जलद कथा स्पर्धा फेब्रुवारी 2026
" अफगाणिस्तानला कम्युनिस्ट विचारसरणीपासून वाचवण्यासाठी अमेरिकेने हे केलं. " जोसेफ म्हणाला.
" कम्युनिस्ट विचारसरणीपासून वाचवण्यासाठी तुम्ही जिहादचे भूत बाहेर काढले ? तुम्हाला ठाऊक नाही का एकदा जिहादचे भूत दिव्यातून बाहेर पडले की ते परत सहजासहजी आत जात नाही. तुम्हा मोठ्या राष्ट्रांसाठी हे विचारसरणीचे युद्ध जरी असले तरी आम्हा गरीब लोकांना त्याच्या झळा सोसाव्या लागतात. आणि प्रामाणिकपणे सांगा. हे नक्की विचारसरणीचेच युद्ध होते का ? की अमेरिकेला रशिया अफगाणिस्तान , इराण, इराक इथे आपला प्रभाव वाढवेल आणि मिडल ईस्ट आपल्या ताब्यातून जाईल याची भीती वाटत होती ? मीडल ईस्ट म्हणजे तेलासाठा. म्हणून त्याने अफगाणिस्तानवर युद्ध लादले. पाकिस्तानला अर्थसाह्य करून मुजाहूदीन तयार केले. तालिबान अप्रत्यक्षपणे अमेरिकेचेच संतान आहे. " सोहेल म्हणाला.
" स्वतःच्या वयाच्या हिशोबाने जरा जास्तच बोलतोय अस वाटत नाहीये का तुला ? एक थोबाडीत मारेल अमेरिकेविरोधात काही बोललास तर. कोण शिकवते तुला या गोष्टी ?" जोसेफ म्हणाला.
" आजी. घरात शिकलेली आता ती फक्त एकटीच आहे."
सोहेल म्हणाला.
सोहेल म्हणाला.
" परत देऊ का त्या माणसाकडे ? एक तर तुला वाचवले आणि तू आभार मानायचे सोडून मलाच सुनावतो."
जोसेफ म्हणाला.
जोसेफ म्हणाला.
" धन्यवाद तुम्ही मला वाचवले त्या नराधमापासून. परंतु उस्मान तुम्हाला आता सोडणार नाही. त्याची फार ताकद आहे आमच्या प्रांतात. जमल्यास माझ्या एका मित्राला पण सोडवाल ?" सोहेल म्हणाला.
" कोण ?" जोसेफ म्हणाला.
" झैद. तो पण बच्चाबाजी प्रथेत अडकला आहे. त्याला पळवून नेले एका मुजाहूदीन कमांडरने. लिपस्टिक लावून , मुलींचे कपडे घालून त्याला मैफिलीत नाचवतात." सोहेल म्हणाला.
" खूप धक्कादायक आहे हे. पण मी असे ऐकले आहे की अफगाणिस्तानात मुलींची छेड जरी काढली तरी पिढ्यानपिढ्या शत्रुत्व पाळले जाते." जोसेफ म्हणाला.
" मुलींच्या इज्जतीला महत्त्व आहे. मुलांच्या नाही. भविष्यात कोणती मुलगी आमच्यासारख्या मुलांशी लग्न करेल? आम्ही तर कित्येक पुरुषांच्या अंगाखाली जातो. मुलगी आत्महत्या करेल पण आमच्यासारख्यासोबत संसार थाटणार नाही. बलात्कार झालेल्या , इज्जत लुटली गेलेल्या मुलासोबत कोण निकाह करेल ?" सोहेल म्हणाला.
" माणसाची खरी इज्जत त्याचे चारित्र्य असते. बलात्कार करून कुणाची इज्जत जात नसते. " जोसेफ म्हणाला.
तेवढ्यात तिथे उस्मान आणि जोसेफचा सिनिअर अधिकारी जॉन आला. जोसेफने लगेच जॉनला सल्यूट केला. उस्मानला पाहून सोहेलला घाम फुटला. उस्मान मात्र सोहेलला पाहून क्रूरपणे हसला. जॉन उस्मानकडे वळला.
" हाच आहे का तुमचा टी बॉय ?" जॉन म्हणाला.
" जी. " उस्मान म्हणाला.
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा