विदिशा सकाळीच निघण्याचा विचार करतच लवकर तयार झाली पण दिव्याचा नवरा म्हणजेच ऋग्वेदने तिला दुपारी जा म्हणून गळ घातली आणि ती ऋग्वेदला नाही म्हणू शकली नाही.ती आणि दिव्या सानिकाला घेऊन दुपारी दोनच्या ट्रॅव्हल्सने निघणार होत्या.दिव्या मात्र विदिशाशी जास्त बोलत नव्हती कारण तिचा निर्णय तिला पटलेला नव्हता. विदिशा ही गप्प गप्प असते.
इकडे विद्युत मात्र अस्वस्थ होता.त्याने दहाच्या दरम्यान ऑफिसला जायच्या आधी दिव्याला फोन केला.
विद्युत,“ दिव्या तुला विदिशा तिच्या निर्णया बाबत काही बोलली का?” त्याने विचारले.
दिव्या,“ विद्युत तिचा निर्णय झाला आहे.ती नाही म्हणतेय तुझ्याशी लग्नाला!मी खूप प्रयत्न केले पण नाही समजवू शकले तिला सॉरी! ती गावी निघाली आहे आज दुपारी!” तिने येव्हडे बोलून फोन ठेवला आणि विद्युतच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली आणि तो तिथेच जमिनीवर कोसळला.
थोड्या वेळाने विद्युतची आई तो अजून का रूम मधून बाहेर आला नाही हे पाहायला रूममध्ये गेली तर विद्युत त्यांना जमिनीवर निपचीत पडलेला दिसला. त्या घाबरून त्याच्या जवळ गेल्या आणि त्याच्या बाबांना ओरडून बोलावले. त्यांनी विद्युतला हात लावला तर त्याचे अंग तापलेले होते.त्याचे बाबा अँब्युलन्स बोलवून विद्युतला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.सुयशने विद्युतला तो अजून ऑफिसला कसा आला नाही म्हणून फोन केला.
सुयश,“ हॅलो विद्या कुठे आहेस अरे आज ऑफिसला यायचं नाही का तुला?
फोन त्याच्या बाबांनी उचलला ते बोलू लागले.
बाबा,“ अरे सुयश मी विद्युतचा बाबा बोलतोय. आम्ही विद्युतला हॉस्पिटलमध्ये आणले आहे. तो आज अचानक बेशुद्ध पडला आहे.त्याला ताप ही खूप आहे!” ते काळजीने म्हणाले.
सुयश,“ काय?कसा आहे तो मग आता त्याला शुद्ध आली की नाही अजून? डॉक्टर काय म्हणतायत?कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही? मी येतो!” त्याने काळजीने विचारले.
बाबा,“ डॉक्टर अजून चेकअप करत आहेत त्याचे काहीच सांगितले नाही अजून तरी! आम्ही लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये आहोत!” ते म्हणाले.
हे सगळं होई पर्यंत दुपारचा एक वाजून गेला होता. विदिशा आणि दिव्या बस स्टॉपवर पोहोचण्याची तयारी करत होत्या.ऋग्वेद त्या तिघींना ही सोडायला बस स्टॉपवर गेला. तो पर्यंत दीड वाजून गेलेले होते.त्या तिघी बस मध्ये बसल्या.
इकडे हॉस्पिटलमध्ये विद्युत काही केल्या बराच वेळ झाला तरी शुद्धीवर येत नव्हता. त्यामुळे सगळे चिंतीत होते.एव्हाना सुयश ही हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. डॉक्टरांचे म्हणणे होते की विद्युतने कोणत्या तरी गोष्टीचा खूप ट्रेस घेतला आहे त्यामुळे तो बेशुद्ध आहे आणि ताप ही खूप आहे. विद्युतच्या आई-बाबांना काहीच माहीत नव्हते म्हणून मग त्यांनी सुयश विचारले की नेमकं काय घडले आहे आणि विद्युतला कशाचा इतका ट्रेस आला आहे. सुयशने नवरात्रीच्या पहिल्या रात्री पासून काल पर्यंत काय-काय घडले ते सगळे सांगितले. विद्युतची आई काही तरी विचार करून सुयशला म्हणाल्या.
आई,“ एक काम कर सुयश तू तिच्या बहिणीला फोन करून विद्युत हॉस्पिटलमध्ये आहे ते सांग!कदाचित विदिशा येईल आणि माझा विद्यु उठेल!” त्या म्हणाल्या.
सुयशने दिव्याला फोन केला.
सुयश,“ दिव्या! विद्युत हॉस्पिटलमध्ये आहे.काही केल्या तो शुद्धीवर येत नाही तू विदिशाला घेऊन लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये ये! कदाचित तो विदिशाचा आवाज ऐकून उठेल! त्याची खूप काळजी वाटत आहे ग आम्हाला!” तो म्हणाला.
दिव्या,“ काय?कधी आणि विद्युत बरा आहे ना?हो मी पोहचते!” दिव्याच्या तोंडून विद्युतच नाव ऐकून विदिशाने काळजीने तिला विचारले.
विदिशा,“ कोणाचा फोन होता दिव्या काय झालंय विद्युतला?” ती रडतच म्हणाली.
दिव्या,“ विद्युत हॉस्पिटलमध्ये आहे तो बरेच तास झाले बेशुद्ध आहे.काही केल्या तो उठत नाही आहे विदी!आपल्याला जायला हवं!” ती काळजीने म्हणाली आणि सामान घेऊन तिघी टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये पोहचल्या.
विदिशाने विद्युतच्या रूममध्ये पाय ठेवला आणि विद्युतच्या आई ज्या विद्युतच्या बेड जवळ बसलेल्या होत्या त्यांना विद्युतने डोळे उघडलेले दिसले . त्या मागे वळून त्याच्या बाबांना डॉक्टरांना बोलवायला हाक मारणार तर त्यांना विदिशा दारात उभी दिसली.विदिशा विद्युतच्या आईला पाहून घाबरली होती. त्या तिच्या जवळ गेल्या आणि तिला म्हणाल्या तू विद्युत जवळ बस मी डॉक्टरांना बोलवून आणते. विदिशा त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात धरून बसली. विद्युत मात्र अजून अर्धवट ग्लानीत होता.तो पर्यंत डॉक्टरने येऊन विद्युतला तपासले आणि तो ठीक असल्याचे पण तो अजून ही अर्धवट ग्लानीत आहे संध्याकाळ पर्यंत तो पूर्ण शुद्धीत येईल असे सांगून ते निघून गेले. विद्युत संध्याकाळी सहाच्या दरम्यान डोळे उघडून तो कोठे आहे याचा अंदाज घेत होता तर समोर त्याला त्याचे आई-बाबा आणि विदिशा-सुयश दिसले. विद्युतच्या आई त्याला जवळ बसून बोलू लागल्या.
आई,“ कसं वाटतंय विद्यु तुला?” त्यांना काळजीने हात धरून विचारले
विद्युत,“ मी बरा आहे पण मी इथे कसा?” तो आश्चर्याने विचारले.
बाबा,“ हे बघ विदू तू जास्त विचार नको करुस या गोष्टींचा!तुला चक्कर आली म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो!”ते काळजीने म्हणाले.
विद्युत,“ हुंम”तो म्हणाला.
सुयश,“ किती घाबरावलस रे आम्हा सगळ्यांना!” तो म्हणला.
विद्युत,“ सॉरी रे! खरंच मला पण नाही कळले काय झाले ते!” असं म्हणत त्याची नजर विदिशा वर स्थिरावली.ती खाली मान घालून उभी होती. ते पाहून सगळे विदिशाला तिथेच सोडून निघून गेले.
विदिशा तशीच उभी होती.ती काहीच बोलत नाही हे पाहून विद्युतनेच बोलायला सुरुवात केली.
विद्युत,“ तू तर गावी जाणार होतीस मग इथे कशी? मी आता बरा आहे तू जावू शकतेस!” तो तिला रोखून पाहत थोडा रागानेच म्हणाला.
विदिशाने मात्र हे ऐकून विद्युतला मिठी मारली आणि रडायला लागली.
विदिशा,“ I am sorry! माझ्या मुळे तुला त्रास झाला खरं तर मी पुण्यात येऊनच चूक केली. मी आलेच नसते तर इतकं सगळं झालंच नसत!” ती रडत बोलत होती.
विद्युत,“ तू आली नसतीस पुण्यात तर मग मला कशी भेटली असतीस ग? आणि आता अशी मला बिलगली नासतीस ना!”तो हसून म्हणाला
विदिशा,“ गप्प बस अजून ही तुला ताप आहे बघ!” ती डोळे पुसत त्याला म्हणाली.
विद्युत,“ मग काय निर्णय बदलला म्हणून इथे आलीस की मी आजारी आहे म्हणून पाहायला आलीस नुसतीच मला?” तो तिला पाहत म्हणाला.
विदिशा,“ हे मुद्दाम विचारतोस का मला? पाहायला आले असते नुसते तर तुझ्या मिठीत असते का? मला कळून चुकलंय की मी ही नाही राहू शकणार तुझ्या शिवाय I love you!” असं म्हणून ती त्याला अजूनच बिलगली.
विद्युत,“ हा साक्षात्कार लवकर झाला की तुला! नाही तर मला वाटलं मी बिन लग्नाचाच मरतो की काय?” तो हसून म्हणाला.
विदिशा,“ उगीच काही तरी बोलू नकोस मूर्खांसारखे!” ती रागाने त्याला म्हणाली.
विद्युत,“ आणि तू मुर्खा सारखे वागत होती त्याच काय?” तो तोंड फुगवून म्हणाला.
विदिशा,“ मी सॉरी म्हणतेय ना! आता बोलशील का मला जे ऐकायचे आहे ते?” ती त्याच्या कानात हळूच म्हणाली.
विद्युत,“ काय ऐकायचे आहे तुला?” तो नाटकीपणे म्हणाला.
विदिशा,“ ठीक आहे तुला नाही कळलं ना! ” ती स्वतःला सोडवून घेत लटक्या रागाने म्हणाली.
विद्युत,“ अग थांब तरी (असं म्हणून तिला हाताने जवळ ओढत तो) love you!” विद्युत तिला पुन्हा मिठीत घेत तिच्या कानात म्हणाला.
विदिशा,“ हुंम! सगळं खरं आहे विद्युत पण तुझे आई-बाबा तयार होतील का?” ती म्हणाली आणि मागून विद्युत चे आई-बाबा आणि दिव्या आले ते पाहून विदिशा स्वतःला विद्युत पासून सोडवून घेत लाजून उभी राहिली ते पाहून तिघे ही हसले आणि विद्युतच्या आई विदिशाचा हात हातात घेऊन बोलू लागल्या.
आई,“ सुयश आणि दिव्याकडून सगळं कळले आहे आम्हाला विदिशा! पण आम्ही असलं काही मनात नाही आणि मानत असतो तरी तुझ्या इतकी शुभ शकुनी मुलगी माझ्या विद्युसाठी दुसरी कोणीच नाही कारण तू या रूममध्ये पाय ठेवलास आणि माझा विद्यु शुद्धीवर आला! विद्यु सून पसंत आहे हो आम्हाला!” त्या असं म्हणाल्या आणि विदिशाने त्यांना लाजून मिठी मारली.
★★★★★
पाच वर्षांनंतर…
विद्युत,“ विदिsss इकडे येणा जरा!” तो हाक मारत होता.
विदिशा,“ काय रे तुझे? विहानच आत्ताच आवरलं आहे! आई-बाबा तयार आहेत दिव्याचा आणि हो सुयशचा ही फोन येऊन गेला कधी निघायचं म्हणून आणि तुझं अजून काय चालले आहे उद्घाटन कोणाच्या ऑफिसच आहे रे?तुझ अजून आवरलं नाही!तुला टाय पण बांधता येत नाही का रे!” त्याच्यावर वैतागून ती बोलत त्याच्या जवळ जावून टाय व्यवस्थित बांधत म्हणाली.
विद्युत,“ सकाळी मी उठायच्या आधी गेलीस ती फिरकली नाहीस परत आईला पाठवलस मुद्दाम मला उठवायला!” तो तिच्या कमरेत हात घालून तिला आणखीन जवळ ओढत म्हणाला.
विदिशा,“ झाला तुझा रोमँटिक मोड ऑन! तुझ्यामुळे उशीर होणार बघ!” ती त्याच्या गळ्या भोवती हात गुंफत म्हणाली.
विद्युत,“ इतकी सुंदर बायको आणि त्यात या ब्रावनीश साडीत कातिल दिसत असताना कोण मूर्ख रोमान्सचा चान्स सोडेल!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
विदिशा,“ अच्छा आणि माझा नवरा जो इतका हँडसम दिसतोय त्याच काय?” ती खट्याळपणे म्हणाली आणि विद्युतने तिच्या ओठांचा ताबा घेतला. ती ही त्याच्या बाहूपाशात विरघळत होती पण थोड्याच वेळात भानावर येत त्याच्या पासून दूर झाली.
विद्युत,“ अजून थोडावेळ थांब ना!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.
विदिशा,“ नाही आता चल बरं लवकर! उद्घाटन वेळेवर व्हायला हवे ना! राहिलेला रोमान्स रात्री!” ती त्याचा हात धरून त्याला रूम बाहेर नेत म्हणाली.
विद्युत,“ तू ना नेहमी असच करतेच! तुला ना माझी कदर नाही राहिली आता!”तो तोंड फुगवून हात सोडवून घेत म्हणाला.
विदिशा,“ अच्छा! अजून काय? नाही म्हणजे तुझ्या एका हाकेवर पळत आले मी विहानला आईकडे सोडून मला माहित होते की तुला काय हवं ते तरी आलेच ना मी इतक्या गडबडीत तुला हवं ते दिल तरी तू ना!” ती लटक्या रागाने म्हणाली.
विद्युत,“हाय तेरी इसी अदा पे तो हम फिदा है! तुला माहीत असत मला काय हवं ते!love you!पण वसूल करणार आ सगळं चल आता!” तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत म्हणाला.
विदिशा,“ तू ना एका मुलाचा बाप झाला तरी तुझ्यातले लहान मूल काही जात नाही!चला बाहेर वाट पाहत आहेत आई-बाबा आणि विहान तर तुझ्या वर चढ झालाय त्रास द्यायला!” अस म्हणून ती हसून त्याला बेडरूममधुन बाहेर घेऊन गेली.
सगळे नवीन ऑफिसमध्ये पोहोचले . ठरल्या प्रमाणे उद्घाटन झाले. त्यानंतर दुपारची जेवण बाहेरच झाली. रात्री पुन्हा नवीन ऑफीसच्या उद्घाटना निमित्त पार्टी होती. म्हणून सगळे हॉटेलवर गेले.विदिशाचे आई-वडील आणि काकू-काका म्हणजेच दिव्याचे आई-वडील ही आले होते.विदिशा आईला बोलली काका-काकूंची विचारपूस केली पण तिने तिच्या बाबांशी बोलणे पहिल्या लग्नापासून टाकले होते ती आज तागायत त्यांच्याशी बोलली नव्हती.विद्युत आणि दिव्याने तिला खूप समजावले तरी तिने दोघांचे ही ऐकले नव्हते. तिच्या मनात तिच्या बाबां विषयी अढी बसली होती ती कायमचीच कारण विद्युत बरोबरच्या तिच्या प्रेमाला विरोध असणे ती समजू शकत होती पण तिच्या मनाचा जरा ही विचार न करता एका अनोळखी माणसाशी जबरदस्तीने लग्न लावून देणे.हे मात्र तिच्या सहन शक्ती पलीकडचे होते.ज्या लग्नातुन तिला फक्त दुःखच मिळाले होते.विद्युतने पुन्हा मागणी घातल्यावर मात्र त्यांना विरोध करायला तोंड नव्हते म्हणून त्यांनी लग्नाला परवानगी दिली असा तिचा समज झाला होता.
पण विदिशाचे आई-बाबा लेकीचे सुख पाहून सुखावले होते.त्यात विद्युतच्या आई विदिशाच कौतुक करून करून थकत नव्हत्या.त्या सारख म्हणत होत्या.
आई,“ माझी सून खूप शुभ शकुनाची आहे.ती विद्युतच्या आयुष्य आली आणि आमची भरभराट झाली”
त्यामुळे विद्युत ही बराच सुखावला होता कारण विदिशाला मागच्या आयुष्यत मिळालेल्या डागण्या आणि त्यामुळे तिचे झालेले खच्ची करण कुठे तरी भरून निघत होते आणि दुसरी गोष्ट विदिशा त्याच्यासाठी खरच लकी ठरली होती. विदिशा त्याच्या आयुष्यात आल्या पासून त्याने खूप प्रगती केली होती आणि नोकरी सोडून भाड्याच्या ऑफिस मध्ये सुरू केलेला बिझनेस आता स्वतःच्या ऑफिसमध्ये सुरू झाला होता. पूर्ण पार्टी भर विद्युतची नजर विदिशा वरून हटली नव्हती आणि दिव्याने मात्र विदिशाला चिडवून हैराण केले होते.खरं तर ती मनातून सुखावली होती पण वरून तसे दाखवत नव्हती कारण दिव्याला आणखीन चेव चढला असता.
पार्टी संपली आणि सगळे घरी गेले. विद्युत आणि विदिशा आई-बाबा ही घरी पोहोचले. सगळेच थकले होते.रात्रीचे नऊ वाजले होते.सगळे सरळ आप आपल्या रूममध्ये निघून गेले.विहान तर केव्हांच झोपला होता.विदिशा त्याला घेऊन रूममध्ये जाणार तर विद्युतच्या आईने त्याला आपल्या रूममध्ये नेले. विद्युत आधीच रूममध्ये गेला होता आणि विदिशा जशी रूममध्ये गेली तसे त्याने दार लावून घेतले आणि तिला मागून मिठी मारली.
विदिशा,“ काय हे विद्युत मला वाटलं झोपला असशील तू? तुला थकवा आला नाही का?” तिने त्याच्या मिठीत विसावत विचारले.
विद्युत,“ नाही आला. आज इतकी किलर दिसत होतीस मग मला झोप येईल का?” तो हसून म्हणाला.
विदिशा,“ तुला ना काही कळत नाही बघ विद्युत! माणसात ही किती पाहत होतास माझ्याकडे दिव्याने किती चिडवले आहे मला त्यावरून!” ती लटक्या रागाने म्हणाली.
विद्युत,“ म्हणजे तुला माझे बघणे आणि तिचे चिडवणे ही आवडले नाही तर?” तो तिच्या डोळ्यात पाहत तोंड फुगवून म्हणाला.
विदिशा,“ नाही तसं नाही मला खूप आवडले तुझं पाहणं आणि तीच तुच्यावरून मला चिडवन ही!” ती लाजून त्याच्या पासून नजर चोरत म्हणाली.
विद्युत,“ हुंम!लाजतेस काय ग?” तो तिचा चेहरा हनुवटीला धरून वर करत म्हणाला.
विदिशा,“ बास झाले आता मी चेंज तरी करून येते जरा थांब की लग्न होऊन पाच वर्षे झाली पण तुझी अधीरता मात्र संपत नाही बघ!” ती स्वतःला सोडवून घेत म्हणाली.
विद्युत,“ बरं जा!” तो हसून म्हणाला.
विदिशा व्हॉश रूम मधून येऊ पर्यंत विद्युतने दोन कप कडक कॉफी करून आणली.ते पाहून विदिशा म्हणाला.
विदिशा,“ याचीच तर गरज होती मला खूप! Thanks dear!” ती कॉफी मग त्याच्या कडून घेत म्हणाली.
विद्युत,“ माहीत होतं मला म्हणूनच आणली बनवून! कशी झाली सांग!” तो म्हणाला.
विदिशा,“ एकदम मस्तच!” ती कॉपीचा एक सीप घेत बेडवर बसत म्हणाली.
विद्युत,“ पण खरंच विदी आई म्हणाली ते बरोबर आहे ग! तू माझ्या आयुष्यात आली आणि माझी भरभराट झाली.खरच तू माझ्यासाठी लकी ठरलीस आई काय म्हणते बरं शुभ शकुनाची!” तो कौतुक करत तिच्या जवळ बसत म्हणाला.
विदिशा,“असं काही नाही रे!तू खूप मेहनत केलीस की या पाच वर्षात त्याचे फळ आहे ते! आणि thanks for being my life! You given me everything! ज्या सुखाची अशाच मी सोडली होती ते सगळं तू दिलं मला! Thanks and I love you!”ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलत होती.
विद्युत,“झालं तुझं आभार प्रदर्शन करून नाही तर आपण उद्या आभार प्रदर्शन समारंभ करूया का?” तो कॉफी मग तिच्या हातातून घेऊन चीडून मग टेबलवर ठेवत म्हणाला.
विदिशा,“ बरं! नाही म्हणत thanks सॉरी ना!” ती कान धरून म्हणाली.
विद्युत,“ मला खूप झोप येतेय मी झोपतो आता!” तो म्हणाला आणि त्याच्या जागेवर जाऊन झोपू लागला.
विदिशा,“ नाय म्हणजे कॉपी घेतल्यावर तुला झोप येणार आहे?ऐक ना!”असं म्हणून ती त्याला बिलगली.
विद्युत,“ काय अजून राहील आहे का बोलायचं?” तो तोंड फुगवून म्हणाला.
विदिशा,“ हो राहील आहे ना हेच की I love you! माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे!” ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली आणि त्याच्या ओठांवर ओठ ठेवले. विद्युत मात्र तिच्या या बोलण्याने आणि कृतीने पाघळला आणि अलगद तिला मिठीत घेतले.
खरं तर मुलीच लग्न झालं की मुलीला आणि तिच्या आई वडिलांना ही कुठे तरी धास्ती असते की सासरी काही वाईट घटना घडू नये आणि समजा नवीन लग्न झाले असले आणि काही वाईट घटना घडली तर त्याचा दोष मात्र नवीन सुनेला दिला जातो. इथे तर विदिशाचा नवराच लग्न होऊन अवघ्या तीन महिन्यात गेला आणि तिला तिचा काही दोष नसताना अपशकुनी ठरवून तिच्या सासरचे लोक रिकामे झाले.पण खरंच असं काही असत तर तिच्या बरोबर लग्न केल्या नंतर विद्युतची भरभराट झाली असती का?
म्हणजेच शकुन अपशकुन हे सगळे भ्रम आहेत.सगळ्या अंधश्रद्धा आहेत. मुळात लग्न झाल्या नंतर आयुष्यात एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याला नववधू कशी काय जबाबदार असू शकते हे लॉजिक मात्र मला तरी कळल नाही
या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.
© स्वामिनी(अस्मिता) चौगुले.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा