्या म्हाताऱ्या बाईने किती मरमर करायची दिवसभर? तुला दिसत नाही का रे पोरा? हिने येऊन तुझ्या डोळ्यांमध्ये धूळ टाकली की काय? अहो तुम्ही का असे गप्प? बोला काही तरी. बघा कसा आपलाच मुलगा आपल्यालाच हिच्यामुळे बोलतो आहे."
मुलाचं बोलणं ऐकून रमाबाई चिडूनच म्हणाल्या.
मुलाचं बोलणं ऐकून रमाबाई चिडूनच म्हणाल्या.
" विनय, तुझी आई बरोबर म्हणते आहे. काय हरकत आहे सुनबाईने येऊन थोडसं काम केलं तर? किती मुली करतात आणि आईसोबत बोलायची ही कसली भाषा आहे तुझी? लग्नाआधी असा नव्हतास, मग आता काय झालं?"
विनयचे बाबा काहीसे चिडूनच म्हणाले.
विनयचे बाबा काहीसे चिडूनच म्हणाले.
आपले मिस्टर तरी आता आपल्या बाजूने बोलत आहेत, हे समजल्यावर रमाबाईंच्या डोळ्यांमधून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या, त्यामुळे मग घरात आणखीन तमाशा सुरू झाला. त्यांच्यातली भांडणे वाढू लागली. कोणीच ऐकून घेऊन माघार घ्यायला तयार नव्हते.
त्यांच्या घरात आठवड्यातून चार ते पाच दिवस तरी हेच चालू असायचं. होणाऱ्या प्रकाराला नवीन नवरी अगदी वैतागून गेली होती आणि ती तिचा सगळा राग, दुःख विनयकडे व्यक्त करत असे. तो देखील त्याच्या आई बाबांना सांगून, समजावून अगदी वैतागून गेला होता. नवीन लग्न झालेल्या नवरा नवरीचा संसार एका वर्षाच्या आतच तुटतो की काय? असं आजूबाजूच्या लोकांना वाटू लागलं.
विनय आणि सुषमाच्या लग्नाला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले होते. त्यांचा प्रेम विवाह झाला होता. ते लग्नाच्या आधीपासून एकाच कॉलेजमध्ये होते, नंतर एकाच ऑफिसमध्ये एकत्रच काम करत होते. तिथेच त्यांचं प्रेम झाले आणि त्यांनी घरच्यांच्या सहमतीने थाटामाटात लग्न केलं.
विनयला त्याच्या आईचा स्वभाव पहिल्यापासून माहीत होता. त्याचे बाबा त्याच्या आईच्या हो ला हो करायचे काम करायचे. तिच्यापुढे त्यांचं कधीच काही चाललं नव्हतं, पण सून आल्यावर तिच्यात काही तरी बदल होईल ती तिच्याशी तरी प्रेमाने वागेल असा त्याचा समज होता, पण त्याबाबतीत त्याची चूक झाली. त्याची आई काही बदलली नाही, उलट परिस्थिती आणखीनच बिकट झाली.
ज्याप्रमाणे त्याला त्याच्या आई बाबांचा स्वभाव माहित होता, त्याप्रमाणे त्याला सुषमाचा स्वभाव देखील चांगलाच माहीत होता. ती अतिशय चांगल्या आणि संस्कारी परिवारातून आली होती. कोणासोबत उगाच वाद उकरून काढायचा, मोठ्यांशी उद्धटपणे वागायचं हे तिच्या स्वभावातच नव्हतं. ती त्याच्यासाठी त्याच्या प्रेमासाठी तिचं सर्वस्व सोडून त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या घरी आली होती, जर त्याने देखील तिचं ऐकलं नसतं तर तिला तिथे कसलाच आधार नव्हता.
विनयला त्याच्या आई बाबांनी लहानपणापासून अतिशय लाडाने वाढवलं होतं. त्याला कधीच कसलीच कमी पडू दिली नव्हती. तो त्यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी कसलीच कसर सोडली नव्हती. त्यांचं राहतं घर देखील त्यांनी त्याच्या नावे केलं होतं, पण लग्नानंतर त्याच्या वागण्यात त्यांना बदल जाणवू लागला. आणि तो बदल त्यांच्या मनाला बोचू लागला. त्याचा उद्रेक त्यांच्या भांडणात दिसू लागला.
आज पुन्हा काही कारण नसताना त्यांच्यामध्ये वाद पेटला. आजचं त्यांचं भांडण अगदी विकोपाला पोहोचलं. भांडता भांडता त्यांच्या जीभेवरचा ताबा सुटला. नेहमी शांत असलेली सुषमा देखील समोरून उलट उत्तर देऊ लागली. तिच्या घरच्यांविषयी वाईट साईट बोलल्यावर तिचा देखील ताबा सुटला.
" विनय, आत्ताच्या आता हिला घरातून बाहेर काढ, आम्हाला नको ही असली उलट उत्तर देणारी सून. हाकलून काढ हिला घरातून. हिच्यापेक्षा शंभर पटीने चांगली बायको मी शोधून आणीन तुझ्यासाठी."
रमाबाई रागारागाने त्यांच्या मुलाला म्हणाल्या.
रमाबाई रागारागाने त्यांच्या मुलाला म्हणाल्या.
" हो. हो. मला वस्तू म्हणूनच आणले आहे ना तुम्ही घरी, जेव्हा मन करेल तेव्हा घरात आणायचे आणि मन करेल तेव्हा घरातून बाहेर फेकायला. मला बाहेर काढण्यापेक्षा तुम्ही दोघे म्हातारा म्हातारी का नाही जात निघून वृद्धाश्रमात? एकदाची कटकट निघून जाईल घरातून."
सुषमा चिडून सासू सासऱ्यांना म्हणाली.
सुषमा चिडून सासू सासऱ्यांना म्हणाली.
" बघ बघ, ही काल आलेली मुलगी कशी बोलते आहे बघ तुझ्या आई बापाला. आता तरी बोल काही तरी, नाही तर ही तुझ्या आई बापाला घरातून हाकलून काढेल. त्याआधी तूच हिला घराबाहेर काढून टाक."
रमाबाई विनयला म्हणाल्या.
रमाबाई विनयला म्हणाल्या.
"ती अगदी बरोबर बोलते आहे आई, तुम्ही दोघेच निघून जावा वृद्धाश्रमात. माझ्या मित्राच्या ओळखीचे एक वृद्धाश्रम आहे, तिथे मी तुमचं नाव टाकतो. मी तिथे मदत देखील देत असतो. तुम्ही तिथे सुखी राहाल आणि इथे आम्ही देखील."
विनयने त्याचे मत स्पष्ट मांडले.
विनयने त्याचे मत स्पष्ट मांडले.
आपल्या मुलाच्या तोंडून ती गोष्ट ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यापुढे काय बोलावे त्यांना समजेना झाले. त्याच्या आईला रडू कोसळले. मग त्यांच्यामध्ये एकमताने विनयने सांगितलेल्या गोष्टीवर शिक्का मोर्तब झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरातून निघून जाणार होते. त्या रात्री त्या घरात कोणीच झोपले नाही.
दुसऱ्या दिवशी विनय आणि सुषमा त्या दोघांना घेऊन त्या वृद्धाश्रमात घेऊन गेले. तिकडची सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना काही न बोलता ते दोघे तिथून निघून गेले.
ते गेल्यावर आपल्या सामानाच्या बॅग्स हातात घेऊन उदास होऊन रमाबाई आणि आणि त्यांचे मिस्टर त्या वृद्धाश्रमाच्या मुख्य खोलीच्या दरवाजात शिरले. आत शिरताच त्यांनी समोर पाहिले आणि ते थक्क होऊन जागीच थांबले. त्यांच्या हातून बॅगा गळून पडल्या आणि डोळ्यांमधून घळा घळा अश्रू वाहू लागले. बाजूने जाणाऱ्या एका बाईंना थांबवून त्यांनी त्या दिशेला बोट दाखवले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना झाले.
" ते ना. ते आमच्या वृद्धाश्रमाचे संस्थापक आणि त्या त्यांच्या मिसेस. त्यांनी आपल्या जिल्ह्यात बरेच वृद्धाश्रम सुरू केले, त्यातलेच हे एक आहे. त्यांच्यामुळेच तुमच्यासारख्या असह्य आजी आजोबांना हक्काचं छप्पर मिळतं, आपल्या माणसांची सोबत मिळते."
त्या बाईने त्याला माहिती दिली आणि तिथून निघून गेली.
त्या बाईने त्याला माहिती दिली आणि तिथून निघून गेली.
" आई बाबा, तुम्ही दोघांनी आजी आजोबांना असंच त्यांची चुकी नसताना घरातून हाकलवून काढलं होते ना?"
ते त्या फोटोला पाहत असताना त्यांना मागून त्यांच्या कानावर विनयचे बोल ऐकू आले आणि त्यांनी तसंच भरल्या डोळ्यांनी मागे वळून पाहिले.
ते त्या फोटोला पाहत असताना त्यांना मागून त्यांच्या कानावर विनयचे बोल ऐकू आले आणि त्यांनी तसंच भरल्या डोळ्यांनी मागे वळून पाहिले.
"आता कळतंय का तुम्हाला, की त्यांना तेव्हा किती दुःख झाले असेल? तुम्ही त्यांना सोडून विसरून गेलात, पण मी नेहमी त्यांना भेटायचो, बोलायचो, खेळायचो. त्यांना किती तरी वेळा आपल्या सोबत घरी राहायला बोलावलं, पण ते म्हणायचे,
' नाही बाळा, तुझ्या आई बाबाची इच्छा नाही आम्ही म्हातारा म्हातारी त्यांच्या सोबत राहू आम्हाला ह्या वयात कोणावर ओझं नाही व्हायचं. तू आमच्याकडे येतोस हेच आमच्यासाठी खूप आहे. फक्त इतकं लक्षात ठेव तू कधीच तुझ्या आई बाबांसोबत तसं वागू नकोस, ते कसेही असले तरी तुझे आई बाबा आहेत हे कायम लक्षात ठेव.'
' नाही बाळा, तुझ्या आई बाबाची इच्छा नाही आम्ही म्हातारा म्हातारी त्यांच्या सोबत राहू आम्हाला ह्या वयात कोणावर ओझं नाही व्हायचं. तू आमच्याकडे येतोस हेच आमच्यासाठी खूप आहे. फक्त इतकं लक्षात ठेव तू कधीच तुझ्या आई बाबांसोबत तसं वागू नकोस, ते कसेही असले तरी तुझे आई बाबा आहेत हे कायम लक्षात ठेव.'
त्यांच्याकडे उरलीसुरली प्रॉपर्टी त्यांनी तुम्हाला न दाखवता माझ्या मदतीने विकली आणि त्यातून येणाऱ्या पैशांनी आम्ही असे बरेच वृद्धाश्रम उभारले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी माझ्याकडून फक्त तुमच्यासोबत शेवट पर्यंत राहून तुमची काळजी घ्यायचं वचन मागितले. ह्याचीच जाणीव मला तुम्हाला करून द्यायची होती. आणि सुषमाला देखील मुद्दाम मीच असं वागायला सांगितलं होतं. माझ्यावर आजी आजोबांचे संस्कार आहेत, मी तुम्हाला कधीच सोडू नाही शकत. चला घरी."
बोलता बोलता विनय आणि त्याच्या शेजारी उभी असलेल्या सुषमाच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले.
बोलता बोलता विनय आणि त्याच्या शेजारी उभी असलेल्या सुषमाच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले.
विनयचे ते सगळे बोलणे ऐकून त्याचे आई बाबा रडत रडत खाली कोसळले आणि ते जोरजोरात रडू लागले. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली, पण त्यासाठी आता बराच उशीर झाला होता. आता पश्चात्तापाशिवाय हाती काहीच उरले नव्हते.
समाप्त.
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा