काटेरी वाटेवरून चालताना भाग 73
आधीच्या भागात आपण पाहिले की,
आनंदीचं निनाद सोबत लग्न पक्क झालं, त्या दोघांचा साखरपुडा झाला. लग्नाची तयारी सुरू झाली. निनाद रात्री आनंदीला भेटायला आला, त्याने तिला खाली बोलावलं पण आनंदी त्याला भेटायला तयार नव्हती.
आता पुढे,
निनादने खूप रिक्वेस्ट केली त्यानंतर आनंदी त्याला भेटायला खाली गेली, गार्डनच्या मागे झाडाखाली दोघे भेटले.
“निनाद असं का भेटायला का बोलावलं? असं बरं वाटत नाही आता चार दिवसावर आपले लग्न आहे. आपण भेटलो आणि कुणी बघितलं तर, बरं वाटणार नाही प्लिज तुम्ही जा ना.” आनंदी
“मला तुला बघावसं वाटत होतं म्हणून मी इथे आलोय तुला भेटायला. असं काय करतेस बोल ना थोडा वेळ माझ्याशी.”
असं म्हणत निनादने तिचा हात पकडला, तिला जवळ घेतलं आणि तिच्या गालाजवळ ओठ नेऊ लागला. आनंदीने त्याला हाताने ढकलून दूर केलं.
“निनाद आपलं लग्न व्हायचंय.” आनंदी
“तर काय झालं? मी फक्त तुझ्या गालाची किस घेतोय आणि त्यात अनफेयर असं काहीच नाही. तू सांग त्यात काय वाईट आहे?”
निनादने तिला पुन्हा जवळ घेतलं, त्याचे ओठ तिच्या गालावर आणून तिच्या गालाचा किस घेतलं. तसं तिचं संपूर्ण शरीर शहारलं. तिने तिच्या हाताचे मुठी घट्ट केली. त्याने तिला मिठीत घेतलं, तो तिच्या संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवू लागला. हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठावर पर्यंत येऊ लागले, त्याने तिच्या ओठाचं चुंबन घेतलं. काही क्षण दोघेही त्याच स्थितीत होते.
समोरच्या काही क्षणात आनंदी भानावर आली. तिने त्याला दूर ढकललं आणि तशीच धावत धावत वर गेली. ती तिच्या खोलीत गेली आणि बाथरूममध्ये जाऊन तिने तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. ती तिचे ओठ आणि गाल जोराजोरात घासायला लागली.
‘हे चुकीचं आहे, चुकीचं आहे’ अस म्हणत ती रडायला लागली. त्यानंतर संपूर्ण रात्र ती बाल्कनीत बसून होती. तिला झोप काही येईना.
दुसऱ्या दिवशी सगळे लग्नाच्या शॉपिंगला जाणार होते, निशा आणि आनंदी शॉपिंगला जायला निघाले. निनादने आनंदीला फोन केला पण आनंदी काही फोन उचलेना.
“आनंदी फोन वाजतोय तुझा घे की.” निशा
“असू दे आई.”
निशाने बघितलं कुणाचा कॉल आहे तर निनादचं नाव दिसलं.
“अग निनाद फोन करतोय, घे ना त्याचा फोन.
आनंदीने रिसीव केला
“हॅलो..”
“काय झालं आनंदी? रागवलीस का? फोन का उचलत नाहीये? मला तुझ्याशी बोलायच आहे. मला भेटायचं तुला.” निनाद
“तुम्ही तर आता शॉपिंगला येत आहात ना मग? आत्ताच आईंचा फोन येऊन गेला की तुम्ही सगळे येत आहात म्हणून.” आनंदी
“पण मला तुला एकदा एकटीला भेटायचं.” निनाद
“आपण या विषयावर नंतर बोलू.” असा म्हणून आनंदीने फोन ठेवला.
लग्नाची छान तयारी सुरू झाली.
रात्री घरी गेल्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं, नंतर तिच्या सगळ्या मैत्रिणी घरी आल्या. सगळ्यांच्या छान गप्पा रंगल्या. निशा तिच्या खोलीत एकटीच बसून होती.
विक्रम तिच्या जवळ गेला,
“काय ग निशा अशी का बसली आहेस?” विक्रम
“काही नाही, सहजच..” निशा
“काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी दिसत आहे.” विक्रम
“हो, बघता बघता आनंदी किती मोठी झाली कळलं देखील नाही, चार दिवसांनी लग्न होऊन ती सासरी पण जाईल. कसे दिवस गेले कळलंही नाही. माझी लेक आता कुणाची तरी सून होणार, कुणाची तरी पत्नी होणार. नंतर आई देखील होणार. किती भराभर दिवस निघून जातात. हातातून वाळू निसटावी तसे दिवस निघून जातात.” निशा
“खर आहे मी तर आनंदीला फक्त मोठा झाल्यानंतरच बघितलं, पण तू तर तिला लहानपणापासूनच बघत आहेस. तुझ्या भावना मी समजू शकतो.” विक्रम
“माझा पोटाचा गोळा गोड आहे ती, आता सासरी जाऊन तिचा संसार सुखाचा होऊ दे म्हणजे झालं, बाकी काही नको मला.
उद्या आपण मंदिरात जाऊया, देवासमोर पत्रिका ठेवूया. आनंदीला पण घेऊन जाऊया.” निशा
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी उठून आंघोळी केल्या. सगळे तयार झाले. आज समिधा येणार होती, सकाळी समिधाची फ्लाइट टेक ऑफ झाली. काही वेळातच समिधा आली, तिच्याशी बोलणं झालं. त्यांनतर सगळे मंदिरात जायला निघाले. सगळे मंदिरात पोहोचले, तिथे दर्शन झाले. लग्नाची पत्रिका ठेवली, आनंदीने आशीर्वाद घेतला.
सगळ्यांची पूजा झाल्यानंतर तिथून निघाले.
घरी गेल्या गेल्या काही वेळातच निनाद घरी आला, निशाने दार उघडला.
“निनाद.. आज इकडे कसा काय? झाली लग्नाची तयारी?” निशा
“हो हो सगळं चाललंय, मला आनंदीशी बोलायचं होतं, मी तिला बाहेर घेऊन जाऊ शकतो का?” निनाद
“आता एवढं काय बोलायच आहे?चार दिवसांत तुमचं लग्न होणार आहे.” निशाने त्याला गंमत केली तसा तो लाजून हसला आणि सोफ्यावर बसला.
निशाने त्याला पाणी दिलं.
“तुमची खरच काही हरकत नसेल तर मी तिला घेऊन जाऊ शकतो का?” निनाद
“हो हो तू बस, मी आनंदीला बोलावते.” निशा
निशाने तिला आवाज दिला,
“आनंदी..आनंदी खाली ये.”
आनंदी खाली आली, त्याच्या समोर उभी राहिली. तिला त्याच्याशी बोलायची इच्छा होत नव्हती.
“आनंदी पटकन रेडी हो, आपण बाहेर जाऊया. मला तुझ्याशी बोलायचे आहे.” निनाद
“इथेच बोला ना काय बोलायचे ते, उगाच बाहेर कशाला? आता लग्न होणार आहे ना आपलं, उगाच जास्त कशाला बाहेर फिरायचं.”
“अगं नाही नाही, तू चल. हे घे तुझ्यासाठी आणलंय. हा ड्रेस घाल आणि चल पटकन तयार हो.”
निनादने त्याच्या हातातील बॅग तिच्या हातात दिली, ती वर खोलीत गेली. ड्रेस बघितला, एक ब्लॅक स्टोन वर्क केलेला लॉन्ग वन पीस होता. आनंदीने तो ड्रेस घातला आणि छान तयार झाली. दोघेही जायला निघाले. वाटेत दोघेही एकमेकांशी बोलले नाही. निनाद तिच्या कडे बघायचा, पण आनंदी बाहेर बघत होती. आनंदी अगदी गप्प बसली होती.
म्युझिक सिस्टम तेवढा कमी आवाजात सुरू होता.
“क्या खफा हो गई हमसे
कि तुम हमसे रूठ गये,
क्या खफा हो गई हमसे
कि तुम हमसे रूठ गये..
ये जानम बताओ..
जानम बताओ..
क्या गलती हो गयी..
जानम बताओ..
क्या गलती हो गई,
क्या खता हो गई की
तूम हमसे रूठ गये.”
बघता बघता गाडी एका आलीशान हॉटेल समोर उभी राहिली.
दोघेही उतरले.
निनादने आधीच टेबल बुक करून ठेवलेलं होतं. मॅनेजर त्यांना तेथे घेऊन गेला. दोघेही बसले..
आजूबाजूला कोणतही टेबल बुक नव्हतं, हलका म्युझिक सुरू होतं आणि आजूबाजूला डेकोरेशन केलेलं होतं.
“काय घेणार आहेस तू?” निनाद
“नको, काही नको..” आनंदी
“काही नको कसं? आपण जेवण करायला आलोय. तुला कोणती डिश आवडते ते तू सांग, आपण ऑर्डर करू.” निनाद
“नाही, नाही नको तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बोलवा.” असं म्हणून ती गप्प झाली.
त्याने जेवण ऑर्डर केलं. जेवण करताना सुद्धा दोघेही बोलले नाही. निनादला खूप काही बोलावस वाटत होतं, खूप इच्छा होती बोलायची पण आनंदीचा चेहरा बघून तोही जास्त बोलला नाही. दोघांचं जेवण झालं. दोघांनी स्वीट डिश घेतली.
त्यानंतर निनाद आनंदीकडे बघून,
“आनंदी माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे.” निनाद
“सरप्राईज? काय आहे?” आनंदी
“आनंदी सरप्राईज आहे, तुला कसं सांगणार? तू डोळे बंद कर.” निनाद
“हा काय फाजीलपणा आहे?” आनंदी
“त्यात काय फाजीलपणा? तू डोळे बंद कर बघू.” निनाद
आनंदीने डोळे बंद केले आणि निनादने तिला दोन्ही हाताने उभं केलं आणि तिला घेऊन गेला.
दोघे पायऱ्या चढून वर गेले.
क्रमशः
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा