Login

खिशी रेसिपी इन मराठी

ज्वारी पिठाची खिशी
बऱ्याचदा नेहमीचे तेच तेच पदार्थ करून बोर होतात . तेव्हा झटपट बनणारा पदार्थ आणि पोट भरणारा पदार्थ हवा असतो. असाच एक छान पदार्थ बघूया .

ज्वारी पिठाची खिशी

ज्वारी निवडून , धुवून तीन दिवस भिजवून ठेवावी .
चौथ्या दिवशी ज्वारी धुवून वाळवून घ्यावी .
ज्वारी चे पीठ बनवून घ्यावे .

साहित्य : ज्वारी पीठ , तेल ,मीठ ,कोरडी चटणी ,तीळ

कृती :-

कढई मध्ये दोन वाटी आणि थोडे जास्त पाणी मीठ घालून उकळून घ्यावे .
दोन वाटी पीठ घालून वरून एक सेंकंद झाकण ठेवावे. नंतर पीठाला व्यवस्थित गाठी न ठेवता हालवावे .
दोन वेळा वाफ हालवून वाफवून घ्यावे .

झाली छान खिशी तयार .

गरम गरम खिशी वर तेल आणि थोडी कोरडी चटणी , तीळ घ्यावी .