काटेरी वाटेवरून चालताना भाग 70
आधीच्या भागात आपण पाहिले की,
आनंदीला जॉब लागला, पहिल्या दिवशी विक्रमने तिला ऑफिसला सोडलं. पहिला दिवस बरा गेला, ती खूप थकलेली होती.
दुसऱ्या दिवसापासून तिला स्वतः ट्रॅव्हल करून जायचं होतं. तेही तिने केलं, ऑफिसमध्ये हरीश काकांशी ओळ्ख झाली, सरांशी बोलणं झालं आणि तिची रेवाशी छान मैत्री झाली.
सरांनी फोन केला आणि त्यांच्या घरचा अड्रेस दिला.
आता पुढे,
आनंदी विचारात पडली, तिने अभिजीतला पुन्हा कॉल केला.
“सर इफ यु डोन्ट माईंड, तुम्ही माझ्या घरी येऊ शकला का? प्लिज.”
“ओके.”
आनंदीने लगेच अड्रेस पाठवला.
दुसऱ्या दिवशी संडे होता, आनंदीचं काम पूर्ण न झाल्यामुळे अभिजीत नायर तिच्या घरी आले. आनंदीने दार उघडला.
“सर या ना प्लिज.”
आनंदीने त्यांना बसवलं आणि पाणी आणायला किचन मध्ये गेली. तिने पाणी दिलं आणि
“सर मी थोड्याच वेळात आले.”
“मिस आनंदी, काय झालं? यु आर नॉट रेडी?”
“सर आहे ना, जस्ट अ वेट.”
अभिजीतला वाट बघायला आवडायचं नाही. तरी तो संयम धरून होता. थोडया वेळाने आनंदी आली, अभिजीतने तिरप्या नजरेने कटाक्ष टाकला. सर रागावलेत तिला कळलं, ती काहीही न बोलता त्यांच्या बाजूला जाऊन बसली. तब्बल दोन तास अभिजीतने आनंदी कडून मेहता फाईलचं संपूर्ण काम करून घेतलं.
आनंदीला बसायचा कंटाळा आलेला होता पण ती बोलू शकली नव्हती.
थोड्या वेळाने निशा आणि विक्रम हॉल मध्ये आले, आनंदीने ओळख करून दिली. निशाने त्यांच्यासाठी चहा नाश्ता आणला. विक्रम सोबत त्यांचे खूप छान बोलणं झालं. त्यानंतर अभिजीत तिथून निघून गेला. आधी अभिजीतला तिथे बघून निशा आणि विक्रमला काही कळेना पण नंतर अभिजीत गेल्यानंतर आनंदीने त्यांना सविस्तरपणे सगळं सांगितलं.
“बाप रे आनंदी, किती भयंकर आहे ग तुझा बॉस?” निशा
“हो आई मी सांगितलं होतं ना, त्यांना सगळं वेळेच्या वेळेवर हवं असतं. इकडे तिकडे झालेलं चालत नाही काल माझा लॅपटॉप खराब झाला आहे आणि माझं काम पूर्ण झालं नाही तर त्यांनी इथे येऊन करून घेतलं माझ्याकडून. पण चांगल आहे ग त्यांच्या अश्या असल्यामुळे ऑफिसची सगळी कामे वेळेवर होतात. कुणीही कामात दिरंगाई करत नाही त्यामुळे ऑफिस वर्क छान होतं.”
असेच दिवस छान जात होते.
रियाचं लग्न जवळ आलं, प्रिन्सि आणि आनंदीने रियाच्या लग्नासाठी छान शॉपिंग केली. उद्याची मेहंदी म्हणून आजच आनंदी आणि प्रिन्सिप रियाच्या घरी गेल्या.
“हाय रिया.”
“हाय....तुम्ही दोघी आलात मला खूप बरं वाटलं.” रिया
“काय ग तू अजून तयार झालेली नाहीस.” आनंदी
“तिकडे डेकोरेशनचं काम सुरू आहे ना, मी आता पटकन तयार होते.” रिया तयार झाली, प्रिन्सी आणि आनंदी तिला चिडवू लागल्या.
“काय ग रिया भाऊजींचा फोटो सुद्धा दाखवला नाहीस, नाव सुद्धा सांगितलं नाहीस. काय, लपवून ठेवायचं आहे की काय आमच्यापासून.”
“तसं नाही ग.” रिया लाजून बोलली. दोघी तिला चिडवू लागल्या.
तर रियाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल केला.
“हाय पलाश, “
“हाय रिया.”
पलाश ह्या माझ्या मैत्रिणी. पलाशने तिच्या मैत्रिणींना हाय केलं.
“पलाश ह्या माझ्या बेस्ट फ्रेंड ही आनंदी आणि ही प्रिन्सी.”
“हाय बोथ ब्युटीफूल गर्ल.” ते दोघं दोन मिनिटं फोनवर बोलले.
त्यानंतर रियाचा संगीतचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांनी खूप धमाल केली रियाच्या नातलगांनी पण सगळ्या जोडीने कपल डान्स केले.
प्रिन्सी आणि आनंदीने पण खूप छान डान्स केला. कार्यक्रम संपल्यानंतर आनंदी आणि प्रिन्सि घरी आल्या.
दुसऱ्या दिवशी आनंदी ऑफिसला गेली, आनंदीचे पाय भयंकर दुखत होते. ती ऑफिसमध्ये काम न करता पायाला हात लावून बसलेली होती आणि हे अभिजीतच्या लक्षात आलं. त्याने लगेच तिला केबिनमध्ये बोलावून घेतलं.
“सर तुम्ही बोलावलं.?”
“मिस आनंदी, तुमचं लक्ष नाहीये कामांमध्ये.”
“नाही सर, असं काही नाहीये. काय झालं तर माझ्याकडून काही चुका झाल्यात का? सर प्लीज मला सांगा मी आत्ताच करेक्ट करून देते.”
“चुका झाल्या नाहीत पण तुम्ही चुक करत आहात. तुम्ही कामाच्या वेळेला अस पायाला हात धरून का बसलेल्या आहात?”
“सॉरी सर माझे पाय खूप दुखत आहेत, खूप ठणठण करत आहेत. म्हणून मी पाच मिनिटं बसले होते. पण माझं काम बंद नव्हतं मी माझं काम करतच आहे.”
“ओके तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं काम लवकर लवकर करून तुम्ही लवकर घरी जाऊ शकता.” आनंदीला आश्चर्य वाटलं.
“सर रियली.”
“हो मिस आनंदी तुम्ही जाऊ शकता.” आनंदीला खूप जास्त आनंद झाला कारण तिला सरांकडे हाफ डे मागायचा होता पण तिला सरांशी बोलताना भीती वाटत होती.
सरांनीचं तिचा प्रॉब्लेम सोडवला होता. आनंदी घरी जाऊन छान तयार झाली.
तिने व्हाइट पिंक रंगाचा लेहेंगा घातलेला होता, त्यावर महरून रंगाची ओढणी होती. प्रिन्सि तिला न्यायला आली, आनंदीला बघताच
“वाव! आनंदी किती सुंदर दिसतेस तू.”
“थँक्स प्रिन्सि तू पण खूप छान दिसतेस.” प्रिन्सिने पण लाचा घातलेला होता ती पण छान तयारी करून आलेली होती.
दोघीही खोलीतून बाहेर निघाल्या.
“आई आम्ही जातोय ग.” आनंदी
“हो सांभाळून जा ग.” निशा
“हो..” असं म्हणत दोघी निघाल्या. रियाच्या घरी पोहोचल्या,
तिथे सगळी तयारी झालेली होती. आज रियाला मेहंदी लागणार होती. रियाने येलो कलरचा लाचा त्यावर पिंक ओढणी घातलेली होती. माथ्यावर बिंदी आणि गळ्यात येलो कलरचा फ्लॉवर नेकलेस घातलेला होता. रिया आज खूप सुंदर दिसत होती. मेहंदी, हळदीचा कार्यक्रम झाला. प्रिन्सि आणि आनंदी तिथेच राहणार होत्या. त्यांनी रियाकडेच मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदीने अभिजीतला फोन केला.
“हॅलो गुड मॉर्निंग.”
“गुड मॉर्निंग सर.. मी आनंदी बोलतेय.” आनंदी
“मला सुट्टी हवी होती काल मी अप्लिकेशन द्यायला विसरले म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगते. सर आज माझ्या बेस्ट फ्रेंडच लग्न आहे तर मला सुट्टी हवी होती सर मी आज नाही आले तर चालेल ना.”
“मिस आनंदी तुम्ही सगळ ठरवलेलं आहे तर मग मला का विचारताय?”
“नाही सर तसं नाही, म्हणजे माझ्या मैत्रिणीचे लग्न आहे ना मी तिच्याकडे होते तर मी ऑफिसला नाही पोहोचू शकणार. मी म्हटलं तुम्हाला सांगावं की मी आज नाही येऊ शकणार.” आनंदी
“मग मी जर तुम्हाला म्हणालो तर तुम्ही या तर येणार आहात का?”
“नाही सर.” आनंदी हळू आवाजात बोलली.
“मला सांगायची काही गरज नाहीये.”
“सॉरी सर.. थँक्यू सर..” असं म्हणून तिने फोन ठेवला.
थोड्या वेळाने पार्लरची मुलगी आली, तिने रियाला तयार केलं.
आज रिया एकदम डॉल सारखी दिसत होती. घेरदार लाल रंगाचा, एम्ब्रोईडरी वर्क असलेला लाचा घातला होता. छान हेअर स्टाईल, फुलांनी बनवलेला गजरा, खूप छान दिसत होती. प्रिन्सि आणि आनंदी पण तयार झाल्या. तिघींनी मिळून फोटोज काढले.
तिघेही लग्न मंडपाच्या खोलीत बसलेल्या होत्या. सासर जवळ असलं तरी तिचा होणारा नवरा हा दूर राहायचा त्यामुळे त्याच्या सोबत शहराच्या बाहेर जावं लागणार आहे या विचाराने रिया भावुक झाली.
तिघीही एकमेकींना गळाभेट करून रडायला लागल्या.
“आता तू आमच्यापासुन खुप लांब जाणार पण आम्ही तुला खूप मिस करू आणि फोन करू, तू फोन करायला विसरायचं नाही, फोन केला नाहीस ना तर मी डायरेक्ट तुझ्या येणार.” आनंदी
तिघींचं बोलणं सुरू होतं, तिघींनीही एकमेकींचे डोळे पुसले. एकमेकींना घट्ट मिठी मारली.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा