Login

खडकांचा रंग

खडकांचा रंग

खडकांचा रंग त्यात असलेल्या खनिज द्रव्याने येतो. दगड हे खडकाचे लहान नमुने असतात. काही दगडांमध्ये खनिजे उघड्या डोळ्यांनी दिसतात तर बाकीच्यात ती केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे दिसतात. अशा खनिजांचा आकार व रंग वेगवेगळ्या दिसतो.

अग्निजन्य खडकातील अनेक प्रकारची खनिजद्रव्ये(मिनरल्स) तप्त लाव्हारस थंड होताना तयार होतात. लाव्हारस जसा पृथ्वीच्या पृष्ठभागावर थंड होतो तसाच तो तिच्या पृष्ठभागाखाली ही थंड होतो. उच्च तापमान व दाबाखाली तयार होणाऱ्या खनिजांचा आकार व रंग वेगळा असतो. खनिजांचा रंग व आकार बदलण्यास वातावरण कारणीभूत ठरते. म्हणून खनिज द्रव्ये खडकांचा रंग ठरवतात. दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला हा लाल वाळूच्या दगडाने बांधलेला आहे म्हणून त्याला लाल किल्ला म्हणतात. सफरचंद मधून कापले तर त्याचा रंग लाल पडतो कारण त्यातील लोह हवेतील प्राणवायूशी संयोग पावतो.

सौ. रेखा देशमुख

0