Login

"काय माझा गुन्हा...?" भाग २

सामाजिक विषयावर प्रकाश टाकणारी कथा.
दिर्घ कथा लेखन स्पर्धा.
डिसेंबर व जानेवारी
२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग २


"सांग सांग माधवा हिला तुझ्याच तोंडूनच तिला ऐकू दे आपले प्रताप... स्वतःच्या अब्रूची हिला काय पडली आहे म्हणा मेलीला..., कुळच तिचं तसल घाणेरडं आहे... पण आमच्या घराची आणि आमची इभ्रत मात्र चव्हाट्यावर आणली, आमच्या खानदानाला, आमच्या घराण्याला कलंकित केलं या सटवीनं."
असं म्हणून सासुबाई डोळ्यांना पदर लावू लागली, तर गौरवी अजूनच गोंधळून सासुबाई कडे बघु लागली.

" तु आधी मला सांग हा कोण आहे? माधव त्या इसमाची कॉलर पकडून रागारागाने गौरवीला विचारतो.

" कोण आहे हा? मी नाही ओळखत त्याला." गौरवी खरोखरच गोंधळून जाते...

"तू नाही ओळखत याला?  मग हा आपल्या बेडरूमध्ये काय करत होता?" माधव दात ओठ खात विचारतो.

"आपल्या बेडरूमध्ये? हा आपल्या बेडरूम मध्ये काय करत होता? आणि हा मुळात आहे तरी कोण?" गौरवी आपल्या नवऱ्याला म्हणजे माधवलाच प्रतिप्रश्न करत विचारते.

"दादा तुझी बायको बघ कसली भारी एक्टींग करते." संस्कृती नंदन बाई तोंडून आग ओकण्याचे कार्य करते.

"तुला खरंच काहीच माहीत नाही?" माधव आता रागाने तिलाच तीच्या प्रश्नावर प्रतिप्रश्न करतो.

"अरे खरंच सागते आहे मी, मला नाही माहित हा कोण आहे तो आणि हा आपल्या बेडरूममध्ये काय करत होता. हे सुद्धा मला माहित नाही. इन फॅक्ट मी तर बाथरूम मध्ये आंघोळ करत होते."

" हो का? मग हा कसा काय भिजलेला आहे? सांग? आणि तुझ्या आंघोळीच्या वेळीच कसा काय तो तुमच्या बेडरूम पर्यंत पोहचला होता?" सासुबाई जोर देऊन विचारते.

"सांग ना, याचे कपडे कसे काय भिजलेले आहेत? आणि याच्या शर्टाची बटणं का उघडी आहेत? आणि हा आपल्या बेडरूममध्ये नक्की काय करत होता?" माधव आता रागाने अजूनच डोळे मोठे आणि लाल करत तिला जाब विचारतो.

"अहो, मला काय माहित हा माणूस कोण आहे. आणि हा का भिजलेला आहे ते व तो आपल्याच बेडरूममध्ये नेमका काय करत होता? आणि हे सर्व तुम्ही सगळे मला का विचारताय? गौरवी वैतागून आणि गोंधळून विचारते.

" कारण ह्याला मी आपल्या बेडरूम मधून कपडे भिजलेल्या अवस्थेत बाहेर पडताना पकडलेले आहे." माधव अजूनच रागाने लाल होत दात ओठ खात सांगतो.

" पण हा आपल्या बेडरूम मध्ये काय करत होता? गौरवीच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकली.

" हाच प्रश्न मी तुला विचारतोय ना. की हा आपल्या बेडरूम मध्ये काय करत होता आणि हा भिजलेला कसा? माधव  भडकून मोठ्याने आवाज चढवत विचारतो.

"अहो, मला खरंच नाही माहित हा कोण आहे? आणि हा आपल्या बेडरूम मध्ये काय करत होता?" गौरवी आता खरोखरच वैतागून आणि रडका चेहरा करुन समजावण्याचा प्रयत्न करते.


क्रमशः

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all