Login

खरा आधार

श्रुतीला मदत करायला गरिमा का नाही म्हणते.. या कथेत वाचू.
“आई, स्पष्ट ऐकून घे… माझ्याकडून आता वहिनीची सेवा होणार नाही. मी काही कामवाली नाही की दिवसभर तिच्या इशाऱ्यावर नाचत राहीन. मलाही माझं आयुष्य जगायचं आहे.”
गरिमा नाश्त्याच्या टेबलावर चहाचा कप जोरात ठेवत म्हणाली .


तिच्या आवाजात इतकी तीव्रता आणि कठोरता होती की जेवणाच्या टेबलावर क्षणात शांतता पसरली.


आई शालिनीताईंच्या हातातून डोश्याचा तुकडा खाली पडला. समोर बसलेल्या मोठ्या भावाचा — संकेतचा — चेहरा रागाने लाल झाला. आणि शेजारच्या खोलीत, जिथे वहिनी श्रुती बेडवर पडली होती , तिथे दाट, जड शांतता दाटून राहिली.


“गरिमा!” संकेत खुर्चीतून उभा राहिला.
“तुला लाज वाटत नाही का? श्रुती अशा अवस्थेत आहे आणि तू… तू असे बोलतेस? ती तुझी वहिनी आहे, ओझं नाही!”


“माझ्यासाठी मात्र ओझंच झाली आहे, दादा,” गरिमाने डोळ्यात डोळे घालून थेट उत्तर दिलं.
“गेल्या तीन महिन्यांपासून पाहत आहे. ‘गरिमा पाणी आण’, ‘गरिमा औषध दे’, ‘गरिमा उशी नीट कर’. मी थकले आहे. माझंही करिअर आहे, माझीही शिक्षणाची स्वप्नं आहेत. ही सेवा मी आता नाही करू शकत.”


शालिनीताई रडत म्हणाल्या—
“अगं बाळा, असं कसं बोलतेस? डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, श्रुतीला अजून आधाराची गरज आहे. त्या अपघाताने बिचारीचा पाय मोडला आहे. आपली माणसं आपल्यासाठी उभी राहिली नाही, तर कोण राहणार?”

“मग तूच उभी राहा,” गरिमाने बॅग उचलली.

“तु आणि दादा तर आधीच तिच्या पुढे पुढे करताय. मला माफ करा. आजपासून मी वहिनींच्या खोलीत पाऊलही टाकणार नाही.”
हे बोलून गरिमा घराबाहेर पडली.


संकेत रागाने मुठ आवळून तसाच उभा राहिला.
“आई, बघतेस ना हिला?” तो दात खात म्हणाला.
“कशी झाली आहे ही. श्रुतीने हिला सख्ख्या बहिणीसारखं मानलं… आणि आज जेव्हा तिला गरज आहे, तेव्हा ही हात झटकते.”


आत खोलीत श्रुतीने सगळं ऐकलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत उशी ओलसर झाली. तीन महिन्यांपूर्वीपर्यंत ती या घराचा प्राण होती. प्रसिद्ध कथक नृत्यांगना — जिच्या घुंगरांच्या नादाने घर भरून जायचं. पण त्या कार अपघाताने सगळं बदलून टाकलं होतं. तिच्या पायाला गंभीर इजा झाली होती.


डॉक्टरांनी सांगितलं होतं — योग्य उपचार आणि फिजिओथेरपीने ती चालू शकेल, पण वेळ लागेल.


मात्र अपघाताच्या धक्क्याने श्रुतीचं मनच मोडून पडलं होतं. तिला वाटू लागलं होतं की आपण कधीच उभं राहू शकणार नाही. तिने प्रयत्न करायचं सोडून दिले होते. बेडवर पडून राहणं, छताकडे पाहत राहणं आणि सगळ्यांवर अवलंबून राहणं — हेच तिचं जग बनलं होतं.


संकेत आणि शालिनीताई तिची इतकी काळजी घेत होते की तिला स्वतःच्या अपंगत्वालाच आपलं नशीब मानायला लागलं होतं.


सायंकाळी गरिमा घरी परतली तेव्हा घरात ताणलेलं वातावरण होतं. संकेत श्रुतीला स्वतःच्या हाताने सूप पाजत होता. गरिमाने एक नजर टाकली आणि तोंड फिरवून थेट आपल्या खोलीत गेली.


पुढचे काही दिवस असेच गेले. गरिमाने खरंच श्रुतीकडे पाहणंही बंद केलं. श्रुतीने पाणी मागितलं तर गरिमा ऐकून न ऐकल्यासारखी करत होती. रिमोट खाली पडला तर उचलण्याऐवजी त्यावरून चालत निघून जात होती.


शालिनीताई आणि संकेतला गरिमाचं हे वागणं निर्दयी वाटत होतं. ते तिला ओरडत होते — पण गरिमावर काहीच परिणाम होत नव्हता. ती कठोरच राहिली.


एक दिवस संकेत आणि शालिनीताईंना नात्यातल्या लग्नासाठी बाहेरगावी जावं लागलं. संकेत जायला तयार नव्हता, पण श्रुतीनेच आग्रह केला.
“जा हो, आत्याबाईंना वाईट वाटेल. मी ठीक आहे. बाई आहेच ना,” श्रुती म्हणाली.
जाताना संकेतने गरिमाला बजावलं,
“आम्ही संध्याकाळपर्यंत येऊ. बाई आहे, पण श्रुतीला गरज पडली तर किमान माणुसकी दाखव.”


गरिमाने काही उत्तर दिलं नाही. ती सोफ्यावर बसून मासिक चाळत राहिली.
0

🎭 Series Post

View all