कर्तव्य
“आई गंऽऽऽ, आईऽऽऽ, मेले गं मी; कंबरडं मोडलं माझं!” असं विव्हळत्याल्या जयाचा आवाज ऐकून शेजारची तानी धावत बाहेर आली.
ती जयाला उठवत म्हणाली, “आगं जये, कशी काय खाली पडलीस गं?”
रडवेल्या स्वरात जया म्हणाली, आगं काय सांगू तुला, पावसाळा चालू झालाय, घराचं पत्र लय गळत्यात गं, म्हणून कागद घालाया घरावर चढली व्हते. पर कसा काय पाय घसरला; कळलंच न्हाय गडे!”
जयाला कसंबसं उठवून कॉटवर बसवत तानी म्हणाली, “असं झालं व्हय. आगं बया यकटीच घरात अस्तीस तू, संभाळून कामं करत जा की. कमी ज्यादा झालं तर कोण हाय का तुला बघायला!”
जयाला कसंबसं उठवून कॉटवर बसवत तानी म्हणाली, “असं झालं व्हय. आगं बया यकटीच घरात अस्तीस तू, संभाळून कामं करत जा की. कमी ज्यादा झालं तर कोण हाय का तुला बघायला!”
जया म्हणाली, “आसं काय म्हणतीस गं ताने; माझी पोर हाय की माझ्यासाठी.”
तानी म्हणाली, “हंऽऽऽ, पोर हाय म्हणे, ती गीली लगीन करुन तिच्या घरी. तुझा नवरा पण वारला, आता तुझ्याजवळ हाय का कोण? म्हणून तर म्हणती की पोरगा असावा, म्हंजी कसं बरं अस्तं. आपल्याजवळ र्हातु, काळजी घितू. पोरगी काय गं, लगीन झालं की तिच्या संसारात रमती.”
या दोघींचे बोलणे चालू होते तेवढ्यात रोजच्यासारखा रजनीचा फोन आला, “हॅलो आई कशीयस गं! काय करतेस?”
तो फोन तानीने उचलल्यामुळे ती म्हणाली, आगं कशीयस काय ईचारती, तुझी आय घरावण खाली पडलीय, कमरला लागलंय तिच्या.
तो फोन तानीने उचलल्यामुळे ती म्हणाली, आगं कशीयस काय ईचारती, तुझी आय घरावण खाली पडलीय, कमरला लागलंय तिच्या.
रजनी म्हणाली, “अहो काय सांगताय! ती बरी तर आहे ना?.
तानी म्हणाली, “हो..कमरेला मार लागलंय फकस्त.
“ठीक आहे मी येते.” म्हणत रजनीने फोन ठेवून दिला.
तासाभरात रजनी नवऱ्यासोबत माहेरी आली. जयाला दवाखान्यातून तपासून आणले.
तासाभरात रजनी नवऱ्यासोबत माहेरी आली. जयाला दवाखान्यातून तपासून आणले.
जावई म्हणाला, “मामी आमच्यासोबत चला राहायला. इथे एकटे नका राहू.
बुजल्यासारखी होऊन जया म्हणाली, “नको जावईबापू, लेकीच्या घरी र्हाणं बरं दिसत न्हाय. लोकं काय म्हणतील!”
“लोकांचं जावू दे; फक्त मुलानेच आई वडिलांना सांभाळावे असे काही नसते. मुलीचेही कर्तव्य आहेच की. बापाच्या संपत्तीवर जसा अधिकार दाखवला जातो तसेच तिने आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी घ्यायलाच हवी.” सासूच्या काळजीने जावई बोलला.
रजनीही म्हणाली, “बरोबर बोलतात हे, तू यायचेसच आमच्यासोबत बास.”
नि:शब्द होऊन जयाने होकारार्थी मान हलवली.
लेक जावई प्रेमाने काळजी घेत होते ते पाहून तानीच्या डोक्यात थोडाफार फरक पडला.
लेक जावई प्रेमाने काळजी घेत होते ते पाहून तानीच्या डोक्यात थोडाफार फरक पडला.
—---------
©® सौ. वनिता गणेश शिंदे.