Login

खरा गुन्हेगार ! पार्ट 4 अंतिम भाग

.
जलद लेखन फेब्रुवारी2026
स्पर्धा

दुसऱ्या दिवशी जोसेफने सोहेलला परत उस्मानकडे सोपवले. रात्र झाली. उस्मान तंबूत घुसला. मोठा विजय मिळवल्याचा आनंद त्याच्या मुखावर होता. उस्मान सोहेलच्या जवळ जाणार इतक्यात गोळी चालवल्याचा आवाज आला. उस्मानच्या पाठीवर कुणीतरी दहा-बारा गोळ्या झाडल्या होत्या. सोहेल उठला. तो जोसेफच होता. जोसेफने सोहेलचा हात पकडून दुसऱ्या ठिकाणी नेले आणि जाताना तंबूला आग लावली. तालिबानी लोकांनी अचानक हल्ला केल्यामुळे उस्मानचा मृत्यू झाला अशी अफवा जोसेफने पसरवली.

***

सकाळचा प्रहर होता. जोसेफ आणि सोहेल एका ट्रकजवळ उभे होते.

" सोहेल, हा ट्रकवाला तुला तुझ्या घरी पोहोचवेल. झाल्या गोष्टी विसरून जा. एखादं वाईट स्वप्न समजून."
जोसेफ म्हणाला.

सोहेल जोसेफला बिलगला. रडू लागला.

" तुमचे आभार कोणत्या शब्दात मांडू कळत नाही. " सोहेल म्हणाला.

" अरे रडू नको. स्वतःची काळजी घे. तुला एक गोष्ट सांगू. माझ्यासोबतही असे घडले आहे लहानपणी. काही प्रौढ लोकांनी माझ्यासोबत घाण चाळे केले होते. " जोसेफ म्हणाला.

" मग तुम्ही काय केले ?" सोहेल म्हणाला.

" मी स्वतःला स्ट्रॉंग बनवलं. आर्मीत जॉईन झालो. तसच तू पण सगळं विसरून स्वतःला स्ट्रॉंग बनव." जोसेफ म्हणाला.

सोहेलने होकारार्थी मान हलवली. सोहेल आणि जोसेफने एकमेकांना मिठी मारली. सोहेल निघून जाताच जोसेफला त्याच्या खांद्यावर कुणाचा तरी हात जाणवला. वळून पाहताच तो जॉनचा हात होता. जॉनला पाहून जोसेफने त्याला मिठी मारली आणि तो रडू लागला.

" तुम्हाला माहिती आहे का लहानपणी माझ्या सावत्र बापाने मला एका श्रीमंत उद्योगपतीच्या बेडरूममध्ये पाठवलं होते. त्या श्रीमंत उद्योगपतीने माझे बालपण नासवून टाकले." जोसेफ म्हणाला.

" तुझे आईवडील?" जॉन म्हणाला.

" दोघांचा घटस्फोट झालेला. दोघांनाही माझ्यासाठी वेळ नव्हता. सावत्र बापाला एक बिजनेस डील हवी होती. त्यासाठी त्याने माझा वापर केला. वर मला घाबरवले. म्हणून मी कुणाला सांगितले नाही. सोहेलच्या रूपाने माझा भुतकाळच माझ्या समोर आलाय असे वाटले. ज्या वाईट आठवणी विसरण्यासाठी मी आर्मी जॉईन केली त्याच वाईट आठवणी पुन्हा डोक्यात शिरू लागल्या. जुन्या खपल्या निघू लागल्या." जोसेफ म्हणाला.

" मी हे रहस्य रहस्यच ठेवणार. तुझ्यावर कसलीच कारवाई होणार नाही. पण असे किती सोहेलला वाचवणार आहेस ?" जॉन म्हणाला.

" माहिती नाही. पण शक्य तितक्या सोहेलला वाचवणार आहे. माणुसकीवरचा विश्वास उडाला नाही पाहिजे."
जोसेफ म्हणाला.

***

सोहेल घरी परतला. त्याच्या आजीला बिलगला. आजी त्याला पाहून आनंदाश्रू वाहू लागली.

" आजी , एका फरीशत्याने वाचवले मला. पण गुलाम असूनही पळून आलोय मी. गुन्हेगार ठरलोय आजी मी." सोहेल म्हणाला.

" तू गुन्हेगार नाही. स्वार्थापोटी इतर देशांवर युद्ध लादनारा आणि वासनेपोटी निरागस मुलांचे आयुष्य उध्वस्त करणारा नैतिक अधःपतन झालेला समाज आणि त्यात राहणारे नराधमच खरे गुन्हेगार !" आजी म्हणाली.

©® पार्थ धवन
0

🎭 Series Post

View all