Login

कथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 13

प्रशांत आणि शामल च्या प्रेमाची कथा

शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

कथा तुझी अन माझी...प्रेमापासून लग्नापर्यंत....(भाग13)

शामलचे वेकेशन सुरु झाले....त्यामुळे घरातून बाहेर पडता येईना..प्रशांतला भेटता येईना...दोघेही एकमेकांच्या आठवणीने कासावीस झालेले...आता तर कुठे त्यांच प्रेम फुलू लागलं होतं ...आणि त्यात लगेच हा विरह....कसा सहन करायचा???

प्रशांत आणि शामल दोघेही फोन वर बोलत होते...मेसेज करत होते...पण आपल्या प्रेमाला प्रत्यक्ष पाहण्याच नेत्रसुख काही दोघांना घेता येईना...प्रशांतला तर काय करु आणि काय नको असं झालेलं...अगदी देवदास बनून गेलेला...ना खाण्यापिण्यात लक्ष ना इतर कामात ...घरच्यांनाही समजेना प्रशांतला काय झालं आहे...इतके दिवस हसत खेळत असणारा प्रशांत अचानक उदास का झाला...घरात आता सर्वांना थोडी शंकाही येऊ लागली...

इकडे शामलचीही तिच अवस्था... नेमकी त्याच वेळी तीची ताई रेश्मा आपला मुलगा हर्ष ला घेऊन चार दिवस माहेरी रहायला आली...आणि त्यात हर्ष ला खेळवण्यात शामल चा वेळ जाऊ लागला...प्रशांत ला शामल ने मेसेज केला ताई आली आहे घरी...

प्रशांत: अरे वा! शामल मला ही तुला भेटायच आहे...भेट ना यार...किती दिवस झाले तुला पाहून ....मी कसा राहतोय तुझ्याविना मलाच माहित...

शामल: हो रे मला ही भेटावसं वाटतं आहे...पण मी बाहेर नाही पडू शकत रे ...तुला तर माहितच आहे न...

प्रशांत: कुछ तो जुगाड करना पडेगा..वरना ईस आशिक का हाल बेहाल हो जायेगा...

शामल:( हसते आणि प्रशांत ला मेसेज करते)... तेरे बिना जिया जाये ना..बिन तेरे तेरे बिन साजना...

प्रशांत: ओहह शामल तुमसे ये दुरी हमारी जान ही लेकर रहेगी...

शामल: चुप रे वेड्यासारखं काही बोलू नको...थोडे दिवस ...एकदा का कॉलेज सुरु झालं की भेटूच की आपण...

प्रशांत:मी तुला घरीच आलो भेटायला तर...???

शामल: तू बरा आहेस ना प्रशांत काहीही काय बरळतो आहेस...म्हणे घरी भेटायला येतो ...शक्य तरी आहे का...

प्रशांत: शामल वहिनी आल्या आहेत ना घरी हर्ष पण आहे..त्यांना भेटायला म्हणून येतो....

शामल: अजिबात नाही तू असं काहिच करणार नाही आहेस समजलं...

प्रशांत: मी असच करणार आहे ओके...एक तर तुझा बर्थडे जवळ येतो आहे...आपल्या गोड लवस्टोरी ची कहाणी सुरु झाली आणि तुझ्या पहिल्या बर्थडे ला आपण एकत्र नाही...मला मुळीच जमणार नाही शामल...तुला मी घरी यायला नको असेन तर असं काही कर की तू मला बाहेर भेटशील ओके...

शामल: प्लीज ना प्रशांत....असा काय रे लहान मुलांसारखा हट्ट करतो आहेस...वेकेशन संपल्यावर हवं तर तू माझा बर्थडे सेलिब्रेट कर ...पण आता हा भेटण्याचा हट्ट सोड ना राजा..

प्रशांत:( रागावून) असं सांग ना की तुला मला भेटायचचं नाही आहे...जाऊ दे न मी तरी तुझ्या मागे का लागलो आहे...तू कर तुझा बर्थडे तुझ्या फ्यमिली सोबत ...मी कोण आहे ना???

शामल: रागावतोस काय रे असा...लग्नानंतर माझे सगळे बर्थडे तुला च सेलिब्रेट करायचे आहेत असं समज की हा बर्थडे तुझ्या वर उधार आहे....

शामल प्रशांतला खूप समजावण्याचा प्रयत्न करते...पण प्रशांत काही तिच ऐकून घ्यायला तयारच नव्हता...शामलला समजत नाही प्रशांतला कस हैण्डल करावं...प्रशांतला भेटावस तर तिलाही वाटतं होतं...पण एक चुकिच पाऊल आणि सगळच मातीमोल...कारण शामल आणि प्रशांतच हे प्रेमप्रकरण त्यांना ईतक्या लवकर घरी सांगायचं नव्हतं...नाही तर...सगळं फिस्कटेल...हे शामल ला चांगलच माहित होतं...त्यामुळे कितिही इच्छा असली तरी ती प्रशांत ला भेटणं टाळत होती...

रेश्मा चार दिवसांसाठी माहेरी आलेली...शामलने आपल्या बर्थडे साठी आग्रह करून रेश्माला आणखीण दोन दिवस रहायला भाग पाडलंं....शामलच्या हट्टापुढे रेश्माच काहिच चाललं नाही...आणि बर्थडे पर्यंत थांबायचं तिने मान्य केलं...शामल खूश होती की ताई आणि हर्ष दोघांचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे...

शामलच्या बर्थडेला प्रशांतची इच्छा होती की सर्वात आधी शामलला मीच वीश करावं...मोबाईल हातात घेऊनच बसलेला...बारा वाजले आणि प्रशांतने शामलला गोड गोड बर्थडे विशेस देत मेसेज केला...

शामल ही प्रशांतच्याच मेसेजची वाट पाहत होती...मनात अगदी गुदगुल्या झाल्या...किती भारी फिलींग आहे नं...जे शब्दांत नाही व्यक्त करता येतं...रक्ताच नातं नसतानाही कुणीतरी ईतकं स्पेशल वाटतयं...काहिच महिन्यांची ओळख तरी असं वाटतयं खूप आधीपासून ओळखतो आपण एकमेकांना...अगदी जवळून I really love u प्रशांत शामल स्वत: शीच पुटपुटली...तेवढ्यात रेश्माचा आवाज आला काय गं झोपेत काय बडबडते आहेस...तसं शामलने गालातल्या गालात हसत डोळे घट्ट मिटून घेतले...

सकाळी उठल्यावर शामलला रेश्माने विचारले: बोल आज काय पाहिजे तुला...नाश्त्यापासून जेवनापर्यंत सर्व काही आज तुझ्या आवडीच बनणार्ं आहे...लवकर बोलं...तू म्हणशील तेच बनेल घरात...

शामल: क्या बात हैं...ईस साल का बर्थडे तो कुछ जादा ही खास हो रहा हैं...खरं तर ताई हे सगळं तुझ्यासाठी सुरु आहे...तू आहेस म्हणून हे सगळं चाललयं...नाही तर आम्हांला कोण विचारतयं या घरात...

शामल ची आई किचन मध्ये काम करत होती...आईला आवाज जावा म्हणून शामल जरा मोठ्या आवाजात म्हणाली...

तोच किचन मधून आईचा आवाज आला:..रेश्मा तिला सांग...उद्या तू ही ताई सारखी सासरी जाशील ...त्याआधी सगळे लाड पुरवते...पुन्हा बोलायला नको आई हे नाही केलस माझ्यासाठी ते नाही केलस...

शामलची आई आणि रेश्मा दोघीही हसतात....शामल थोडी चिडतच ए आई हे काय सकाळी सकाळी लग्नाच्ं सुरु केलसं...मी तुम्हा सगळ्यांना आधीच सांगितलय ...आधी शिक्षण...मग नोकरी आणि त्यानंतर लग्न समजलं...नाक उडवत शामल बोलली...

रेश्मा: आई कशाला चिडवतेस तिला...आपल्या शामलच्या नाकावर आजही राग येतो...हा राग लग्न झाल्यावर नवरोबा कसा झेलेल कोणास ठाऊक...

शामल: का नाही झेलणार...माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझा राग पण स्वीकारावा लागेल त्याला...

रेश्मा: ए आई मुलगा पहायला आल्यावर आधी शामलच्या नकट्या रागाची ओळख करून दे बरं...परत म्हणायला नको तुमच्या मुलीला राग येतो आम्हाला सांगितलं का नाही म्हणून...

शामल: ए काय गं ताई तू ही आई सारखा त्रास द्यायला लागलीस मला...मी बोलणारच नाही तुमच्याशी ( असं म्हणत...गाल फुगवूनच शामल फ्रेश व्हायला गेली)

इकडे आई मात्र रेश्मा ला सांगत होती...असं आहे बघ हीच...राग तर नाकावर बसलेला असतो...लग्न झाल्यावर कसं होईल कोणास ठाऊक...हिचे नखरे झेलणारा नवरा असला म्हणजे निभावलं...

रेश्मा: होईल ग सगळं ठिक ...तू नको काळजी करु तीची अजून लहान आहे...येईल समज हळूहळू...

शामल फ्रेश होऊन आली तोपर्यंत आई आणि रेश्माने शामलच्या आवडीचे आलू पराठे बनवले होते...नाश्ता पाहताच शामल खूश झाली...मघाशी नाकावर आलेला राग कुठल्या कुठे पळून गेला...

आज जेवणही शामल च्या आवडीचे होते...शामल आज खूप खूश होती ...एक तर आज तिच्या सगळ्या फ़र्माइश पूर्ण होत होत्या...त्यात तीची ताई आणि हर्ष दोघेही पहिल्यांदाच तिच्या बर्थडे साठी थांबले होते...आणि प्रशांत दर दहा मिनिटांनी शामलला मेसेज करून बर्थडे विश करत होता....शामल ला आज आपण खूपच स्पेशल असल्याचा फील येत होता...पण राहून राहून तिला प्रशांतची आठवण येत होती...की आज प्रशांतची खूप इच्छा असुनही ती त्याला भेटू नाही शकली...तिने मनातल्या मनातच प्रशांतला सॉरी म्हटलं...

दुपारची जेवणे आटोपली...शामल आणि रेश्माने प्लान केला मॉल मध्ये शॉपिंग ला जाण्याचा...ऊन्ह उतरली की जाऊयात असं म्हणून दोघीही गप्पा मारत बसल्या...प्रशांतचा तितक्यात मेसेज आला ...

प्रशांत:काय करता आहात राणी सरकार...

शामल: काही नाही रे गप्पा मारत बसलो आहोत...पण संध्याकाळी ताई, मी आणि हर्ष मॉल मध्ये शॉपिंग ला जाणार आहोत...

प्रशांत:अरे वा! मज्जा आहे बुवा आज एका माणसाची...कोणत्या मॉल मध्ये जाणार आहात...आणि किती वाजता?

शामल: अरे विवियाना मॉल मध्ये जाणार आहोत...संध्याकाळी 5वाजता जाऊ...

प्रशांत: अच्छा....

शामल: अच्छा काय रे...

प्रशांत: काही नाही ग असचं...चल मी तुला नंतर मेसेज करतो...

प्रशांत ने घड्याळात पाहिले तीन वाजले होते...म्हणजे अजून दोन तास तरी होते...त्याच्याकडे ...त्याने पटकन विक्कीला फोन केला...

प्रशांत: हाय विक्की क्या कर रहा हैं

विक्की: कुछ नही यार पि.सी पे बैठा हूँ...

प्रशांत: चल ना यार एक जगह पर जाना हैं

विक्की: कहा पे जाना हैं वो तो बता...

प्रशांत: थाना जाना हैं रे विवियाना मॉल

विक्की: ए यार इतने दूर मैं नहीं आयेगा...

प्रशांत: चल ना यार शामल का आज बर्थडे हैं...मुझे उसे मिलना हैं..वो वही पे आने वाली हैं...

विक्की: ऐसी बात हैं...फिर तो आना ही पडेगा....

प्रशांत: पाँच मिनिट में तयार रह मैं बाईक लेके आता हूँ...

विक्की: अरे बाईक मत निकाल बाहर बहोत धूप हैं....मैं कार निकालता हूं...

प्रशांत: ओके चल आता हूँ पाँच मिनीट में...

प्रशांत आणि विक्की शामल मॉल मध्ये पोहण्याच्या  आधीच  मॉल मध्ये हजर होतात...आणि शामलची वाट पहात असतात..पाच वाजून गेले तरी शामल आली नाही म्हणून प्रशांत तिला मेसेज करतो... अरे तुम्ही मॉल मध्ये जाणार होता ना निगाला की नाही..???

शामल प्रशांतला मेसेज करते हो निघालो आहोत पोहचू आम्ही 10मिनीटात ...

प्रशांत:  चांगली शॉपिंग कर...आणि माझ्यासाठी ही काहितरी घे...

शामल:  हो.. हो...घेईन चल नंतर बोलू आम्ही पोहचलो आहोत...बाय...

रेश्मा आणि शामल मॉल मध्ये फिरत असतात तोच रेश्माला प्रशांत कॉल करतो...

प्रशांत:हेलो वहिनी कुठे आहात तुम्ही??

रेश्मा: भावोजी मी ठाण्याला आहे...

प्रशांत: वहिनी तुम्ही पिंक कलर चा टॉप घातला आहे का??

रेश्मा: आइंग... पण हे  तुम्हाला कसं कळलं....

प्रशांत: मागे वळून पहा बरं

रेश्मा मागे वळते तो तिच्या समोरच प्रशांत आणि विक्की  उभे असतात...प्रशांत ला पाहताच हर्ष काका  काका करत प्रशांतला चिटकतो...रेश्मा प्रशांतला असं अचानक पाहून...आश्चर्यचकीत होते...

पण सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का तर शामलला बसतो...आनंद आणि आश्चर्य दोन्ही एकाच वेळी शामलच्या चेहर्यावर दिसून येतात...प्रशांत मात्र शामलला कसं सरप्राईज दिलं या विचाराने गालातल्या गालात हसत असतो...

प्रशांत शामल सोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट करु शकेल का??? ताई ला काही शंका तर येणार नाही ना?? कसा होईल शामलचा हा बर्थडे सेलिब्रेट ??? खूप स्पेशल की काही गोंधळ उडेल??? पण हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाट पहावी लागेल पुढच्या भागाची...तोपर्यंत सायोनारा....
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा ...धन्यवाद....

0

🎭 Series Post

View all