खरा दागिना
भाग -3 अंतिम
भाग -3 अंतिम
मुले मार्गी लागून त्यांचे संसार सुरू झालेले. आता त्या गोष्टीलाही एक तप उलटून गेलेले.
दोघे दोन ठिकाणी. वीणा, विवेक दोन्हीकडे राहायचे. नातवांच्या सानिध्यात दिवस कसा संपायचा कळायचेच नाही. मुलांनी आई-वडिलांची राहिलेली हौस पूर्ण केली .त्यांना तीर्थयात्रेला, फिरायला घेऊन गेले.वेळेवर औषध पाणी, खाणे पिणे कशाचीच कमी नव्हती.
हे मोरपंखी दिवस कधी संपूच नये असे वीणाला वाटे.
पण कधी ती एकटी बसली की एकांतात तिला आपला भूतकाळ आठवे. हे दिवस कधी संपतील? आपल्या जीवनात सुखाचा काळ येईल की नाही ही शाश्वती नसताना फक्त आशेवर ती जगत गेली कष्ट करत गेली आणि मुलांना संस्कारीत करत गेली.
कितीतरी वेळा तिच्या मनात नको ते विचार आले.कधी जीवनही संपवावस वाटलं.पण मुलांकडे पाहून परत तिने ते विचार झटकले.
मुलांनी मात्र भूतकाळाची जाणीव ठेवत आपल्या आईच्या कष्टाचं मोल करत आज तिच्यासाठी सुखाच्या मखमली पायघड्या अंथरल्या.
तिच्या सुखाखातर तिला वाईट वाटू नये म्हणून ज्या बापाने मुलांना कोणते सुखच दिलं नव्हतं उलट त्यांच्यासमोर ते त्यांच्या आईलाही दुःखच देत आले अशा बापालाही मुलांनी दुःख दिले नाही.
पण आईविषयी मुलांना खूप अभिमान होता.
वैभवने आता त्याची स्वतःची इन्स्टिट्यूट उघडली होती त्या इन्स्टिट्यूटला त्याने वीणाचे नाव दिले.
वैभवने त्याच्या लग्नात आईसाठी तीन तोळ्याचे मंगळसूत्र बनविले होते.
त्याचे म्हणणे होते आमच्यासाठी तू तुझा अनमोल दागिना मोडलास मी बायकोला दागिने करण्याआधी पहिले तुझ्यासाठी मंगळसूत्र बनवणार.
पण वीणाने सोन्याचा त्यागच करुन टाकलेला. ज्या वयात हौस मौज करायची त्या वयात अंगावरचा दागीनाही विकावा लागला. आता काय अंगावर दागिने मिरवायचे?
शेवटी वैभवने बायकोसाठी पण दागिने घेतले नाही.
तेव्हा वीणाने ते बघून तिच्या साठी बनवलेले मंगळसूत्र घेतले. वैभवला खूप
आनंद झाला. चला आई मानली. आता आपण दिलेले मंगळसूत्र ती गळ्यात घालेल.पण तिने ते सुनेच्या गळ्यात घातलेले बघून दोघेही भाऊ गदगद झाले.

आईच्या उपकाराची फेड तर अशक्यच. पण थोडं उतराई तरी होऊ या. याभावनेतून त्यांनी ही योजना आखली की आता नाही म्हणणार नाही.
वीणाप्रती असलेला कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठीच त्यांनी या जंगी सोहळ्याचे आयोजन केलेले.

सोहळ्यास येणारा प्रत्येक व्यक्ती आपली भावना व्यक्त करत होता. धन्य ते मायबाप ज्यांचेपोटी अशी संतान जन्माला आली आणि धन्य ती मुले ज्यांना असे मायबाप लाभले.
जीवनातली कृतकृत्यता याहून काय वेगळी असते?
समाप्त
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा