शीर्षक - कथा एका निष्पाप जीवाची भाग २
निष्पाप रश्मीची, तिच्या आई-वडिलांची ही केवढी मोठी क्रूर थट्टा होती. पण अत्यंत सालस स्वभावाच्या रश्मीने चेहऱ्यावर जराही ते जाणवू दिले नाही. आता तिने नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले परंतु आनंदीबाई ने मात्र "तू जर नोकरी करु इच्छित असेल तर तुला हे घर सोडावे लागेल" असे फर्मान सोडले. रश्मीने मनाशी खूप विचार केला. नाही तरी इथेही राहून रोज तिच तिच बोलणी, तिच तिच दूषणं ऐकण्यापेक्षा आपण आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करायला हवा. हे तिने मनाशी पक्के केले.
पण एवढ्या प्रमाणात फसवणूक करूनहीआपल्याशी क्रूर खेळणाऱ्या सासू-सासर्यांना सोडून जाण्यासही तिचं मन धजेना. " केवढा हा समंजसपणा."पण आनंदीबाई ने मात्र आपल्या सुनेला, नातवंडांना अक्षरशः घराबाहेर हाकलून दिले. दगडाचे काळीज असणारी ही माता, नाही तिला माता कशी म्हणणार? पण हे खरं होतं. असंही होऊ शकतं?
पाहणारे ही एकमेकांना जणू हा प्रश्न विचारत होते शेवटी दोन मुलांना सोबत घेऊन रश्मी किरायाच्या घरात राहू लागली.
रश्मीच्या आई-वडिलांनी तिला त्यांच्या घरी येण्याची विनंती केली पण तिने त्यांना स्पष्ट नकार दिला. सुदैवाने रश्मीला एका ऑफिसमध्ये नोकरीही मिळाली. हळूहळू मुलं मोठी होऊ लागली. पण मन मात्र सतत तिला एकच प्रश्न विचारायचं.

"हे कसं झालं?" आणि ती अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची.
तिने मुलांना शाळेत घातले. एक दिवस तिला कळले की तिचे सासरे ही सासूबाईंच्या कटकटीला कंटाळून कुठेतरी निघून गेलेत.पण तिने आता कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता जगायचं ठरवलं होतं. मुलं मोठी झाली. तिचाही नोकरीत बऱ्यापैकी जम बसला. हातात पैसा दिसू लागला. सुट्टीच्या काळात मुलं आजोळी जाण्यासाठी आग्रह करू लागली. तिलाही आता आई-वडिलांची आठवण येऊ लागली होती. कारण बरेच दिवस झाले ती आपल्या आई-वडिलांकडेही गेली नव्हती. अशा रितीने आजोळी जाण्यासाठी मुलांनी तयारी सुरू केली. मुलं खूप खुश होती.

"आई, आपण गाडी घेऊया ना ग. माझ्या मित्रांकडे छान छान गाडी आहे. त्यांचे बाबा सर्वांना घेऊन बाहेरगावी जात असतात."रश्मी चा मुलगा म्हणाला. मुलीने सुद्धा त्याला री ओढली.
"आई, घे ना ग तू ही गाडी. आपण कुठेही मग गाडीने जात जाऊया."
मुलांचे किती निरागस प्रश्न.
पण रश्मी मात्र स्तब्धचं. कसं सांगावं मुलांना समजावून? कारण मुलांना वाटायचं इतरांचे आई वडील कसे गावाला जाताना किंवा इतरत्र कुठेही जाताना स्वतःच्या गाडीने जातात. मग तिनेही ठरवलं, स्वतःच्या नाही तर एखादी किरायाने गाडी घेऊन आपण आई-वडिलांच्या भेटीला जायचं. निदान मुलांची हौस तरी पूर्ण होईल.
आणि अशाप्रकारे गाडी करून ते सर्वजण आजोळी जाण्यासाठी निघाले.
विशेष म्हणजे रमाकांच्या हार्टच्या आजाराची माहिती तिने अजूनही आपल्या आई वडिलांना सांगितली नव्हती. तिचं म्हणणं असं होतं की सांगून काही उपयोग नाही. जे व्हायचे ते होऊन गेले. म्हातारे निष्पाप जीव विनाकारण काळजी करतील. त्यापेक्षा गप्प बसणेच तिने स्वीकारले. दोन्ही मुलं खूप आनंदात होती. हसत खेळत त्यांचा प्रवास सुरू होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. इथेही दुर्दैवाचा दुसरा फटका तिला बसला. ती ज्या गाडीने मुलांसह निघाली होती त्या गाडीला अपघात झाला.

" खेळ कुणाला दैवाचा कळला? मी असो, तू असो, हा असो, कुणी असो, दैवलेख ना कधी कुणा टळला "
ज्या आई-वडिलांच्या भेटीला ती निघाली होती, ज्या आजी-आजोबांना भेटण्यास मुले उत्सुक होती. त्यांना जेव्हा याबद्दल अपघाताबद्दल माहिती मिळाली तेव्हा तर सारा हलकल्लोळ झाला.
माझ्या मुलीने एवढी कोणती चूक केली की तिला एकापाठोपाठ एक आघात सहन करावे लागत आहे. रश्मीचे आई वडील स्वतःच्या मनाशीच प्रश्न विचारत होते. सर्वजण अपघात स्थळी पोहोचले. तोपर्यंत लोकांनी त्यांना दवाखान्यात नेले होते. रश्मी तर शुद्धीवरच नव्हती. दोन्ही नातवंडे मात्र आजी-आजोबांना बिलगली. सुदैवाने दोन्ही मुलं सुखरूप होती. कोणालाच कळेना त्यांचं सांत्वन कसं करावं ते. बऱ्याच तासानंतर रश्मी शुद्धीवर आली.
तिच्या दोन्ही पायांचे ऑपरेशन करावे लागले होते. आपल्या पायांकडे पाहून रश्मीची पुन्हा शुद्ध हरपली. डॉक्टरांनी सर्वांना धीर दिला. हळूहळू रश्मी शुद्धीवर आली. काही दिवसानंतर रश्मीच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. पण तिचा एक पाय ऑपरेशनमुळे छोटा झाला होता. त्यामुळे तिला कुबड्या घेऊनच घालावे लागणार होते.

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा