Login

काशीस जावे नित्य वदावे (पालुपद)

सिनेमात, मालिकेत दाखवतात त्याप्रमाणे घराच्या किल्ल्या सुने ला देते

काशीस जावे नित्य वदावे( पालुपद)

“आता एकदा राजू च लग्न झालं - की
तुम्ही पहाच, मग, सर्व जवाबदारी तिच्या वर टाकून”मी फक्त आराsम करणार आहे, असे सुनंदा घरात इतरांना विशेष करून सासुबाईंना ऐकू जाईल अशा ठसक्यात (आवाजात) जोरात म्हणाली.

त्यावर तिच्या सासूबाई फक्त मंद हसल्या.

सुनंदा त्यांच्या पिढी त ली सगळ्यात धाकटी सून होती. रमेश ला जोडून वर अजुन दोन भाऊ व दोन बहिणी होत्या.

तिचं हे बोलणं ऐकून यजमान रमेश राव जरा सशंकित स्वरात म्हणाले” खरं सांगतेस की आपलं —?”
सुनंदा च लक्ष होतं.” हो -हो नक्कीच मी आता आरामच करणार आहे सगळं तिच्यावर सोपवून देणार बघाच तुम्ही”

खरतर हे बोलण्याच्या मागे दोन कारणं होती. दुसरं कारण मोठ्या जावा सुनां आल्या तरी त्याचं गुतावळ्यात अडकलेल्या तिने पाहिल्या होत्या.
पहिल कारण खूप जुनं होत आणि त्याचाजास्त राग होता सुनंदा ला, आणी त्याचा वचपा काढण्यासाठी ती मुद्दाम सासुबाई समोर हा विषय काढत असे.
सुनंदा च लग्न झालं तेव्हा ती सोळा वर्षाची होती पाठीमागच्या दोन- बहिणी असल्याने योग्य स्थळ मिळता आईबाबांनी लग्न लावून दिले. मॅट्रिक पास झालेल्या सुनंदाला घर कामाची फारशी सवय नव्हती.
सासुबाई स्वभावाने गरीब होत्या त्यांनी सुनंदाला प्रत्येक काम शिकवण्यास सुरुवात केली पण सुनंदाचा स्वभाव हट्टी,आपल्याला येत नाही हे कळु न देण्या साठी शिकण्यापेक्षा मला सगळं येत असे दाखवण्याचा. तिला वाटे सर्व तिच्यावर सोपवून सासुबाईंनी देवदेव करावं.

सासूबाई कूकर लावला कि चार शिट्या काढ सांगुन जात,
सासुबाई गॅस जरा मंद ठेवत सुनंदा ला घाई ती फुल्ल गॅस करून भराभर चार शिट्या वाजवून गॅस बंद करून बाहेर.
डाळ नीट शिजलेली नसे ते न पाहता एकदाचा स्वैपाक आटोपून टाकी. मग जेवताना खाली डाळ वर पाणी असं वरण बने. अश्या एक ना दोन अनेक चुका होत त्यामुळे सासुबाईंना लक्ष ठेवावे लागे.

भिशी च्या मैत्रिणींच्या गप्पांमध्ये त्यांच्या सासवा काही काम करत नाही असा सूर असे.

रेखा सुनंदा ची शेजारीण महा कुजकट
“अय्या सुनंदा च बरं आहे न !सासुबाई खुपचं गरीब आणि कामसू आहे, जरा आमच्या घरी पहा !”

हो ना ग! आशा पण दुजोरा देई .

एकुण त्या बिचाऱ्या, आणी सहनशील म्हणून त्यांना बाकीच्यांची सहानुभूती मिळे. आपली सासु अती चांगली म्हणून आपल्या मैत्रिणीं मधेच काय पण माहेरी ही किंमत नाही . आणि हिच दुखरी नस सुनंदा ला कोणाला दाखवता येत नसे.

आई जवळ काही तक्रार करा तर तिचं म्हणणं “तुला धड येत नाही तर शिकून घे, एकदा नीट नेटक करायला लागली कि मग तुझंच राज्य.
आणि खरच तसं घडलं.

हळूहळू सुनंदा सासुबाईंच्या हाताखाली तरबेज झाली कामात स्वयंपाकात आणि सासूबाई हळूहळू अंग काढून घेऊ लागल्या आता सुनंदाच राज्य होतं .
काळ पुढे सरकला सुनंदा आता सासू बनण्याचे स्वप्न पाहू लागली आणि लवकरच तो दिन उगवला शुभ्रा सून बनून त्या घरात आली.
सर्व सुनेला सोपवण्याची स्वप्न परत जोर मारू लागल…
पण् सुनंदा ने विचार केला आत्ताच लग्न झाले एकदम तिच्यावर जबाबदारी कशी टाकणार ?जरा चार दिवस होऊन जाऊ दे थोडी घरात रूळली की मग आपण तिच्यावर सगळं सोपवू ..

चाराचे आठ दिवस झाले सुनबाई शुभ्रा नोकरीवरही जायला लागली .
एक दिवस सुनंदाने ठरवलं आज रविवार आहे,आज शुभारंभ करावा सिनेमा त मालिकेत दाखवतात त्याप्रमाणे घराच्या किल्ल्या देत बहु“आज से घर की सारी जिम्मेदारी तुम्हारी अब मैं तो भजन किर्तन करुंगी” वगैरे म्हणेन .
पण कसलं काय—--!
ती जरा उशिराच उठली पाहते तर काय! स्वयंपाक घरात काही हालचाल दिसेना. कंटाळून शेवटी तिने चहा ठेवला. चहा होता होता मुलगा नवरा सर्व उठले पण शुभ्राचाअजून पत्ताच नव्हता कंटाळून तिने इतर कामाला सुरुवात केली थोड्याच वेळा शुभ्रा उठून खाली आली आणि घाईघाईने म्हणाली साॅरी साॅरी आई मी आणि राजू आज आउटिंग ला जात आहोत संध्याकाळी येवू मी कालच सांगणार होते पण विसरले.म्हणत गेली ही.


सुनंदा काय समजायचं ते समजली आणि चुपचाप स्वयंपाकाला लागली
थोडे दिवस जाऊ दे मग मी आराम करेन असे ते नवरा आणि सासू समोर स्वगत असल्यासारखे बोलली. नवऱ्याने ऐकले न ऐकल्यासारखे केले सासूबाई काहीच बोलल्या नाही
महिना दोन महिने नाही होत तो नवीन पाहुण्याची चाहूल लागली आणि सुनंदाचा बेत परत फिसकटला आता बाळ होऊनच जाऊ द्या मग सून बाईच्या हातात घराच्या किल्ल्या देते आणि मी नातवाला खेळवत—असे ति बडबडली
, रमेश राव” काही म्हणाली कां तू? असं म्हणून हसायला लागले.

पुढचे काही महिने सुनेच गर्भारपण मग बाळंतपण नातवाच कौतुक करण्यात गेले,शुभ्रा माहेरून परत आली. ओली बाळंतीण बाळ लहान ह्या सगळ्यात सुनंदा इतकी गुंतली कि “ चाबी बहू को सौप कर”—हे पालुपद ती जवळजवळ विसरूनच गेली होती….
आता नातू मोठा कि, शाळेत जायला लागला कि अस बरेचदा ठरवून ही सुनंदा ला काही त्या गोड गुंत्यातुन स्वतःला सोडवता येत नव्हते.

आतापर्यंत त्या कल्पनेतला फोल पणा ही तिला जाणवायला लागला होता.

एक दिवस तिला बरं वाटतं नव्हतं शुभ्रा जसं जमेल आटोपून कामावर गेली. जाताना तिला आराम करा औषध वेळेवर घ्या,घरकामाची चिंता करु नका वगैरे सांगून गेली.
रमेश रावांनी औषध देताना तिला आता तू चार दिवस आराम कर हा सल्ला दिला ह्या चार दिवसांत पडून पडून सुनंदा ला कंटाळा येऊ लागला.
जरा बरं वाटायला लागलं तशी सुनंदा परत कामाला लागली.
संध्याकाळी रमेश राव म्हणाले अगं आता तर जरा बरं वाटायला लागलय. आरामात बस .
सोपव आता तिच्या वर.
हो हो पहाच तुम्ही आता मी सगळी जवाबदारी शुभ्रावर सोपवून आराssम —

सुनंदा ला पुढचं बोलू न देता रमेश म्हणाले
"केव्हा? शुभ्रा ला सून आल्यावर न—?"

त्या वर काय उत्तर द्यावे हे न सुचल्याने सुनंदा” ‘हं पहाते , पण् पहाच तुम्ही” म्हणत उठून स्वैपाकघरा कडे वळली.
—-------------------------_—-------------


0