काटेरी वाटेवरून चालताना भाग 67
आधीच्या भागात आपण पाहिले की,
राजीवने आनंदीला प्रपोज केले होते, लग्नाची मागणी घातली पण आधी होकार देऊन नंतर राजीवच्या बाबांनी लग्नाला नकार दिला. अशा घरातली मुलगी सून म्हणून नको आहे आम्हाला जिथे मुलीच्या आईचे दोन दोन विवाह झालेले आहेत अस म्हणून त्यांनी लग्न तोडलं. या सगळ्या गोष्टींवरून विक्रमने राजीवच्या बाबांना सांगितलं की आम्हीच लग्न मोडतो. आनंदीने पण राजीवला सांगितलं की मला पण अशा घरात लग्न करायचं नाही आहे जिथे अश्या विकृतीचे लोकं राहतात. दोघांचे कॉलेज संपल्याने दोघे नजरेआड झाले.
आता पुढे,
कॉलेज संपल्यानंतर आनंदी तिच्या घरी आली, आता काही महिने ती घरीच राहणार होती. घरी गेल्या गेल्या निशा तिला बिलगली. तिला वाटलं आनंदी खूप अपसेट असेल, तिला धक्का बसला असेल, तिला त्या धक्क्यातून बाहेर काढावा लागेल. निशाने तिच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी बघितलं.
पण असं काहीही नव्हतं आनंदीने टेन्शन घेतलेलं नव्हतं. जर ती राजीवमध्ये गुंतली असती तर तिला त्रास झाला असता पण ती राजीवमध्ये गुंतलेली नव्हती उलट राजीव तिच्यामध्ये गुंतला होता. त्यामुळे त्याला जास्त त्रास झाला.
सगळे सुरळीत सुरु झालं, आनंदीच्या जुन्या मैत्रिणी रिया आणि प्रिन्सि तिला भेटायला आल्या. प्रिन्सीचं एज्युकेशन सुरू होतं आणि रियाच लग्न ठरलेलं होतं. दोघी घरी आल्या तिघांच्या गप्पा सुरु झाल्या.
“काय ग आनंदी, दोन वर्ष होस्टेलवर राहिलीस ना एखादा मुलगा गटवला नाहीस.” प्रिन्सीने तिला गम्मत केली.
“काय ग तुझी भाषा? आता मोठी झालीस जा आता तरी नीट बोलत जा. मला विचारते, तू सांग तुझं काय? तू नाही पटवला एखादा मुलगा?”
“नाही ग, मी अशी लठ्ठ मुलगी मला कोण पसंत करणार.” प्रिन्सि
“मी बघेन माझ्या मैत्रिणीसाठी नवरा मुलगा.”
रिया विषयी ऐकून तिला छान वाटलं, आनंदीला आश्चर्य वाटलं कारण तिला रियाच्या लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हतं.
“तुझं लग्न जमलं रिया.?”
रियाने लाजून होकारार्थी मान हलवली.
“कोण आहे मुलगा? कुठे राहतो?” आनंदीने विचारलं.
“आमच्या रिलेशन मधलाच आहे, लहानपणापासून एकमेकांना ओळखतो आम्ही. आमचं चार वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होतं.” रियाने सांगितलं.
“काय? चार वर्षापासून? किती स्वार्थी आहेस ग तू, आम्हाला साध सांगितलं सुद्धा नाही. चीटर.. चीटर चीटिंग केलीस. आम्ही तुझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो आणि तू एवढी मोठी गोष्ट आम्हाला सांगितली नाहीस.” आनंदी
“सॉरी यार, घरी सांगायचं राहिलं होतं ना म्हणून तुम्हाला नाही सांगितलं. मागच्याच महिन्यात आम्ही एकमेकांच्या घरी बोललो आणि घरून परमिशन मिळाली. पुढच्या वीक मध्ये एंगेजमेंट आहे.” रिया
“रिया तुझ्या एंगेजमेन्ट पार्टी मध्ये खूप धमाल करुया.” आनंदी
प्रिन्सी एकदम एक्साइट झाली.
“आनंदी तुझं काय ग? खरंच तुला मुलगा आवडला नाही का गं?”प्रिन्सि
“एका मुलाने मला प्रपोज केलं होतं, पण मी नकार दिला.” आनंदी
“का? दिसायला... दिसायला चांगला नव्हता.” प्रिन्सि
“चांगला होता पण त्यांना जेव्हा आईबद्दल कळलं तेव्हा आई बद्दल तो वाईट बोलू लागला. मला अशा घरात जायचं नाहीये जिथे माझ्या आईचा मान होणार नसेल म्हणून मी त्याला नकार दिला.” आनंदी भावुक झाली.
“कशा कशा विचाराची माणस असतात. आपण दुसऱ्याबद्दल नेहमी चांगला विचार करतो समोरच्या आपल्या मनात आशा असतो. मी अशाच घरात लग्न करेल जिथे माझ्या आईला मान मिळेल. माझ्या आईचा भूतकाळ स्वीकारून ज्यांनी मला स्वीकारलं त्याच घरात मी लग्न करेल.” आनंदीने स्पष्ट केलं.
“आनंदी अभिमान वाटतो मला तुझा” प्रिन्सी लगेच बोलली तसेच रियाने तिच्या पाठीवर एक थाप मारली.
निशा चहा नाश्ता घेऊन आली, निशाचा चेहरा उदास वाटला. आनंदीने विचारलं,
“काय झालं आई?” आनंदी
“नाही ग, काही नाही..” निशा
“आई तू माझ्या लग्नाचं टेन्शन का घेत आहेस?” आनंदी
“नाही ग, मी टेन्शन घेत नाहीये.” निशा
“मग काय? मी आल्यापासून बघते तुझा चेहरा उदास आहे. मी जाऊ का आता? जातेच बाई मी. मी आले याचा तुला काही आनंद झालेला नाहीये. मी तुझी एकुलती एक मुलगी पण मलाही पाहून जर तुला आनंद होणार नसेल तर माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही उरला.” आनंदी भडाभडा बोलली.
“तस नाही.” निशा
“आता बाबा आहे ना तुझ्यासोबत, तुला माझी गरज नाही.”
“गप बस आनंदी, यानंतर असं बोलायचं नाही. माझ्या जीवनात सर्व प्रथम तुला महत्व त्यानंतर बाकीच्यांना. तू माझी लाडाची लेक ग. तूच माझी प्रायॉरिटी आहेस बाकी सगळे नंतर.” निशाने आनंदीला जवळ घेतलं.
“आई, बाबा कुठे आहे?” आनंदीने विक्रम बद्दल विचारलं.
“तो ऑफिसला गेला.” अस बोलून निशा बाहेर गेली.
थोड्यावेळाने आनंदीच्या मैत्रिणी आपापल्या घरी निघून गेल्या. काही महिन्याने आनंदीला कॅम्पस थ्रू चांगल्या कंपनीत जॉब मिळाला. सगळे खूप आनंदात होते पण अचानक निर्मलाची तब्येत खराब झाली आणि तिला हॉस्पिटलाईज करावं लागलं.
वयोमानाने निर्मला कुठल्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नव्हती. त्यामुळे आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहून निर्मलाचा देहांत झाला. या गोष्टीचा आनंदीला आणि निशाला खूप मोठा धक्का बसला. कारण निशाच्या कठीण काळापासून निर्मलाने तिला साथ दिली होती. आनंदीच्या जन्माच्या आधीपासूनच निर्मला निशासाठी खूप काही केलेलं होतं. आनंदी पण तिच्या अंगावरची हसली खेळली होती म्हणून तिलाही खूप त्रास झाला. विक्रमने दोघींनाही सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं रडणं थांबेना.
आनंदी तर निर्मलाचा फोटो छातीशी कवटाळून बसलेली होती. निशा मृतदेहाला बिलगून होती.
“आई अशी का सोडून गेलीस ग? आता तर तुझ्या नातीचं लग्न व्ह्यायचं बाकी आहे. तिला चांगली नोकरी मिळाली. आपल्याला आपले कार्य पूर्ण करायचे आहे. आपल्याला आनंदीच लग्न लावून द्यायचं आहे. का गेलीस आई? आता तर सुखाचे दिवस आले होते, ते बघण्यासाठी तू माझ्या सोबत हवी आहेस.” असं म्हणत निशा रडायला लागली.
“ज्यावेळी कुणी मला साथ दिली नाही त्यावेळी तू माझ्या सोबतीला होतीस, माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलीस आणि आज माझ्या सुखाच्या वेळेस तूच माघार घेतली. का? का आई? आई का सोडून गेलीस ग मला. आता तर आपले चांगले दिवस आले होते ते नाही का बघायचे होते तुला. असं मला एकटीला टाकून गेलीस. माझ्या दुःखाचा वेळेस माझ्या सोबत होतीस आणि आता मला सुखाच्या वेळेस निघून गेलीस.”
निशाचं रडणं सुरू होते तितक्यात समिध, तिचे मिस्टर आणि तिचा एक मुलगा तिघेही आले. समिधाला बघताच निशा तिला जाऊन बिलगली आणि दोघ्याही खूप रडायला लागल्या. हळूहळू लोकं जमायला लागलीत. काही बाया निशाचं सांत्वन करायला आल्या.
सगळ्या विधी संपन्न झाल्या आणि आणि निर्मलाला आता नेणार तितक्यात आनंदी खोलीतून बाहेर आली.
“थांबा माझ्या आजीला कुणीही हात लावायचा नाही. तिला कुठेही न्यायचं नाही आहे.” आनंदी निर्मलाला बिलगली.
“आजी..उठ ना ग,अशी काय करते उठ ना. तुला काही त्रास होत असेल तर सांग आम्हाला आम्ही करू काहीतरी पण तू अशी आम्हाला सोडून जाऊ नकोस. आजी अशी सोडून जाऊ नकोस. माझं ऐक ना, ये आजी बघ ना, तुझी आनंदी तुला किती आवाज येत आहे. ती जोरजोरात रडायला लागली विक्रमने तिला सांभाळलं तिला बाजूला केलं. निर्मलाचा मृतदेह स्मशानभुमी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्मलाला मुलगा नसल्याने मुखाग्नी देण्याचा पूर्ण अधिकार मुलींना होता. त्यातल्या त्यात निर्मला निशाकडे राहत असल्यामुळे सगळ्यांनी निशाला म्हटलं की तू आईच्या देहाला मुखाग्नी दे.. पण निशाने नकार दिला. तिला आनंदीच्या हातून निर्मलाच्या देहाला मुखाग्नी द्यायचा होता.
आनंदीने निर्मलाच्या देहाला मुखाग्नी दिली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा