कविता 3)
*शीर्षक : गंध मातीचा ओला*
भेगाळलेल्या भूमीला
साद घातली आभाळाने
झाली गर्दी काळ्या ढगांची
अन् उष्णतेने तापलेल्या धरणीवर
अभिषेक केला हळूच एका थेंबाने
साद घातली आभाळाने
झाली गर्दी काळ्या ढगांची
अन् उष्णतेने तापलेल्या धरणीवर
अभिषेक केला हळूच एका थेंबाने
मग आल्या रिमझिम सरी
अन् बरसल्या बेभान होऊनी
क्षणात पालटलं रूप निसर्गाने
घेतला श्वास त्या काळ्या-तांबड्या मातीने
अन् बरसल्या बेभान होऊनी
क्षणात पालटलं रूप निसर्गाने
घेतला श्वास त्या काळ्या-तांबड्या मातीने
मातकट असा मातीचा वास
सतत मनाला मोहवणारा
अलगद घेता मी मंद खोल श्वास
जडावल्या जरा नाजूक पापण्या
सतत मनाला मोहवणारा
अलगद घेता मी मंद खोल श्वास
जडावल्या जरा नाजूक पापण्या
ओठात खेळे ओळखीचे हास्य
जणू पहिल्या या पावसात
मृदगंध पसरला आसमंतात
गवसलंय आज जे होतं हरवलं,
मृगजळासम कस्तुरी जणू ओल्या मातीच्या सुगंधात
जणू पहिल्या या पावसात
मृदगंध पसरला आसमंतात
गवसलंय आज जे होतं हरवलं,
मृगजळासम कस्तुरी जणू ओल्या मातीच्या सुगंधात
उगाळीता चंदनाचा काष्ठ
जसा जागतो मनात भक्तीभाव
तसेच ओल्या मातीचा हा सुगंध
घेई निराश अंतरंगाचा ठाव
जसा जागतो मनात भक्तीभाव
तसेच ओल्या मातीचा हा सुगंध
घेई निराश अंतरंगाचा ठाव
शुष्क मातीच्या पोटात
जेव्हा लपतात पाण्याचे थेंब
तेव्हा चाहूल लागते अनामिक सुगंधाची
आठवणी जणू होतात ताज्या
अवस्था बिकट काहीशी मनाची
जेव्हा लपतात पाण्याचे थेंब
तेव्हा चाहूल लागते अनामिक सुगंधाची
आठवणी जणू होतात ताज्या
अवस्था बिकट काहीशी मनाची
तप्त या देहावरही
उडतात काही लहानसे तुषार
तृप्तता होई घुसमटलेल्या स्वप्नांची
आणि जन्मतात कितीतरी नवीन विचार
उडतात काही लहानसे तुषार
तृप्तता होई घुसमटलेल्या स्वप्नांची
आणि जन्मतात कितीतरी नवीन विचार
आठवणी घालतात पिंगा अन्
हा सुगंध घालतोय भुरळ
स्फटीकासम शुभ्र या सरिंमध्ये
दिसे प्रतिबिंब मनाचे नितळ
हा सुगंध घालतोय भुरळ
स्फटीकासम शुभ्र या सरिंमध्ये
दिसे प्रतिबिंब मनाचे नितळ
सिमेंटच्या या कोरड्या जंगलात
उरली नाही थोडीही माती
ना कुठे आढळे तो ओला सुगंध
जलधारा येतात नी वाहून जातात
सोबत नेतात सारा पसारा
उरत नसे काही मागे
कोरडा राहतो मनाचा किनारा
उरली नाही थोडीही माती
ना कुठे आढळे तो ओला सुगंध
जलधारा येतात नी वाहून जातात
सोबत नेतात सारा पसारा
उरत नसे काही मागे
कोरडा राहतो मनाचा किनारा
मन हे रुजते, खुलते
नेहमी निसर्गाच्या सानिध्यात
अस्तित्व विसरूनी रमूनी जावे
कधीतरी या ओल्या मातीच्या सुगंधात
नेहमी निसर्गाच्या सानिध्यात
अस्तित्व विसरूनी रमूनी जावे
कधीतरी या ओल्या मातीच्या सुगंधात
*सौ. उन्नती सावंत*
*( मुंबई - मालाड )*
*( मुंबई - मालाड )*
कविता 3)
*शीर्षक : गंध मातीचा ओला*
भेगाळलेल्या भूमीला
साद घातली आभाळाने
झाली गर्दी काळ्या ढगांची
अन् उष्णतेने तापलेल्या धरणीवर
अभिषेक केला हळूच एका थेंबाने
साद घातली आभाळाने
झाली गर्दी काळ्या ढगांची
अन् उष्णतेने तापलेल्या धरणीवर
अभिषेक केला हळूच एका थेंबाने
मग आल्या रिमझिम सरी
अन् बरसल्या बेभान होऊनी
क्षणात पालटलं रूप निसर्गाने
घेतला श्वास त्या काळ्या-तांबड्या मातीने
अन् बरसल्या बेभान होऊनी
क्षणात पालटलं रूप निसर्गाने
घेतला श्वास त्या काळ्या-तांबड्या मातीने
मातकट असा मातीचा वास
सतत मनाला मोहवणारा
अलगद घेता मी मंद खोल श्वास
जडावल्या जरा नाजूक पापण्या
सतत मनाला मोहवणारा
अलगद घेता मी मंद खोल श्वास
जडावल्या जरा नाजूक पापण्या
ओठात खेळे ओळखीचे हास्य
जणू पहिल्या या पावसात
मृदगंध पसरला आसमंतात
गवसलंय आज जे होतं हरवलं,
मृगजळासम कस्तुरी जणू ओल्या मातीच्या सुगंधात
जणू पहिल्या या पावसात
मृदगंध पसरला आसमंतात
गवसलंय आज जे होतं हरवलं,
मृगजळासम कस्तुरी जणू ओल्या मातीच्या सुगंधात
उगाळीता चंदनाचा काष्ठ
जसा जागतो मनात भक्तीभाव
तसेच ओल्या मातीचा हा सुगंध
घेई निराश अंतरंगाचा ठाव
जसा जागतो मनात भक्तीभाव
तसेच ओल्या मातीचा हा सुगंध
घेई निराश अंतरंगाचा ठाव
शुष्क मातीच्या पोटात
जेव्हा लपतात पाण्याचे थेंब
तेव्हा चाहूल लागते अनामिक सुगंधाची
आठवणी जणू होतात ताज्या
अवस्था बिकट काहीशी मनाची
जेव्हा लपतात पाण्याचे थेंब
तेव्हा चाहूल लागते अनामिक सुगंधाची
आठवणी जणू होतात ताज्या
अवस्था बिकट काहीशी मनाची
तप्त या देहावरही
उडतात काही लहानसे तुषार
तृप्तता होई घुसमटलेल्या स्वप्नांची
आणि जन्मतात कितीतरी नवीन विचार
उडतात काही लहानसे तुषार
तृप्तता होई घुसमटलेल्या स्वप्नांची
आणि जन्मतात कितीतरी नवीन विचार
आठवणी घालतात पिंगा अन्
हा सुगंध घालतोय भुरळ
स्फटीकासम शुभ्र या सरिंमध्ये
दिसे प्रतिबिंब मनाचे नितळ
हा सुगंध घालतोय भुरळ
स्फटीकासम शुभ्र या सरिंमध्ये
दिसे प्रतिबिंब मनाचे नितळ
सिमेंटच्या या कोरड्या जंगलात
उरली नाही थोडीही माती
ना कुठे आढळे तो ओला सुगंध
जलधारा येतात नी वाहून जातात
सोबत नेतात सारा पसारा
उरत नसे काही मागे
कोरडा राहतो मनाचा किनारा
उरली नाही थोडीही माती
ना कुठे आढळे तो ओला सुगंध
जलधारा येतात नी वाहून जातात
सोबत नेतात सारा पसारा
उरत नसे काही मागे
कोरडा राहतो मनाचा किनारा
मन हे रुजते, खुलते
नेहमी निसर्गाच्या सानिध्यात
अस्तित्व विसरूनी रमूनी जावे
कधीतरी या ओल्या मातीच्या सुगंधात
नेहमी निसर्गाच्या सानिध्यात
अस्तित्व विसरूनी रमूनी जावे
कधीतरी या ओल्या मातीच्या सुगंधात
*सौ. उन्नती सावंत*
*( मुंबई - मालाड )*
*( मुंबई - मालाड )*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा