Login

कर्तव्य One Army Man देशसेवा करत रक्षाबंधनाचे वचन पाळणारा भाऊ

देशसेवा करत असताना देखील , बहिणीच्या सेफ्टीची काळजी करणारा भाऊ ... आणि आलेल्या संकटातून वाचवणार?

अगं वंदना ,ऐकतेस का जरा माझं ... नको म्हणलं ना मी तुला... एक दिवस इथे राहिलीस तरी काही फरक पडणार नाही ...मी सांगते तुझ्या आई ला फोन करून .... वंदना आज इथेच राहील ....
नको ग सीमा ....तिथे वहिनीच छोटं बाळ ... आई एकटी कुठे कुठे लक्ष देणार ...वहिनीलाही हवं नको ते कोण बघणार मग ...रात्रीची काही मदत लागली .... दादा इथे असता तर गोष्ट वेगळी असती .. मग मी बिनधास्त राहिले असते तुझ्याजवळ ...मला सांगायला ही लागलं नसत ...
तू अगदी माझी जवळची मैत्रीण ...जिवाभावाची ...म्हणून कसा तरी वेळ काढून आले बघ तुझ्यासाठी ... तुझ्या साखरपुड्यासाठी ..... पण आता नको ... दादा येईल ना सुट्टीवरून ...बघ आठवडाभर रहायला येईन ... तूच म्हणशील पुन्हा ....केव्हा एकदा ही जातेय ...
अगं ! पण .. अशी रात्रीची एकटी कुठे जाणार तू ... ? आदीच माहितेय ना काय काय प्रकार घडतायत आपल्या भारतात ... एकट्या मुलीने बाहेर पडायच म्हणजे .. साक्षात यमाला बोलवण... एक काम कर आमच्या पिंट्या ला घेऊन जा तुझ्याबरोबर ....
हा ...! त्यालाच घेऊन जाते बरोबर ... भित्रा भागू तो ... माझ्या आदी तोच भ्यायचा ..अंधार बघून ...अजून एवढा टाइम नाही झाला ... सात तर वाजलेत .. ट्रेन नि गेले तर तासात पोहचीन घरी ...तू नको काळजी करू ... आणि एका फौजी ची बहीण आहे मी .. घाबरते काय कोणाला ... मला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर लगेच दादा येईल बघ मला वाचवायला ... तसं वचन दिलय त्याने मला .... सीमा :- आली मोठी शहाणी ...दादा येणार म्हणे ... तो तर तिकडे ड्युटी वर असेल आपल्या आणी तुला वाचवायला येतोय ... वेड्या दादाची .. वेडी बहीण ...

बरं ! ठीक आहे ... तू म्हणतेस तस ... देशसेवा करणाऱ्याची बहीण तू .. ऐकते होय कोणाचं ... व्यवस्थित जा ... जरा जपून ... काही प्रॉब्लेम आलाच तर कॉल कर ... आणि घरी पोहचल्यावर ही फोन करून कळव ...नाहीतर मला उगाच चिंता लागून राहायची ..
बरं ! बाई आता जाऊदे मला ... आणखी उशीर करवू नको ...आठ ची लास्ट ट्रेन आहे ती गेली की मग रहावं लागेल इथेच ....
सीमा :- बरं बाय मग ...जा तू ..
पावणे आठ वाजता वंदना स्टेशन वर पोचते ... अनौसमेंट होते ... कृपया यात्रींगण ध्यान द्या ....दादर ला जाणारी लोकल ट्रेन... पंधरा मिनिटातच फलाट क्रमांक पाच वर येईल ....
स्टेशन वर तशी जास्त गर्दी नव्हती ... राहिले साहिलेले .. चुकून ट्रेन चुकलेले .....तुरळकच माणसं होती ... प्रत्येकजण आप आपल्या ट्रेन ची वाट बघत होत... घरी जायच्या गडबडीत ....
वंदना ही एका बेंच वर बसून वाट बघत होती .. आठ केव्हा वाजतायत ... टाईमपास म्हणून ती फोन चाळू लागली ...साखरपुड्याचे फोटो बघत होती ....
तेवढ्यात काही हालचाल जाणवली ... तिच्या शेजारी कोणतरी अनोळखी इसम येऊन बसला... त्याच्या बरोबर अजून एक दोघे होते ... ही जरा बाजूला झाली ... बकड्या च्या त्या साईड ला सरकली .... आठ ला पाच मिनिटं कमी होती ... मनात म्हणली पाच मिनिटं तर आहेत .. पुन्हा ट्रेन येईल माझी .... बसून राहतील मग हे सगळे इथंच मला काय कारण भ्यायचं ...
दादर ची लोकल ट्रेन भोंगा वाजवत ... धडधड आवाज करत प्लॅटफॉर्म वर आली ..... वंदना .. एक क्षण ही न थांबता .....ट्रेन मध्ये चढली... तिला लवकरात लवकर त्या माणसापासून लांब ट्रेन मध्ये चढायचं होत .... ट्रेन चालू होताच तिच्या जिवंत जीव आला ... पण हे जास्त वेळ टिकणार नव्हतं .... वरती बघते तर काय ... तेच तिघेजण .. हिच्या शेजारच्या बाकड्यावर ...

वंदना खूप घाबरली....तिला समजेना काय करावं.. डब्यात ती एकटीच ... आणि हे तिघे तिच्यावर नजर ठेवून ... तिला समजेना आता काय करायचं ...तिला सीमा ने जे सांगितलं होतं ते आठवायला लागलं ...
आता आपल्याबर अस काय झालं तर काय करायचं ..... एकवेळ तिला अस वाटलं सीमाचं एकल असत तर बरं झालं असत ... ही वेळ तर आली नसती ... तिने क्षणभर आपले डोळे बंद केले आणि काहीतर आठवल्यासारख केलं .... पर्स मधून फोन काढला आणि काहीतरी टाईप करायला घेतलं ...
घाबरत घाबरतच तिने आपले डोळे शांत मिटले... आणि मागे बाकड्याला टेकली... डोळे बंद असले तरी त्या तिघांच्या हालचालीवर तीच लक्ष होत ... आता काय होईल ते वरच्याच्याच हातांत अस म्हणत होती ती ....अर्ध्या एक तासात ट्रेन हळू हळू स्लो झाली ... त्या तिघांना समजलंच नाही काय होतंय ...ट्रेन थांबली ... आणि खाकी वर्दीतले तीन चार पोलीस ट्रेन मध्ये चढले... या तिघांनी त्यांना बघताच पळ ठोकायचा प्रयत्न केला ...पण पोलिसांनी त्यांना पकडलंच ...
पोलीस इन्स्पेक्टर देशमाने तिच्याजवळ आले आणि म्हणाले ... well done brave girl ... U did a great job .... तुझ्या हिमतीमुळे आम्ही या गुन्हेगारांना पकडू शकलो .. ही त्याच टोळीतील माणसं आहेत ... जी लहान मुलांना ... पकडून नेतात ... मोठ्या मुलींना पकडून त्यांना देहव्यापार करण्यास प्रवृत्त करतात.. यांचे बाकीचे साथीदार पकडलेत आम्ही .. हे तिघेजणच आमच्या हातून निसटले.. ते तुझ्या हुषारीमुळे सापडले...
वंदना म्हणाली ,सर यातलं मी काही केलंच नाही सगळं श्रेय माझ्या आर्मी मध्ये कार्यरत असलेल्या भावाचं आहे ... हे सगळं त्याच्यामुळेच साध्य होऊ शकलं .... हे तिघे जेव्हा माझ्या मागोमाग येत होते तेव्हाच मी ओळखलं होत ...हे तिघे मला एकटीला बघून नक्कीच माझ्याबरोबर काहीतरी वाईट करणारं.. मी लगेच माझ्या भावाला मॅसेज केला ... की मी दादर च्या ट्रेन मध्ये आहे आणि काहिजण माझा पाठलाग करतायत .....कारण कॉल करून बोलले असते तर हे सावध झाले असते...

पाच एक मिनीटांनी त्याचा रिप्लाय आला ... "तू घाबरू नको फक्त शांत बसून रहा ... " अर्ध्या तासांपर्यंत तुझ्यापर्यंत मदत पोचेल ...
त्याने सोशल मीडियावरून रेल्वे अधिकाऱ्यांना मॅसेज केला ... की माझी बहिण एकटीच ट्रेन मध्ये आहे ...आणि तिला मदतीची गरज आहे .. काही वाईट व्हायच्या आत तुम्ही तिची मदत करा ... रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत माझ्या भावाचा मॅसेज पोहचला ...त्यांनी लगेच वरून ऑर्डर सोडल्या की या ट्रेन मध्ये काहीजण मुलीबरोबर घातपात करण्याची शक्यता आहे.. तातडीने दादर पोलिसांना कळवा आणि ती ट्रेन थांबवून ...तिची मदत करा..
आणि थोड्या वेळातच तुम्ही इथं आलात ... अशाप्रकारे माझ्या भावाने मला दिलेलं वचन पूर्ण केलं ..."देशसेवा" करत आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं .....
हो तुमच्या भावाने त्याचं दिलेलं वचन नक्कीच पूर्ण केलं आहे .. आपल्या बहिणीला बचवून ...आता आमची बारी ....
नाव सांगा तुमच्या भावाचं काय आहे ..... आम्ही वरती सिफारीश करू तुमच्या भावाची .. त्याने जे काम केलेले आहे ते खरंच आजच्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे ...
वंदनाने मोठया आनंदाने आपल्या भावाचं नाव सांगितलं ... समीर सदानंद रहाणे....
आणि आपल्या लाडक्या भावाचं नाव पोलीस ऑफिसर्स ना सांगत असताना पुन्हा एकदा तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या...
( प्रत्येक भावाबहिनीत असच प्रेम असत ... फक्त ते टिकवून ठेवता आलं पाहिजे ..आणि आजकाल सगळेजण म्हणत असतात social media मुले मूळ बिघडतायत .. तर तस काही नाही .. या शोशल साईट चा जर चांगला वापर केला तर नक्कीच आपण काही चांगलं करू शकतो ..जस समीर ने केलं ... आपल्या बहिणीला वाचवून ...आशा आहे मैत्रिणींना माझी ही बहीण भावाची गोष्ट नक्की आवडेल ... सत्यकथेवर आधारित ..थोडी कल्पनिकता ही ... नाव .. ठिकाण... काम.. बदलण्यात आलं आहे )
  © Vaishu patil 

0