खोली क्रमांक ३०७... भाग - १
पावसाची तीव्र सर मुंबईच्या रस्त्यांना भिजवत होती. रात्रीचे बारा वाजून गेले होते. रिया हातात छत्री धरून हॉस्टेलकडे चालली होती. तिच्या कॉलेजमध्ये आज वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता, म्हणून उशीर झाला होता.
हॉस्टेलजवळच्या झाडाखाली उभा असलेला तो माणूस तिला दिसला. काळा रेनकोट, चेहऱ्यावर हुडी, आणि पांढरे हातमोजे. तो जमिनीवर काहीतरी शोधत होता की…?
हॉस्टेलजवळच्या झाडाखाली उभा असलेला तो माणूस तिला दिसला. काळा रेनकोट, चेहऱ्यावर हुडी, आणि पांढरे हातमोजे. तो जमिनीवर काहीतरी शोधत होता की…?
रिया थोडी घाबरली. पाऊस जोरात कोसळत होता. पण तिला हॉस्टेल अगदी काही पावलावर होते. तिने नजरेला नजर न देता लवकर पुढे जायचं, असं ठरवलं.
पण ती पुढे गेली तितक्यात मागून आवाज आला,
“थांबा… काहीतरी पडलंय तुमचं.”
पण ती पुढे गेली तितक्यात मागून आवाज आला,
“थांबा… काहीतरी पडलंय तुमचं.”
रिया दचकून मागे वळली. पण तिथे कोणी नव्हतं. झाडाखालील जागा रिकामी होती. तिने पुन्हा सभोवताल पाहिलं, कुणीच नाही.
"मी स्वप्न पाहतेय का…?" ती स्वतःशी पुटपुटली.
ती हॉस्टेलमध्ये शिरली. गार्ड खुर्चीवर झोपलेला. रियाने घंटी दिली पण तो उठलाच नाही. शेवटी तिने दरवाजा हळूच ढकलला, आणि आत गेली.
हॉस्टेल पूर्ण शांत होतं. तिसऱ्या मजल्यावर तिची रूम, खोली क्रमांक 307.
हॉस्टेल पूर्ण शांत होतं. तिसऱ्या मजल्यावर तिची रूम, खोली क्रमांक 307.
ती जिना चढत होती. प्रत्येक पायरीवर पाणी टप… टप…. पडत होतं. तिने विचार केला, “इतकं पाणी कुठून येत असेल? कोणी भिजून वर गेलंय का?”
वर पोहोचल्यावर तिला दालनात कोणीतरी चालल्यासारखं ऐकू आलं. पण दालन पूर्ण रिकामं होतं. पावसाचा आवाजही आत येत नव्हता.
रिया तिच्या रूमच्या दाराशी आली. तिने किल्ली काढताच, आतून आवाज आला, “कोण आहे…?”
रिया थांबली. हा आवाज तिच्या रूममेट मितालीचा असावा, असा तिचा अंदाज होता. पण त्याच क्षणी तिला आठवलं, मिताली तर तिच्या घरी गेली होती! रूममध्ये कोणीच नसावं. तरीही तिने धीर करून दार उघडलं.
पूर्णपणे अंधार होता. फक्त खिडकीतून पडणारा विजेचा प्रकाश आणि पावसाचा आवाज.
तिने मोबाईलचा फ्लॅशलाइट लावला. खोली रिकामीच होती. मग ते "कोण आहे" कोण म्हणालं…? तिच्या अंगावर शहारे आले.
रिया थकली होती. तिने ओले कपडे बदलले, केस पुसले. पण मन शांत होत नव्हतं. सतत तिला वाटत होतं की काही तरी आहे… कुठेतरी.
ती झोपायला गेली तितक्यात तिची नजर टेबलावर गेली.
तिथं एक पांढरा लिफाफा ठेवला होता, ओला.
तिथं एक पांढरा लिफाफा ठेवला होता, ओला.
कोणी दिला असेल हा? आणि ओला कसा…? तिने हळूच उचलला. लिफाफा थंड होता. आत फक्त एक छोटी चिठ्ठी होती, “खोली क्रमांक 307 सुरक्षित नाही.”
रिया थिजल्यासारखी झाली. कोणी लिहीला असा संदेश? का लिहीला?
ती हॉलमध्ये गेली आणि प्रत्येक कोपरा तपासला. काहीच विचित्र नव्हतं. तिला स्वतःलाच वाटलं की कदाचित कुणी विनोद केला असेल. पण खरा खेळ आता सुरू होणार होता.
रात्री अंदाजे तीनच्या सुमारास अचानक “ठक… ठक… ठक…” असं भिंतीतून वाजू लागलं. रिया दचकून जागी झाली.
ते ठकठक स्पष्टपणे तिच्या बेडच्या शेजारच्या भिंतीतून येत होतं. ती रूममधून बाहेर पडली. दालनात शांतता होती. 306 आणि 308 च्या रूम बंद होत्या.
ती परत आली. आवाज आता थोडा मोठा झाला होता,
ठक… ठक… ठक…
ठक… ठक… ठक…
काही क्षणानंतर एक मंद आवाज, “मदत करा…”
रिया भयभीत झाली. “कोण आहे तिथं?!” तिने ओरडून विचारलं. आवाज आला नाही. ती रात्र कशीबशी उजाडली.
रिया भयभीत झाली. “कोण आहे तिथं?!” तिने ओरडून विचारलं. आवाज आला नाही. ती रात्र कशीबशी उजाडली.
सकाळी रियाने सुपरवायझरकडे जाऊन सांगितलं.
सुपरवायझर, मध्यमवयीन महिला, म्हणाली,
“खोली 307…? त्या खोलीबद्दल आधीही मुलींनी तक्रारी केल्या आहेत.”
सुपरवायझर, मध्यमवयीन महिला, म्हणाली,
“खोली 307…? त्या खोलीबद्दल आधीही मुलींनी तक्रारी केल्या आहेत.”
रियाने विचारलं, “का? काय होतं तिथं?” सुपरवायझर थोडा वेळ शांत राहिली.
“दोन वर्षांपूर्वी या खोलीत एक मुलगी होती, नेहा. ती अचानक गायब झाली. कुठे गेली, कशी गेली, आजतागायत माहिती नाही. त्या नंतर काही विचित्र गोष्टी ऐकायला येऊ लागल्या… पण आम्ही खोली बंदही करू शकत नव्हतो. जागा कमी आहे.”
रिया थिजली. मग मी ऐकलेला आवाज..?

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा