Login

कथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 10

प्रशांत आणि शामल च्या प्रेमाची कथा

शितल ठोंबरे( हळवा कोपरा )

कथा तुझी अन माझी... प्रेमापासून लग्नापर्यंत...( भाग10)

शामल काहिच न झाल्यासारख दाखवत प्रशांतशी नेहमी प्रमानेच वागण्याचा प्रयत्न करत होती... रोज गुड मॉर्निंग ...गुड नाइट चा मेसेज दिवसातून 5 ते 6 वेळा कॉल 
पण प्रशांत तिला रिप्लायच  देत नव्हता ..... असेच चार पाच दिवस गेले.... 

प्रशांत ला शामल ची आठवण येतच होती तीची कमी जाणवत होती ...तिच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याला आठवत होता...त्या बरोबर येणारी तीची आठवण त्याला अधिकच त्रास देत होती...पण तिच त्याला असं... नाही म्हणणं त्याला खटकत होतं...शामलशी एकदा तरी बोलायला हवं असं वाटूनही तो स्वत:च्या मनाला आवर घालत होता...

शामलच म्हणणं  होतं की आपण फ्रेंडस म्हणून राहूयात...पण प्रशांत शामल मध्ये आपली प्रेयसी पाहत होता...त्याला शामलला मैत्रिण म्हणून पुन्हा स्वीकारणं शक्य नव्हतं...म्हणूनच प्रशांत शामलला टाळत होता...

तिला कोणत्याही प्रकारे फोर्स न करता ....शामलला तिच्या प्रेमाची जाणीव करून देणं गरजेच होतं...कारण प्रशांतला माहित होतं शामल कितिही नाही म्हणत असली तरी तिला आपण आवडतोय...तिच्या डोळ्यात माझ्यावर असणार तिच प्रेम मी पाहिलय्ं...माझा गैरसमज नाही होऊ शकत...मी जसं शामलवर प्रेम करतो आहे तसच ती ही नक्कीच माझ्यावर प्रेम करतेय...

प्रशांतच असं शामलला इग्नोर करणं...तिच्या मेसेज ला कॉल ला उत्तर न देणं...यामुळे शामलला आता प्रशांतची कमी तीव्रतेने भासू लागली...प्रशांत सोबत घालवलेले ते क्षण तिच्या आयुष्यातील बेस्ट क्षण होते...पाण्याविना मासळी जशी तडपते तशीच काहीशी अवस्था शामल ची झाली होती...

प्रशांत तर तिला तेव्हाच आवडला होता जेव्हा तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं....या काही दिवसांच्या सहवासात तिला प्रशांत उमगत गेला....तो तिला अधिकच आवडू लागला...ती तिच्या नकळतच त्याच्यावर प्रेम करू लागली ...प्रशांत ने तिला प्रपोज केल्यावर ती खूप खूश झाली...पण तसे तिने दाखवले नाही.... प्रशांतवर असणारं आपलं प्रेम ती व्यक्त करत नव्हती...कारण तिचा नाईलाज होता...पण प्रशांत च्या अश्या वागण्याने ती रडवेली झाली...

असेच आणखीन दोन दिवस सरले...पण प्रशांतच्या वागण्यात काही बदल झाला नाही...पण आता शामलला प्रशांत शिवाय चैन पडेना...तिने त्याला मेसेज केला...प्रशांत प्लीज माझा फोन उचल...मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे....

शामलचा मेसेज पाहताच प्रशांत ने तिला कॉल केला..

शामल: हाय.. 

प्रशांत: हा हाय...

शामल: हाऊ आर यू???

प्रशांत: नॉट गुड...

शामल: क्युँ क्या हुआ??

प्रशांत: मेरा पेहला प्यार अधूरा रह गया????????

शामल: बस कर यह फिल्मी डायलॉग????...मला तुझ्याशी महत्वाच बोलायचं आहे...उद्या मला भेटायला ये...

प्रशांत: मी नाही येणार तुला भेटायला...

शामल:( शामल चिडून बोलते) का ?? काय झाले का नाही येणार भेटायला...आवडत नाही का मी तुला आता...त्या दिवशी तर खूप love u love u करत होतास.... आता संपलं का तुझं love u मला नाही माहिती तू उद्या मला भेटायला येच ...

प्रशांत: अरे वा !! इथे चिडायला पाहिजे मी तर तुच माझ्यावर चिडते आहेस...मी तुला भेटायला आलो तरी माझं म्हणणं नाही बदलणार...मी त्या दिवशी जे बोललो तेच बोलणार...तू पुन्हा नाही म्हणणारं...अन पुन्हा माझं मन दुखावणार..सारखं सारखं माझ मन दुखण्यापेक्षा मी तुला न भेटलेलच बरं...

शामल: उद्या भेट मला...आपल्या नात्याबद्दल मला महत्वाच बोलायचं आहे...

प्रशांत: काय बोलायचं असेल ते फोन वरच बोल...

शामल: फोनवर नाही बोलता येणार...तू मला भेट मग बोलू सविस्तर...

प्रशांत: असं काय बोलायच आहे तुला...

शामल: सगळ्याच गोष्टी फोन वर नाही बोलता येत...तू मला भेटायला येतो आहेस बाकी मला काही माहित नाही...

प्रशांत: ठिक आहे उद्या सकाळी नऊ वाजता भेटतो मी तुला चल बाय...

असं बोलून प्रशांत फोन ठेऊन देतो....

प्रशांत विचार करतो की का बोलावलं असेल शामल ने मला भेटायला...?? तिला दूसरं तर कोणी आवडत तर नसेल ना??काय एवढं महत्वाच बोलायच आहे?? काय असेल नक्की शामल च्या नकाराच्ं कारण...

प्रशांतच असं चिडून बोलणं शामलला मुळीच आवडलं नाही...आतापर्यंत प्रशांत तिच्या शी असं कधीच बोलला नव्हता...त्यामुळे खरतर शामलही दु:खी झाली...प्रशांत प्लीज मला समजून घे ना माझं ही तुझ्यावर प्रेम आहे ...पण मी ते अक्सेप्ट नाही करू शकत...माझा नाईलाज आहे रे.... मला तुला गमावायच ही नाही...मित्र म्हणून तू मला हवा आहेस....ती स्वत: शीच म्हणाली...

दुसरया दिवशी प्रशांत वेळेच्या आधीच युनिवर्सिटी मध्ये पोहचला...शामलला यायला अजून अर्धा तास बाकी होता...शामल ची वाट पाहत असताना त्याला तीची मैत्रीण शारदा भेटली ...

शारदा: हाय प्रशांत खूप दिवसांनी दिसला...आणि शामल कुठे आहे?? ती नाही आली तुझ्या सोबत...

प्रशांत: अरे शामलचीच वाट पाहतोय पण तिला अजूनअर्धा तास आहे यायला..

शारदा: अरे मग इथे किती वेळ उभा राहणार चल कँटीन मध्ये कॉफी घेऊयात...चालेल ना..

प्रशांत: अरे का नाही...

प्रशांत आणि शारदा कँटीन मध्ये जातात...कॉफी मागवतात आणि गप्पा मारत असतात...

शारदा: एक विचारू का??

प्रशांत: विचार ना काय झाल?

शारदा:शामल आणि तुझ्यामधे काही वाद झालाय का?

प्रशांत: असं का विचारतेस??

शारदा: शामलच्या सध्याच्या वागण्यावरून तर तसंच दिसतय..खूप चिडचिड करतेय...तू ही आज असा एकटाच दिसतो आहेस..

प्रशांत: नाही गं काही नाही...मी पण जरा कामात बिझी होतो त्यामुळे येऊ शकलो नाही...आज म्हटलं शामलला सरप्राईज द्यावं...

तेवढ्यात शामल ची आणखीन एक मैत्रीण आली...ती ही प्रशांत आणि शारदा बरोबर कॉफी घेऊ लागली..तिघांच्या गप्पा सुरु होत्या...थोड्याच वेळात शामल तिथे आली...प्रशांतला आपल्या मैत्रिणींबरोबर हसत बोलताना पाहून शामल थोडी रिल्याक्स होते...मनातल्या मनात बोलते...चला निदान याचा मूड तरी ठिक आहे...शामल ला पाहून प्रशांत स्वत:च तिच्याशी बोलू लागला...

हाय शामल...किती वेळ झालं आम्ही तुझी वाट पाहतोय...दोन वेळा कॉफी ही पिऊन झाली आमची...शामल सॉरी म्हणत त्यांना जॉइंड झाली...माझी नेहमीची बस चुकली त्यामुळे उशिर झाला...

शामल आणि प्रशांत एकमेकांना पाहून खूश होतात...अर्धा पाऊण तास सगळे गप्पा मारत बसतात...त्यानंतर शारदा लायब्ररी मध्ये जायला निघते तिच्याबरोबर तीची दुसरी मैत्रीण सुद्धा शामल आणि प्रशांत चा निरोप घेऊन निघतात...आता कँटीन मध्ये फक्त शामल आणि प्रशांत असतात...

प्रशांत: इथेच बसुयात की बाहेर जायचं...

शामल :(शामल मूळ विषया वर बोलणं टाळत असते...तिला प्रशांत बरोबर थोडा वेळ घालवायचा असतो) थांब ना जरा ...बाहेरच जाउयात...पण मी ब्रेकफास्ट करून नाही आले...सो काही खाऊयात का?

प्रशांत: ठिक आहे...

शामल जाणूनबूजून अशी डिश ऑर्डर करते जी बनवण्यासाठी वेळ लागेल...ब्रेकफास्ट झाला तरी शामल कँटीन मधून बाहेत पडणं टाळत होती...प्रशांतच्या हे लक्षात आलं...

प्रशांत:इथेच थांबायच आहे का? मला उशिर होतोय...तुला काही बोलायचच नव्हतं तर मला का इथे बोलावलस...

तेव्हा मात्र शामलचा नाईलाज झाला...आणि ती प्रशांतला म्हणाली...

शामल : ..आपण बाहेर गार्डन मध्ये बसुयात का? आपल्याला निवांत बोलत येईल...

प्रशांत: ओके...

प्रशांत आणि शामल युनिवर्सिटीच्याच गार्डन मध्ये जाऊन एका बाकावर बसतात...शामल काही क्षण शांतच बसते...तिला असं पाहून प्रशांतच शामलला विचारतो...

प्रशांत: (अगदी रुक्ष स्वरात) बोल काय बोलायच होतं तुला इतकं महत्वाच...जे एवढ्या घाई घाई ने बोलवलसं...

शामल: काय झालं अचानक तुला ...आता तर ठिक होतास...लगेच का चिडलास...

प्रशांत: मला तुझ्या मैत्रिणींसमोर आपल्यात जे काही सुरु आहे ते दाखवायचं नव्हतं...म्हणून तिथे मी नॉर्मल होतो... 

शामल: बरं जाऊ दे...मला आधी सांग तू माझा फोन का नाही उचलत होतास..ना माझ्या एकाही मेसेज ला रिप्लाय दिलास...माझी अवस्था काय झाली असेल याचा विचारच नाही केलास ना...(चिडून)तुला  इतकही नाही समजत एखाद्या मुलीशी कसं वागतात..

प्रशांत: मी चिडायला हवं तर तुच माझ्यावर चिडते आहेस...वा रे वा...कशाला उचलू फोन का देऊ तुझ्या मेसेजला रिप्लाय?? मला तुला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं..त्यावर तू तुझं उत्तर ही दिलसं...आता यापुढे मला काहिच बोलायच नाही...माझ्या साठी  तुझं उत्तर खूप महत्वाच होतं...

शामल: माफ कर मला ...माझ्यामुळे तुझं मन दुखावलं...पण खरच मला तुला असं दुखवायच्ं नव्हतं...पण माझा ही नाईलाज आहे मी तुझ्या भावनांचा आदर करते...पण तुझं प्रेम नाही स्वीकारू शकत...

प्रशांत: पण का शामल?? तुझ्या लाइफ मध्ये दूसरं कोणी आहे का?? काही असेल तर प्लीज मला सांग...

शामल: माझे मोठे बाबा म्हणजे पप्पांचे मोठे भाऊ...त्यांची मोठी मुलगी रेवा...आम्हा सर्वांची लाडकी रेवाताई...तिच्याच ऑफिसमधल्या एका मुलाच्या प्रेमात पडली...घरी समजलं घरातून थोडा विरोध झाला...पण रेवाताईच्या प्रेमापोटी सगळ्यांनी लग्नाला होकार दिला...लग्न झालं आणि दोन तीन महिन्यातच त्या मुलाने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली...माहेराहून पैसे आण..हे घ्यायच आहे ते घ्यायच आहे सगळं तुझ्यासाठीच करतो आहे...म्हणत सतत रेवाताइकडे पैश्यांसाठी तगादा लावला...
रेवा ताईने या सगळ्याला विरोध केला तर तिला मारझोड करायचा...ती जॉब करायची पण सगळा पगार तोच घ्यायचा...शेवटी एक दिवस वैतागून रेवाताईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला...त्यात ती वाचली....काका काकूंनी तिला माहेरी आणलं...तिचा डिवोर्सही झाला पण त्या घटनेमुळे घरातील वातावरण पुर्णपणे बिघडून गेलं...त्यामुळे आमच्या घरातून आपल्या  प्रेमविवाहाला कडाडून विरोध होईल....

प्रशांत: हो पण त्या मुलाच्या कृत्याची शिक्षा मला का शामल...इतर कोणाशी माझा सध्या काही संबंध नाही..मला फक्त तुझं उत्तर हवं आहे...तुझी साथ असेल तर मी कोणत्याही प्रोब्लेम ला फेस करू शकतो...शामल मी आजही तुझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे...आणि जे झालं नाही ते आधीच होईल असं गृहित धरून तू माझ्यावर अन्याय करते आहेस...

शामल काही ना बोलता मान खाली घालून शांत बसते..तिचे डोळे भरून येतात..प्रशांत च्या हे लक्षात येतं....तो शामलला समजावतो...शामल जगात असा कोणताही प्रॉब्लेम नाही जो सोडवला जाऊ शकत नाही...तुझी साथ असेल तर आपण नक्कीच काहितरी मार्ग काढू....बोल ना शामल काही तरी बोल...

शामल:(शामलच्या डोळ्यातील अश्रू गालांवर ओघळतात...आणि तिच्या मनातील भावना ओठांवर येतात...)प्रशांत ....प्रशांत खूप प्रेम करते मी तुझ्यावर ...अगदी तुला पाहिलं त्या पहिल्या दिवसापासून ...तुझ्यावरच माझं प्रेम रोज वाढतच गेलं...तुझा सहवास तुझी सोबत आवडते मला...तू सोबत असलास की खूप स्पेशल फिल होतं...जे तुझ्या बद्दल मी फील करते ते आजपर्यंत इतर कोणाबद्दल कधीच फील नाही केलं..

  पण मी आईबाबांच्या विरोधातही नाही जाऊ शकत..मी त्यांना दुखवू नाही शकत...मी द्विधा मनस्थितीत सापडलेय...काय करु काहिच नाही समजत आहे...मला कोणालाच दुखवायच नाहिये...मी कोणताही निर्णय घेतला तरी कोणी ना कोणी माझ्या मुळे दुखावणारच आहे...त्याही पेक्षा जास्त त्रास मला होणार आहे...तू म्हणशील हे सगळं असताना का मी तुझ्या प्रेमात पडले?? पण प्रेमात ठरवून पडता येत नाही ना...ते होतं...अगदी आपल्या नकळत...मी ही तशीच तुझ्या प्रेमात पडले...

प्रशांत: (शामलच उत्तर ऐकून प्रशांत खूप खूश होतो...शामलचा हात हाती घेऊन त्याला अक्षरशः नाचावसं वाटतं होतं...पण युनिवर्सिटी क्यम्पस मध्ये बसलेले असल्याने त्याने स्वत: च्या मनाला आवर घातला...शामलचे डोळे पुसत तो म्हणाला..)शामल... शामल...तुला माहित नाही आज तू मला किती मोठा आनंद दिला आहेस...तुझं उत्तर हे माझ्या जीवनाला मिळालेली संजीवनी आहे...तुझी साथ आहे तर मी कोणत्याही संकटाला हसत हसत पार करेन...तुझं उत्तरच माझी ताकद आहे...I LOVE U शामल I REALLY LOVE U...

दोघांचेही डोळे एकमेकांना पाहून चमकतात...शामल आणि प्रशांत च्या प्रेमाची इथूनच खरी सुरुवात होते....

शामलने आपल्या मनातील भावना प्रशांतला सांगितल्या खरया...पण काय असेल या दोघांच्या नात्याचं भविष्य?? विरोध की स्वीकार ???शामलच्या आणि प्रशांत च्या कुटुंबाचा निर्णय काय असेल?? शामलची भीती खरी तर ठरणार नाही??...का आणखी कसले वादळ त्यांची वाट पाहतय...पण हे जाणून घेण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत सायोनारा...
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...धन्यवाद...

🎭 Series Post

View all