गेल्या भागात आपण पाहिले की , केतकी आणि यश दोघे फिरायला जातात. केतकी यशसमोर मन हलकं करते. दुसऱ्या दिवशी सकाळी यश, तिच्या कानाखाली मारतो. पाचही बोटं गालावर उमटतात. आता पाहू पुढे.
यशने पहिल्यांदाचं तिच्यावर हात उगारला होता. यश तावातावाने बोलू लागला,
" हे काय केलंस केतकी ? माझ्या शर्टला हा कसला रंग लागला आहे ? तुला काळजीपूर्वक कामं करताचं येत नाही का? का तू अशी मूर्खासारखी वागतेस?
" हे काय केलंस केतकी ? माझ्या शर्टला हा कसला रंग लागला आहे ? तुला काळजीपूर्वक कामं करताचं येत नाही का? का तू अशी मूर्खासारखी वागतेस?
" यश, कानाखाली मारावं इतका मोठा मी गुन्हा केला का ?" केतकी दुःखी स्वरात म्हणाली.
केतकीला एकही शब्द बोलू वाटतं नव्हता. काल अगदी डोक्यावर हात ठेवून प्रेम दाखवत होता आणि आज चक्क हात उगारला. केतकीच्या डोळ्यांवर जी खोट्या प्रेमाची पट्टी होती ती आज खऱ्या अर्थाने उतरली होती.
ती फार आशेने सासूकडे पहात होती. आज तरी ती यशला बोलेलं पण नाही ती काहीच न झाल्याचा अविर्भाव आणून बसली होती.
तिला अगदी उचलून फेकल्यासारखे झाले होते. यशवर खूपच राग आला होता. आजही तो तसाच रागाने ऑफिसला निघून गेला.
यश बाहेर गेला तशी ती देखील बाहेर पडली. तिला पाठून सासूने "कुठे जाते आहेस विचारले?" तिला त्या प्रश्नाला उत्तर देण्याची अजिबात गरज वाटली नाही. ती कोणत्या अधिकाराने विचारत होती ?
ती भरभर पाऊले पुढे टाकत निघाली. तिला माहीतच नव्हतं तिची पाऊलं कुठे जात आहेत. बस जमेल तितक्या वेगाने ती चालतच होती.
यशची पाचही बोटं गालावर उमटली नव्हती; तर ती मनावर उमटली होती. त्या मनावर ज्या मनाने यशवर मनापासून प्रेम केलं होतं.
आजची केतकी वेगळी झाली होती. तिचा स्वाभिमान खऱ्या अर्थाने दुखावला होता. स्वाभिमान दुखावणारा दुसरा तिसरा कोणी नसून तोच यश होता ज्याच्यासाठी ती जन्मदात्यांना कायमची सोडून आली होती. त्याच्यावर खूप विश्वास ठेवला होता. स्वतःपेक्षाही जास्त. सर्वस्वी त्याचीच झाली होती. एकरूप झाली होती. स्वतःचं वेगळं अस्तित्व होतं हे देखील विसरून गेली होती.
ती इंजिनीअर झाली होती. चांगल्या पॅकेजची नोकरी होती. यशच्या गोड बोलण्याला भुलली आणि ती नोकरी सोडून घरात बसली ? का तर आईची सेवा करायला. स्वतःच्या अविचारी कृतीचा तिला प्रचंड राग आला होता.
तिच्या प्रेमात काय कमी पडलं होतं देवच जाणे?
प्रेमाचा वर्षाव करणारा यश असा का वागू लागला होता. मी त्याला अजूनही मूल देऊ शकले नाही म्हणून?
तिच्या डोक्यात प्रश्नांची शृंखला सुरू झाली.
असंही सासू कितीतरी वेळा बोलून मोकळी झाली होती "आजीचं सुख कधी देताय?"
असंही सासू कितीतरी वेळा बोलून मोकळी झाली होती "आजीचं सुख कधी देताय?"
त्यावर यश नेहमी निरुत्तर होत होता. माझाच दोष का?
तिच्या मनातला दुसरा आवाज आता कठोर होऊन तिच्याशी संवाद साधू लागला.
' केतकी,तुला मारण्याचा अधिकार त्याला नाही. त्याला काय कोणालाही नाही. काय गरज आहे तुला हे असं व्याकुळ होऊन जीवन जगायची ?
खरं प्रेम केल्याची सजा भोगते आहेस ? का म्हणून तू इतकी दुबळी झालीस यशच्या प्रेमाखातरं ? मला यशच्या मनात प्रेम दिसत नाही. त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात जमीन आसमानचा फरक आहे. खूप फरक आहे. नको अशी लाचार, दुबळी बनून राहूस. तुलाही आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. सोड त्याला. निघून जा कुठेतरी दूर. खूप दूर.'
खरं प्रेम केल्याची सजा भोगते आहेस ? का म्हणून तू इतकी दुबळी झालीस यशच्या प्रेमाखातरं ? मला यशच्या मनात प्रेम दिसत नाही. त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात जमीन आसमानचा फरक आहे. खूप फरक आहे. नको अशी लाचार, दुबळी बनून राहूस. तुलाही आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. सोड त्याला. निघून जा कुठेतरी दूर. खूप दूर.'
पुन्हा तिचं एक भावनिक मन तिची समजूत काढू लागलं.
' तू माझं ऐक, यश तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याला सोडून जाऊ नकोस. नवरा बायको मध्ये भांडण होतात. हे नॉर्मल आहे."
" हे नॉर्मल नाही. एखाद्या पशूला वागणूक द्यावी अगदी तसाच वागायला लागला आहे तो. त्याचे वागणे दुर्लक्ष करू नकोस." कठोर मन ठणकावून सांगत होते.
केतकीचं डोकं भणभणायला लागले होते. तिथेच जवळच्या गार्डनमध्ये ती बसली.
समोरच तिला एक कॉलेजमधील एक मुलगा आणि मुलगी दिसली. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता. त्या मुलीमध्ये ती स्वतःचा भूतकाळ पाहत होती. त्या मुलीच्या डोळयांत खुप सारी स्वप्न होती. केतकी स्वतःला तिच्यात शोधू लागली. यश देखील असाच तासनतास तिच्यात हरवून जायचा. ते गुलाबी दिवस आठवून ती सुखावली पण लगेच तिचा हात गालावर गेला. यशने दिलेली कानाखाली आठवली. हे असं बेज्जत होण्यासाठी लग्न तर नक्कीच केलं नव्हतं. आज त्याने हद्द पार केली होती.
लगाम सुटल्यागत त्याचे वागणं झालं होतं, वरून त्याची आई त्याला सहकार्य करत होती.
ती एकटी पडली होती. तिला स्वतःचीच दया येऊ लागली. काय होती आणि काय झाली?
ती एकटी पडली होती. तिला स्वतःचीच दया येऊ लागली. काय होती आणि काय झाली?
थोडावेळ तशीच डोळे मिटून पडून राहिली.
डोळ्यांतून फक्त अश्रुधारा येत होत्या.
तोच तिच्या पायाला कोणतरी घट्ट पकडल्याचे जाणवले. तिचे डोळे चमकले.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा