खरा दागिना
भाग - 2
घर गहाण टाकले मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा करावा म्हणून. पण गिधाडाच्या नजरा भक्षावरच असतात. विवेकच्या मित्रांना हे माहित होते. त्यांनी विवेकला विश्वासात घेऊन भडकवले. आणि विवेकनेही आपली विवेक बुद्धी जणू त्यांच्याकडे गहाण टाकली होती. तोही विणाच्या गळी पडला. बळजबरीने तिच्याकडून सगळी रक्कम घेतली आणि त्याने मित्रांच्या सांगण्यावरून सगळे पैसे सावकाराकडे दिले.
'विनाशकाले विपरीत बुद्धी' असे म्हणतात.
तीन टक्के व्याज यायचे ते सगळे पैसे विवेक मित्रांसह उडवून टाकू लागला.विवेकला मित्रांच्या सानिध्यात एक एक व्यसन जडत गेले. संगती संग दोषा: मित्रांच्या संगतीत विवेक पार बदलूनच गेला. मित्रांच्या मायाजाळात फसत गेला.Man he knows company he keeps.असे म्हणतात. आता त्याची सर्वत्र ओळख जुआरी अशीच बनली.
बँकेतून कर्ज म्हणून घेतलेली सगळी रक्कम त्याने अशीच उडवली.

आता वीणाची एकटीची लढाई सुरू झाली. घर गहाण.दर महिन्याला बँकेचे हप्ते भरायलाही पैसे नाहीत. मुद्दलावर व्याज चढत गेले. मुलांचे वाढते खर्च.वीणा रात्रंदिवस मेहनत करायची तरी कमीच पडायचे. शेवटी मुलंही पार्ट टाइम जॉब करू लागली. पण त्यांना अभ्यासाला वेळ मिळेना. ती थकून जायची. शेवटी वीणाने चार घरचे स्वयंपाकाचे काम घेतले. मुलांना तिने कामे सोडायला लावली.
वीणाचे आईवडील होते तोवर थोडीफार मदत तेही करायचे. आता भावांनी तर संबंधच ठेवले नाहीत मदत तर दूरच.
पण विणा कणखर होती.तिने कधी कुणापुढे पदर पसरला नाही. मेहनत करून मुलांना शिकवत होती,घडवत होती, संस्कार देत होती.
मुलांनीही तिच्या कष्टाचे,मेहनतीचे चीज केले. वैभव,वैजेश दोघेही मुळातच हुशार होते.जोडीला त्यांनी मेहनतीची जोड दिली आणि आईने बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघेही कसून अभ्यासाला भिडले.
पहिल्याच प्रयत्नात वैभव सीए झाला तर वैजेश यूपीएससी ची परीक्षा पास झाला.
त्यावेळी विणाला आभाळ ठेंगणे झाले. तिची मेहनत फळाला आली होती.कष्टाचे चीज झाले होते.

विवेक दिवभर घरात दारु ढोसून पडला रहायचा.
त्याचा काडीचाही हातभार नव्हता उलट वीणाच त्याला खाऊपिऊ घालायची. दुखणेखुपणे बघायची.
तिने कधी त्याला दोष दिलाच नाही.
आपलेच कर्म म्हणून ती सोसत राहिली आणि स्वतः सत्कर्म करत राहिली. त्याचेच हे फळ होते.

दोघेही मुले चांगल्या नोकरीला लागली तेव्हा विणाणे सर्वप्रथम बँकेचे थकलेले कर्ज फेडले.
मधला काळ तिच्यासाठी भयंकर खडतर यातनांचा होता.बँकेने कर्ज थकले म्हणून घरावर जप्ती आणली होती. शेवटी वीणाने तिच्याकडे असलेला एकमेव
सोन्याचा दागिना म्हणजे स्वतःचे मंगळसूत्र विकून जी रक्कम आली ती बँकेत भरली आणि जप्ती पुढे ढकलली होती.
मुले कमावती झाली तशी मुलांनी आईला कामे करू दिली नाहीत.

आता विवेकची पण तब्येत ढासळली होती.हातात पैसाच नव्हता तर व्यसन कोठून करणार?
मनाला पश्चाताप होता आणि टोचणीही होती. तो वारंवार माफी मागत होता वीणाची आणि मुलांचीही.
वीणा आणि मुलांनीही मागचे सगळे विसरून त्याला माफ करत पुन्हा नवीन जीवन सुरु करण्याची संधी दिली.
घर आनंदात न्हाऊन निघाले होते.
क्रमश:
पुढील भागात
भाग -3 मधे वाचा
मुलांना भुतकाळाची जाणीव आणि कृतज्ञ परतफेड
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा