शीर्षक -कथा एका निष्पाप जीवाची भाग १
" अगं ये बये, काय करतेस गं? केव्हाची आवाज देत आहे."
रश्मीच्या सासूबाई तिला आवाज देत होत्या. पण रश्मी स्वयंपाक करण्यात गुंग असल्यामुळे तिला सासूबाईचा आवाज ऐकू आला नाही पुन्हा आनंदीबाई जवळ जवळ ओरडल्याच.

"अगं बहिरी झालीस की काय? केव्हाची आवाज देत आहे."
त्यांचं ओरडणे ऐकून आनंदराव हॉलमधून बाहेर आले.

"का ग कशाचा एवढा एवढा कोलाहल चालवला आहेस? सारखे सारखे तिच्या मागे ओरडत असतेस आणि हो तिला चांगल्या शब्दात आवाज देता येत नाही कां तुला?" आनंदराव म्हणाले.
" हे पहा, मी सांगून ठेवते सारखं सारखं सुनेला पाठीशी घालत मला दूषणं लावू नका." आनंदीबाई एकदम उसळून बोलल्या. अशीही रोजच होणारी बाचाबाची. रश्मी आणि रमाकांत यांचे लग्न होऊन अवघा महिनाही झाला नसेल तेव्हापासूनच असा एकही दिवस उगवला नाही की आनंदीबाईंनी रश्मीशी वाद घातला नसेल.
रश्मी एका गरीब कुटुंबातील मुलगी. दिसायला सुंदर, शिकलेली परंतु स्वभावाने अत्यंत सालस. कधीच उलटून बोलणार नाही. मात्र आनंदीबाई अत्यंत खाष्ट स्वभावाच्या. जरा कुठे इकडे तिकडे झालं की लगेच सारखं सारखं त्या रश्मीच्या मागे लागायच्या. तिच्या आई-वडिलांचा उद्धार करायच्या. तुझ्या आईने हेच शिकवलं कां? वगैरे वगैरे बरंच काही. पण रश्मीने कधीच त्यांना प्रत्युत्तर दिले नाही.
आनंदीबाईंना रमाकांत नावाचा एकच मुलगा. लाडाकौतुकात वाढलेला. रमाकांत अभ्यासात हुशार, दिसायला तरणाबांड. शिक्षण पूर्ण करून तो एका कॉलेजमध्ये नोकरीला देखील लागला. पण सारे काही सुरळीत असताना एक दिवस त्याच्या छातीत दुखू लागले.डाॅ.नी त्याच्या हृदयाच्या झडपा (व्हॉल्व्ह) निकामी झाल्याचे निदान केले. आनंदीबाईंच्या व आनंदरावांच्या पायाखालची वाळू सरकली. दोघेही सुन्न झाले. डॉक्टरांनी त्यांना कृत्रिम हृदय बसविण्याचा सल्ला दिला. आणि कृत्रिम हृदयाच्या आयुष्याबद्दलची कल्पना सुद्धा दिली. रमाकांतला कृत्रिम हृदय बसविण्यात आले. कसाबसा हृदयावर दगड ठेवून ते दांपत्य या धक्क्यातून हळूहळू सावरू लागले.
आता आनंदीबाईंनी रमाकांत चे लग्न करण्याचे ठरवले. स्थळे पाहण्यास सुरुवात झाली. नातेवाईकांपैकी कुणीतरी रश्मीबद्दल सांगितले. गोड, चुणचुणीत रश्मी पाहता क्षणीच सर्वांना पसंत पडली. रश्मी व रमाकांतचे थाटामाटात लग्न झाले. इथूनच रश्मीच्या दुर्दैवाला सुरुवात झाली होती. कारण आपल्या मुलाच्या आजाराचे, त्याच्या कृत्रिम हृदयाबद्दलची माहिती रश्मीच्या माहेरच्यांना देण्याचे आनंदीबाई व आनंदरावांनी टाळले होते. एक प्रकारची ही फसवेगिरी होती. एका सुंदर सालस मुलीचे त्यामुळे संपूर्ण जीवनच उध्वस्त होणार होते. रमाकांत सुद्धा आई-वडिलांच्या दबावामुळे चूप राहिला. लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या पाठोपाठ दोन वर्षांनी रश्मी व रमाकांतला दुसरी मुलगी झाली.
मात्र लग्नापासून सुरू झालेला तिचा सासुरवास संपतच नव्हता. तेच घालून पाडून बोलणे, सतत अपमान करणे. आनंदरावांना या गोष्टीचे वाईट वाटायचे पण त्यांचे आनंदीबाई पुढे काहीच चालत नव्हते. रमाकांतच्या आजाराची पुसटची कल्पनाही त्यांनी रश्मीला कधीच तिला येऊ दिली नाही. रश्मी आता मुलांच्या बाललीला आणि घरची कामं यात पूर्णपणे गुंतून गेली होती मात्र अखेरीस तो काळाकुट्ट दिवस उगवला. बसल्या बसल्याच रमाकांत धाडकन जमिनीवर कोसळला. त्याला लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
बायको, आई वडील, दोन छोटी छोटी मुलं यांना सोडून रमाकांत निघून गेला होता. कधीही परत न येण्यासाठी. रश्मीने हंबरडा फोडला. मुलं रडू लागली. रश्मी धाय मोकलून रडत होती. तिचा आक्रोश पाहणाऱ्यांच्या हृदयाला पाझर फोडणारा होता.
काय झाले? कसे झाले? अनेक अनुत्तरीत प्रश्न. आनंदीबाई आणि आनंदराव सुन्न मनाने बघत होते.
रश्मीच्या आई-वडिलांचा तर या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. परंतु जे व्हायचे ते होऊन गेले होते.
रश्मीने कसेबसे स्वतःला सावरले. मुलांकडे पाहत तिने आपल्या अश्रूंना आवरते घेतले. रमाकांतचे तेरावे आटोपले. आता तर आनंदीबाईंचा जाच जास्तच वाढला.

"तूच माझ्या मुलाची काळजी घेत नव्हती. तूचं मारलेस माझ्या मुलाला." वगैरे वगैरे.
पण आपल्या मुलांकडे पाहून ती हे सर्व सहन करीत होती. पण सत्य एक ना एक दिवस बाहेर येतेच. तिला रमाकांतच्या तब्येतीच्या पूर्व इतिहासाची माहिती मिळाली. आपल्याला, आपल्या आई वडिलांना सासरच्यांनी फसविले, एवढी मोठी गोष्ट सर्वांपासून त्यांनी लपवून ठेवली. किती मोठी क्रूर चेष्टा होती ही.

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा