Login

काय हे अस? .. भाग 4 अंतिम

जाऊ दे सुप्रिया नको बोलू या आपण त्या विषयावर, झालं ना सगळं आता तुझ्या मनासारखं छान जाऊ आपण तिकडे राहायला


काय हे अस? .. भाग 4 अंतिम

घरचेच अस करतात

©️®️शिल्पा सुतार
..............

दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मी घरी म्हणून राही खूप खुश होती, रिक्षावाल्या काकांना फोन करून सुप्रियाने त्यांना इकडे यायला सांगितलं, आईलाही फोन करून सांगितलं की राही आज येणार नाही तिकडे आणि मीही येणार नाही,

जरा वेळाने रिक्षा आली सुप्रिया राहिला रिक्षात बसून आली, येताना तिने मोनिकाला फोन केला आणि सगळं सांगितलं,

"ठीक आहे मग वीकेंडला दुपारून इकडे येता येईल तर सांग आपण भेटू इथल्या लोकांना आणि तुझ्यासाठी घर आहे का ते बघू",.. मोनिका

चालेल.. चार वाजता राही आली, सुप्रियाने तिच्यासाठी छान पावभाजी बनवली होती

"मम्मी मला असंच आवडतं इथे आपल्या घरी, तू उद्या जाणार नाही ना ऑफिसला ",.. राही

" नाही बेटा नाही जाणार आहे मी उद्या, अजिबात घाबरायचं नाही आणि यापुढे तुला आजीकडे पाठवणार नाही, तू पाळणा घरात राहशील का शाळा सुटल्यावर थोडा वेळ चार ते सात",.. सुप्रिया

" म्हणजे काय मम्मी? ",.. राही

"स्कूल सारखच आहे, तुला स्कूल नंतर तिथे थांबायचं, जरा वेळ खेळायचं होमवर्क करायचा तोपर्यंत मी येईल ",..सुप्रिया

"हो चालेल मम्मी, पण मी आजी कडे जाणार नाही ",.. राही

"सध्या तरी आठ-दहा दिवस मी आहे घरी आपण हे घर चेंज करू आणि मगच तुला पाळणाघरात जावं लागेल मी थोडं माझं ऑफिसचं काम करते तू खेळ ",.. सुप्रिया

राही पहिल्यापासून हुशार होती तिने तिचा होमवर्क केला सुप्रियाला येऊन दाखवला

संध्याकाळी सुप्रियाचं काम झाल्यानंतर ती राहिला घेऊन खाली खेळायला गेली

सचिन आला सुप्रिया आणि राही खूप मजेत होत्या, आज दोघींच्या मूडमधे खरंच फरक पडला होता, सचिनलाही बरं वाटत होतं, जाऊदे चाललं जाऊ दुसरीकडे राहायला,.. सुप्रिया इकडे ये हे बघ, त्याने बऱ्याच घरांची माहिती आणली होती, तुझी मैत्रीण राहते ना त्याच एरियात खूप घर विकायला आहेत, आपल्या दोघांनाही चांगला पगार आहे तर इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही,..

चालेल विकेंडला सुप्रिया सचिन यांनी बरेच घर बघितले, त्यातले दोन-तीन बजेटमध्ये होते आणि खूप सुंदरही होते एक घर त्यांनी पसंत केलं, रेडी टू मूव इन होतं

आम्ही येतोय इकडे पंधरा दिवसात राहायला तोपर्यंत घराचं काम जेवढ बाकी होतं तेवढं त्यांनी बिल्डरला पटापट करायला सांगितलं, थोडे पैसे कॅश मध्ये दिले, बाकीचं लोन केलं,

ते सुप्रियाच्या आईकडे आले

"आम्ही घर घेतल आहे आई बाबा आणि तिकडे राहायला जातो आहोत",.. सुप्रिया

"बरे झालं चांगलं केलं, आम्हाला काही समजू दिल नाही तुम्ही, तुम्ही निदान दादाला तरी विचारायच होत" ,.. आई

"आई काही तरी काय? एवढं काय नको बोलू तू सुप्रियाला, सुप्रिया सचिन तुमच खूप अभिनंदन ",.. दादा अजून चौकशी करत होता,

" ठीक आहे, चांगल झाल, नाही तरी माझ्याकडुन ही आता काही काम होत नाही, आता तुम्ही आणि तुमची राही काहीही करा, तिला कसं सांभाळायचं ते तुमच तुमच बघून घ्या ",.. आई

" हो आम्ही तेच करणार आहोत आई, आणि काय गआम्ही एवढी चांगली बातमी घेऊन आलो तरी तू काय ग तेच तेच बोलते, तुला आनंद नाही झाला का ",.. सुप्रिया

सचिन बघत होता सुप्रियाकडे,.." नको बोलू काही आता सुप्रिया इकडे ये",

सुप्रिया गप्प बसली, ती बाहेर सचिन जवळ येऊन बसली

" म्हणून मी तुला म्हणत होती इकडे नको यायला, आपण कुठली चांगली गोष्ट केली की यांना आनंद होत नाही, नुसता मूड घालून टाकतात ",.. सुप्रिया

राही रक्षित सोबत खेळत होती,... लांब थांब त्याच्यापासून राही तो लहान आहे, आई ओरडली

राही दचकली ती सुप्रिया जवळ येऊन बसली,

तिघं घरी आले,.." बघितलं ना सचिन आई कशी करते ते, मला बोलायची एक ही संधी ती सोडत नाही",

" जाऊ दे सुप्रिया नको बोलू या आपण त्या विषयावर, झालं ना सगळं आता तुझ्या मनासारखं छान जाऊ आपण तिकडे राहायला",.. सचिन

आता महिना झाला ते नवीन घरी राहायला आले आहेत, राही खुश आहे, सुप्रिया सोबत ती एकदम रिलॅक्स होती, शाळा सुटल्यावर ती पाळण्या घरात जात होती तिकडे ती ऍडजेस्ट झाली होती, सुप्रिया ही व्यवस्थित ऑफिस कामात बिझी झाली, त्या दोघी खुश म्हणून सचिनही खुश होता, छान शांत वाटत होत आता घरात

काही काही लोक उगीच आयुष्यात निगेटिव्हीटी पसरवतात, खूप त्रास होतो आपल्याला त्यांचा, अश्या लोकांपासून शक्य झाल तर वेळेवर बाजूला गेलेल बर असत, शेवटी मानसिक स्वास्थ्य जपण ही खूप महत्वाच आहे.

🎭 Series Post

View all