कवी कविता आणि कवित्व

कवी कविता आणि कवित्व
कविता
शीर्षक- कवी कविता आणि कवित्व

कवी कविता आणि कवित्व
शब्दांची सुंदर गुंफण आहे
कवी, कवयित्रींच्या अद्भुत विश्वात
कविता फुलतच राहणार आहे...

काचे मधून दिसते जगाला
धोंड्यांमधून दिसते कवीला
कवी कल्पनांचा खेळ सारा
तोडच नाही त्याच्या लेखणीला...

कवींचे स्वानंदासाठी केलेले काव्य
हळूहळू सर्व जगाचे होते
सुखदुःखाच्या क्षणी माणसाच्या
काव्यच मदतीला येते...

कवी म्हणजे कल्पनेचा सौदागर
स्वर्ग नरक या कवींच्याच कल्पना
कवींचा केवळ पाणिस्पर्शाने
वाचा फुटते निर्जीव वस्तूला.

सौ. रेखा देशमुख