कस्तुरी भाग ३२

कॉलेजमध्ये होणाऱ्या संगीत महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शशांकने गिटार वाजवत गायला सुरुवात केली


कस्तुरी
भाग,३२

बांगड्यांच्या किनकिनाटाबरोबर पायातील पैंजणांचा रूणझुण आवाजाने दादाने आवाजाच्या दिशेने पाहिले . एक गोड सुंदर मुलगी हातामध्ये पोह्यांच्या प्लेट्स ठेवलेला ट्रे घेऊन हळूहळू येत होती. तिचे ते सुंदर पाहून बघताच क्षणी दादा अक्षरशः घायाळ झाला.

तिने हळूहळू चालत येऊन ट्रे समोरच्या टेबलावर ठेवून पटकन जाऊन राधाच्या पाया पडल्या. तशी राधाने एकदम तिला हात धरून उभे करुन तिला एक गोड गळाभेट दिली. नंतर तिला," माझ्या पाया पडू नकोस बाळा आधी आजीच्या पाया पड. आपल्या घरातील ह्या एक आधारस्तंभ आहेत. आपला आधारवड आहेत या." असे म्हणत आजीजवळ तिला नेले.

आजीने तिच्या चेहऱ्याकडे पाहून ," काय नाव तुझे बाळा ?" असे विचारले.

" ‌सुषमा "

" व्वा व्वा छान आहे हो नाव तुझे." आजीने तिच्या गालावर हळुवारपणे हात फिरवत म्हटले.

तशी ती लाजेने चूर चूर होऊन उभी राहिली.

" बस इथे सुषमा." तिचे वडील म्हणाले.

ती समोरच्या खुर्चीवर बसली.

" विचारा काही प्रश्न विचारायचे असतील तर." दादाचे मालक म्हणाले.

एक औपचारिकता म्हणून तिला काही प्रश्न राधा ने विचारले.तेव्हा सुषमा ने देखील सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहज सुरेख दिली.

आजीने तिला स्वयंपाक करता येतो का हा प्रश्न विचारला.

यावर तिने गालात हसत होकारार्थी मान डोलावली.

" तू काही प्रश्न विचारणार असशील तर विचारुन घे. नाही तर घरी गेल्यावर म्हणशील मला सांगितले नाही तुम्ही कोणी. तुझ्या आयुष्याचा प्रवास करायला तुझा जोडीदार म्हणून तुला कशी हवीय अशी ती आहे का नाही हे बघं. " राधा म्हणाली.

" हो हो अगदी बरोबर बोललात ताई. नाही तर असे करुया का. या दोघांना इथे बोलत बसवून आपण आत जाऊया. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तरच." सुषमाची आई म्हणाली.

" हो हो . चालेल चालेल. चला आपण आत जाऊ." असे म्हणत राधा पटकन उठली.

काही वेळातच दादा जयश्री या दोघांची बोलणी झाली.

दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखताना सगळ्यांना या दोघांची पसंती अधिक संमती समजली.

सगळेजण खूप खूश झाले.

सर्वांनी एकमेकांच्या तोंडात पेढा भरविला.

मुलगी पसंत करुन हे सर्व घरी परतले.

" छान आहे ग मुलगी राधा. घरची शोभा वाढवणारी आहे बघ. लक्ष्मीच्या पावलांनी येणार घरी ती आपल्या." आजी म्हणाली.

" हो अगदी बरोबर बोललात तुम्ही. लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो बघा या दोघांचा." राधा आनंदी होऊन म्हणाली.

दादा समोर उभा राहून या दोघींचे संभाषण ऐकून गालातल्या गालात हसत होता.

" काय दादा मन में लड्डू फुटा." असे म्हणत हे दोघे भाऊ आणि रुपा मिळून त्याला चिडवायला लागले.

दादा त्यांना मारायला पुढे येऊ लागला तेवढ्यात आईने ," ये..! शु...! किती दंगा हा." म्हटले.

हे ऐकून रुपा आणखीन जोरजोराने हसायला लागली.

" काय आई...! सून घरी आली नाही तोच तिचे नाव तुझ्या तोंडून.शू...! शू शू सुषमा शू...!" रुपा टाळ्या वाजवत जोरजोरात हसत म्हणू लागली.

" काय म्हणावे या मुलीला. काय काय शोध लावते बघा. कठीण रे बाबा कठीण." असे म्हणत राधा आत आपल्या खोलीत गेली.

दुसऱ्या दिवशी रुपाने ही गोड बातमी आपल्या दोघी मैत्रिणींना सांगितली. या दोघी पण आनंदाने टाळ्या वाजवू लागल्या.

घराचे बांधकाम पूर्ण झाले की मग लग्नाची तारीख ठरवायची असे ठरवले गेले.

रुपा आता आपल्या काॅलेजच्या मित्र मैत्रिणी बरोबर आपला अभ्यास त्याचबरोबर दुसऱ्या काही अॅक्टीविटीज मध्ये व्यस्त होती. कॉलेजमध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ती आता आवर्जून भाग घेत होती. सर्व वर्गात ती आता सर्वांची लाडकी मैत्रिण म्हणुन ओळखली जाणारी म्हणजे रुपा झाली.

कोणाला अभ्यासात येणारी अडचण ती अगदीच सोप्या पद्धतीने सोडवून देत होती.

कॉलेजमध्ये संगीत महोत्सव आयोजित केला होता. क्लासमधील बऱ्याचशा मुलांमुलींनी हिरीरीने भाग घेतला.कोण गाणे म्हणणार तर कोणी डान्स करणार कोण बासरी वादन करणार तर कोणी तबला वादन करणार. असे एक ना अनेक संगीत महोत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या वेगवेगळ्या कलागुणांचा आनंद सर्व विद्यार्थ्यांना देण्यासाठी तयार झाला होता.

कामिनीचा आवाज गोड होता. तिने गाणे गाण्यासाठी आपले नाव दिले होते. नेहाला पण तिचे नाव दे असे कामिनी ने सुचवले पण नेहाने मी गायला सुरुवात केली तर सगळेजण पळून जातील असे म्हणत हसू लागली.

" छ्छे ग...! गाणे आणि मी अगदीच ३६ चा आकडा बघं. नाही हो जमणार मला. तुझा आवाज गोड आहे तू भाग घेतला आहेस. तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा गं." रुपा म्हणाली.

सर्व जण दुपारी कॅन्टीन मध्ये किंवा कॉलेजच्या आवारात आपापली प्रक्टिस करत होते.

कॉलेजचे वातावरण अगदीच संगीतमय झाले होते.

सोमवारी सायंकाळी संगीत महोत्सव आयोजित केला होता.

रविवारी कामिनी रुपाच्या घरी येऊन गाण्याची प्रक्टिस करत होती. तिच्या गाण्यावर नेहा रुपा दोघीजणींनी दाद देत होत्या.या तिघींनी उद्या कोणत्या रंगाचे ड्रेस परिधान करायचे हे ठरवले.

" या वेळी वागळे की दुनिया नको ग बाई...!" असे म्हणत तिघीही जोरजोराने हसायला लागल्या.

सोमवारी रुपा नेहा दोघी कॉलेजला गेल्या. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रुपाचे सौंदर्य अजूनही खुलून दिसत होते. तिने आज आपले केस मोकळे सोडून दिले होते. गळ्यामध्ये एक लहानशी मोत्यांची माळ घातली होती. त्याचबरोबर कानामध्ये देखील मोत्यांच्या कुड्या घातल्या होत्या.

कॉलेजच्या आवाराच्या मधोमध मोठ्ठा स्टेज सजविला होता.त्याच्या समोर बसण्यासाठी खुर्च्या मांडलेल्या होत्या. स्टेजवर गुलाबाच्या फुलाची सजावट केली होती.स्टेजच्या आजूबाजूला रंगबिरंगी सुंगधीत फुलांची सजावट केली होती.स्टेजवर संगीताचे उपयोगी पडणारे वाद्ये ठेवली होती.

एकेक करून सगळे विद्यार्थी,शिक्षक आले. कॉलेजचे आवार फुलून गेले.

संगीताच्या शिक्षकांनी कार्यक्रम सुरू करण्याआधी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांची ओळख करून देत त्यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना करत झाली.

एकेक करून सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या कलेचे उत्कृष्ट असे प्रदर्शन केले.

कामिनी ने आपल्या गोड आवाजात

\" भले बुरे हे विसरून जाऊ
आपण क्षणभर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर \"
हे गाणे अगदीच अप्रतिम असे सादर केले. तिच्या गाण्यावर सर्वांनी वन्स मोअर असे म्हणत टाळ्यांचा पाऊस पाडला.

कामिनी चे गाणे झाले यानंतर सूत्र संचालन करणाऱ्या मुलीने अनाउन्स केले

" अब दिल थाम कर बैठीये. क्यूंकी अब जो कलाकार आपके सामने अपनी कला पेश करनेवाले है उनकी पहचान बस उनका नाम है और वो है द वन अॅड ओन्ली शशांक."

मुलांमध्ये एकच जल्लोष. शिट्ट्या टाळ्यांचा एकच आवाज.

स्टेजवरील सर्व लाईट बंद करण्यात आल्या. फक्त एकच फोकस लाईटची .जिथे शशांक हातात गिटार घेऊन उभा होता.जसा फोकस त्यांच्या वर पडला तसा त्याने गिटारवर एक धून वाजवली. त्याच्या एका धूनवर पुन्हा टाळ्या वाजवल्या गेल्या.

यानंतर शशांक ने सर्वांना आपला हात उंचावून बाणेदारपणे नमस्कार केला आणि गिटार वाजवत गायला सुरुवात केली.

" निले निले अंबरपर
चांद जब आये
प्यार बरसाये
मन को तरसाये
ऐसा कोई साथी हो
ऐसा कोई प्रेमी हो
प्यास दिल कि
बुझा जाये.

त्याची गाणे गात गात एकच नजर खिळली होती ती रुपावर. आज ती खूपच सुंदर दिसत होती.

रुपाला देखील शशांकने आपल्या कडे असे बघत गाणे आवडू लागले. ती त्याच्या कडे पाहून लाजली आणि हळूच आपल्या नजरा चुकवून इकडे तिकडे पाहू लागली. परत तिने चोरट्या नजरेने शशांककडे पाहिले. तेव्हा तो तिला पाहून गालातल्या गालात हसत होता. दोघांची नजरानजर होताच दोघांच्याही हृदयाची धडधड वाढत होती. नकळतच रुपाचे पाय थिरकत होते. ती त्याच्या गाण्यावर टाळ्या वाजवत त्याच्याबरोबर गुणगुणत होती.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all