Login

काटेरी वाटेवरून चालताना...भाग 62

Tyacha phon swich of aahe, kuthe shodhu tyala

काटेरी वाटेवरून चालताना भाग 62


आधीच्या भागात आपण पाहिले की,


निशा विक्रम वर खूप चिडली, ती दोन- तीन दिवस ऑफिसला गेलीच नाही पण त्यांनतर तिथे गेल्यानंतर तिला कळलं की विक्रम ऑफिसला येतच नाही आहे. निशाने फोन केला पण त्याने रिसिव नाही केला त्यांनतर मोबाईल स्विच ऑफ दाखवायचा. निशाला खूप रडायला येत होतं, ती घरी गेली आणि निर्मलाला सगळं सांगितलं. आनंदीलाही सगळं कळलं, तिघ्याही काळजीत होत्या, सगळे आपआपल्या परीने कुठून काही माहिती मिळते का बघत होत. निशा ऑफिसमध्ये गेली,विक्रमच्या केबिनमध्ये जाणार तोच कुणीतरी आवाज दिला.


आता पुढे,


निशाने पलटून बघितलं तर समोर एक हट्टाकट्टा शरीरयष्टीचा, उंचपुरा,गोरा भरारा,काळा गॉगल लावलेला माणूस उभा होता.

“एक्सक्यूज मी, तुम्ही आत कुठे चाललात?”

“हे विचारणारे तुम्ही कोण?” निशा
त्या व्यक्तीला राग आला, त्याने हाताच्या पंज्यांची मूठ केली. डोळे बंद केले आणि 

“हरीकाका....” जोरात आवाज दिला.
तसे हरिकाका धावत आले.
“येस सर?” 

“ही उद्धट मुलगी कोण आहे?”

“साहेब या निशा मॅडम आहेत.”

“हरी काका यांना जरा माझी ओळख करून दे आणि माझ्या केबिनमध्ये पाठव.” असं म्हणून तो व्यक्ती केबिनच्या आत गेला.
“काय करताय निशा मॅडम? नवीन बॉस आहेत ते आपले?” हरिकाकाने निशाला दबक्या आवाजात सांगितलं.

“हा कधी आला?” निशा

“काल तुम्ही ऑफिसमधून लवकर गेलात ना, त्यानंतर ते आले.  समीर जहागीरदार नाव आहे त्यांचं. कडक आहेत जरा सांभाळून आणि आता आत जा.” हरिकाका

“मी जाणार नाही.” निशा

“असं काय करताय? हरीकाका
“हरीकाका तुम्हाला माहिती आहे का? विक्रम सापडत नाहीये कुठे? कुठे गेलाय कुणास ठाऊक? त्याचा काहीच पत्ता नाही, फोन लागत नाहीये. मला सांगा मी विक्रमला कुठे शोधायचं?” निशा

“मॅडम ते मी कसं सांगायचं? पण मी विनंती करतो मॅडम आता आतमध्ये जा. नाहीतर सर माझ्यावर ओरडतील.”

निशा शांत झाली, तिने होकारार्थी मान हलवली आणि ती आत गेली.
“मे आय कम इन सर.”
“येस..”

निशा आत गेली, त्याच्या टेबल समोर खाली मान घालून उभी झाली. समीर वाट बघत होता की निशा काहीतरी बोलेल. ती सॉरी म्हणेल पण असं काही झालं नाही. निशा गप्प उभी होती. समीरचा पारा चढत होता, त्याचा राग अनावर झाला आणि त्याने टेबलवर जोरात हात मारला.
“तुम्ही काय बोलणार आहात का मिस निशा?”

हात आपटल्याने निशा दचकली,
“सॉरी सॉरी सॉरी सॉरी.. मी तुम्हाला ओळखलं नव्हतं म्हणून मी तुमच्याशी अशी वागले. पण आता समोर असं नाही होणार.” निशा अडखळून बोलली.

समीर शांत झाला, त्याने निशाला बसायला सांगितलं.
“प्लिज हॅव अ सीट.”

“नो थँक यु सर.”
“मिस निशा प्लिज बसा तुम्ही.”
निशा बसली.
समीरने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला.
“काय झालं मिस निशा तुम्ही असं का वागत आहात? आणि तुम्ही केबिनमध्ये कशासाठी येत होतात? इथे तर कोणीच नव्हतं.”

“काही नाही सर.” असं म्हणत निशा बाहेर आली.
निशाने दिवसभराचं काम केलं आणि संध्याकाळी ती घरी जायला निघाली. अचानक तिच्या मोबाईलची रिंग वाजली पण पटकन आवाज बंदही झाला. तिने मोबाईल चेक केला तर मिस कॉल फ्रॉम विक्रम असं आलं. निशाची धडधड वाढली, तिने पटकन तो नंबर डायल केला पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता.

“असा कसा बंद झाला? आता तर ऑन दिसत होता. मग आता का स्विच ऑफ दाखवतो? विक्रम का अस करतोस? तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? मग रिंग का केलीस? नको रे इतका त्रास देऊ.” निशा स्वता:शीच बोलली.

निशा घरी गेली, तिने मेघाला फोन केला आणि सगळं सांगितलं.तिच्या मनाची घालमेल  शेअर केली.

“निशा मी तुला सांगू का तुझ्या सगळ्या बोलण्यावरून मला हेच वाटतं की तू विक्रमच्या प्रेमात पडली आहेस.” मेघा

“यार तू माझा प्रॉब्लेम वाढवू नकोस प्लिज.” निशा

“मी खरच तुझा प्रॉब्लेम वाढवत नाही आहे. तू खरच प्रेमात पडलीस. असं नसतं तर मला सांग तुला त्रास का झाला असता? का तुला त्याच्याशी बोलावसं वाटतंय? का तू त्याच्यासाठी इतकी धडपड करते त्याला शोधण्यासाठी, काय गरज आहे तुला? या सगळ्याचा अर्थ असा होतो कि तू त्याच्या प्रेमात पडली आहेस. तू मान्य कर निशा हे प्रेमच आहे.”

“मेघा असं आयुष्यात दोनदा प्रेम करता येतं का गं? म्हणतात की आयुष्यात फक्त एकदा प्रेम केल्या जातं तेच पहिला आणि ते शेवटचं असतं. माझं पहिलं प्रेम तर रोहित होता, मग आता हे सगळं काय आहे?” निशा

“निशा प्रेम कुठेही कसही होत. प्रेम व्यक्ती बघून करत नाही का तर  ते होत जाते. ते आपल्या हातात नसतं किंवा एखादा व्यक्तीला त्याच्यासोबत रहावस वाटतं, त्याच्याशी बोलावसं वाटलं तर त्यात चूक काय आहे? एखाद्या व्यक्तीची कंपनी चांगली वाटते, त्याच्याशी बोलणे, आपलं मन व्यक्त करणे यात काय चूक आहे?” मेघा

“पण मेघा मला हे सगळ आता नकोय ग. मला पुन्हा त्या त्रासातून जायचं नाहीये. विक्रमने पुन्हा तसं काही केलं तर?” बोलता बोलता निशाचे डोळे पाणावले.”

“ निशा का अशी करतेस? सगळीच माणसे सारखी नसतात, सगळ्यांना एकसारखं का बघतेस?” मेघा

“पण मी ठाम विश्वास तरी कसा ठेवायचा? तो आत्ता चांगलं वागतोय कारण त्याला मला मिळवायचं पण नंतर त्यांनर असं काही केलं तर? मला सोडून गेला तर आणि यावेळी फक्त मला नाही तर आनंदीला सुद्धा त्रास होईल कारण ती पण त्यात अडकली आहे, तिला पण तो बाबा म्हणून हवा आहे.” निशा

“मग ही तर चांगली गोष्ट आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? निर्मला काकूंना प्रॉब्लेम नाही, आनंदीला पण प्रॉब्लेम नाही मग तू अशी काय करतेस? सगळं नीट होईल तू हो म्हण त्याला आधी.” मेघा

“सोडून गेला मला, काहीही न सांगता कुठेतरी निघून गेला.” निशा

“मग शोधना त्याला.” मेघा

“कुठे शोधू? त्याचा फोन स्विच ऑफ आहे. मला त्यांच घर माहीत नाही. मला त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नाही, तूच सांग अशा परिस्थितीत मी त्याला कुठे शोधायचे.


त्याच्या फोनची वाट बघायची एवढंच माझ्या हातात आहे. तेवढेच करू शकते घरचे. सगळे अपसेट होते, आनंदी पण अपसेट होती.  तिने पण हे सगळं खूप मनावर घेतलं.” निशा

“मला काहीच कळत नाहीये मी काय करू.” निशा

“सगळ्यात आधी टेन्शन घेऊ नकोस. शांत राहा. तो जिथे कुठे असेल व्यवस्थित असेल. तू येईल तू फक्त वाट बघ.”  मेघा
“मला नाही वाटत तो माझ्यावर चिडला असेल. त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं नाही ना म्हणून तो निघून गेला.” निशा दिवस-रात्र विक्रमचा विचार करत बसायची.

असे बरेच दिवस निघून गेले आणि अचानक...
एक दिवस दाराची बेल वाजली, निशाने दार उघडुन बघितल तर समोर एक माणूस उभा होता. अंगातले कपडे फाटलेले चेहऱ्यावरची दाढी मिशी वाढलेली, विखुरलेले केस हाताला इंजेक्शन लागलेला होता. पायात चपला नव्हत्या.

“कोण आहेस रे? कोण हवय तुला? आमच्याकडे काही नाही. कोण आहे तु? जा इथून जा चल. समोरच्या घरी जा तिकडे जाऊन बस? असा म्हणून निशा त्याच्या तोंडावर दार लावणार तेवढ्यात त्याने आवाज दिला.

“निशा..” त्याला बोलता येत नव्हतं. तो  जोरजोरात श्वास घेत होता. आणि त्याच्या श्वासातून पुन्हा एकदा आवाज आला.
“निशा..”  तिचे पाय तिथेच थांबले आणि तिने त्याच्याकडे बघितलं, आणि बघतच राहिली.


क्रमशः

🎭 Series Post

View all