जलद कथा स्पर्धा फेब्रुवारी 2026
" तुम्ही वाट बघा. मी थोड्या वेळात तुम्हाला तुमचा टी बॉय सुपूर्द करतो. " जॉन म्हणाला.
उस्मानने होकारार्थी मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. मग जॉन जोसेफकडे वळला.
" काय गरज होती या मुलाला इकडे आणण्याची ? आपली जुनी ओळख नसती तर शिस्तभंगाची कारवाई झाली असती तुझ्यावर. " जॉन म्हणाला.
" सर तो माणूस या किशोरवयीन बालकावर बलात्कार करत होता. " जोसेफ म्हणाला.
" तो त्यांचा पर्सनल मॅटर आहे. उस्मान आपल्या बाजूने तालिबानविरोधात लढतोय. त्याला दुखवू शकत नाही आपण. " जॉन म्हणाला.
" पण सर.." जोसेफ म्हणाला.
" बच्चाबाजी प्रथा अफगाणिस्तानच्या संस्कृतीचा भाग आहे. आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. आपण इथे समाज सुधारणा करायला आलो नाही. त्यामुळे लगेच त्या मुलाला उस्मानच्या ताब्यात दे. " जॉन म्हणाला.
" तालिबान या प्रथेच्या विरोधात आहे. मग तर सर्वसामान्य जनता तालिबानच्या पाठीमागे उभे राहील. आपलेच नुकसान होणार अश्याने. आपण अफगाणिस्तानमध्ये चांगले , मानवतावादी सरकार प्रस्थापित करण्यासाठी आलो आहोत. आपण अमानुष कृत्य घडत असताना डोळे बंद करून दुर्लक्ष कसे करू शकतो ?" जोसेफ म्हणाला.
" जास्त डोके नको लढवू. कधी कधी एका मोठ्या वाईटाला मिटवण्यासाठी छोट्या वाईटाशी हातमिळवणी करावी लागते. तालिबानाला आपणच जन्माला घातले. पण ते डोक्यावर जाताय म्हणून आता त्यांना संपवायचे आहे. उद्या अफगाणिस्तानवर राज्य करणारे आपल्या हिशोबाने वागायला नकार देत असतील तर परत सत्तापालट करायचं. जगाला ओरडून ओरडून सांगायचे की आपला हेतू लोकशाही वाचवण्याचा आहे. यालाच राजकारण म्हणतात. " जॉन म्हणाला.
" सर मी प्रोसेस पूर्ण करून उद्या सोहेलला सुपूर्द करतो." जोसेफ म्हणाला.
जॉन हसला.
" काय झाले ? अस वाटत आहे की तुला पण या सोहेलला उपभोगायचे आहे. " जॉन म्हणाला.
जोसेफला प्रचंड राग आला.
" सर , मी एका लहान मुलाला अंगाखाली घेईल?"
जोसेफ म्हणाला.
जोसेफ म्हणाला.
" का नाही ? अमेरिकेत कितीतरी श्रीमंत उद्योगपती लहान मुलांसोबत झोपतात. तू मायभूमीपासून दूर आहेस. लैगिक भूक सर्वांनाच असते. कदाचित म्हणून तुला सोहेलचा मोह जडला असावा. जगातले बहुतांश पुरुष वासनेची गुलाम असतात. ही अफगाण लोक अश्या लहान मुलांना विकत घेऊन मिरवतात. लाजत नाहीत. उघडपणे उपभोगतात. ज्याच्याकडे जितकी जास्त लहान मुले तो समाजात जास्त ताकदवान मानला जातो. पाश्चात्य श्रीमंत उद्योगपती जगासमोर सुसंस्कृत असल्याचे दाखवतात आणि पार्ट्यांमध्ये काळे धंदे करतात. तू अमेरिकन नसता तर उस्मानने तुला स्वर्गात पोहोचवले असते. पाण्यात राहून मगरीशी वैर नाही घेत. असो. मी येतो." जॉन म्हणाला.
जॉन निघून जातात उस्मान तिथे आला.
" वरिष्ठाकडून शिव्या खाऊन तुझे डोके ठिकाणावर आले असेलच. पुन्हा माझ्या वाटेला येऊ नकोस."
" किती पैसे पाहिजे आहेत ? मी विकत घेईल सोहेलला." जोसेफ म्हणाला.
उस्मान हसला.
" हीच चूक करतात तुम्ही भांडवलशाही राष्ट्रे. तुम्ही सर्व वस्तूंची किंमत मोजायची सवय असते. पण आम्ही अफगाणिस्तानात राहणारी , कबिल्यात वावरणारी लोक आहोत. खजूर देऊन अफू घेतो. पैसे वगैरे नसतात आमच्याकडे. काही गोष्टी सामर्थ्याच्या प्रतीक असतात. जस तुम्ही अमेरिकेत महागड्या प्रजातीचे कुत्रे विकत घेऊन मिरवतात तस सोहेल माझा कुत्रा आहे. त्याला समाजात मिरवणार आहे. "
इतके बोलून उस्मान तिथून निघून गेला.
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा