Login

खरं प्रेम

प्रेम कवितांचा खजिना
खरं प्रेम हे खरच असत..
सगळ्यांच मात्र सेम नसत..
ते एकदाच होत, हे खोटं असतं..
प्रेमाचे रूप मात्र सारखेच नसत..

प्रेमा साठी कोणी
स्वतःचा देतो जीव..
कुणी प्रेमा साठी
दुसऱ्याचाच घेतो जीव..

प्रेमाची निशाणी कुणी
ताजमहल बांधत...
म्हणूनच सांगते,
प्रेम सगळ्यांच सारखं नसतं...

खरं प्रेम करणाऱ्याच
प्रेम खरेच असते..
खरे प्रेम करणाऱ्यांची
नियती परीक्षा घेते...

प्रेमात असावी त्याग
करण्याची वृत्ती...
नसावी कुणाला
दुखावण्याची मनोवृत्ती...

प्रेमात असते सगळं
सहन करण्याची शक्ती...
शुद्ध मनाने होते
खरया प्रेमाची भक्ती..

प्रेमामुळेच हे सगळे
जग झालं निर्माण...
पवित्र प्रेमाचा कुणी
करू नये अपमान.

प्रेम आंधळ हे जरूर असतं...
कारण ते हृदयातच वसतं..
म्हणून प्रेम पहायचं कस असतं..
मनानेच समजायचं असतं...

डोळ्यांची भाषा
डोळ्यांनाच कळते..
तशी हृदयाची भाषा
हृदयालाच कळते...

म्हणुन प्रेम तुटले
की हृदय तुटतं...
होत नाही आवाज,
कारण प्रेम निशब्द असतं...

म्हणून प्रेम करा पण
विचारपूर्वक करा....
प्रेमात तडजोडी मात्र
मुळीच करू नका...

कुणाच्या मनाविरुद्ध
जाऊन हृदय दुखवू नका...
कुणाचं प्रेम कधीही
बळजबरी मागू नका..

खर प्रेम हे खरच असत..
ते तुमच्याजवळ न सांगता येत..
बळजबरी प्रेम होत नसतं...
ते फक्त मतलब असत...
       
         स्वाती  पाटील..
      


🎭 Series Post

View all