खोली क्रमांक ३०७... भाग - २
रिया जिद्दीची होती. तिने ठरवलं, रात्री घडणारं सगळं सत्य तिने शोधायचंच.
गार्डची मदत घेऊन तिने त्या रात्रीचं CCTV फुटेज पाहायला मागितलं. दालानातील कॅमेऱ्यात तिने शोधलं, ती हॉस्टेलमध्ये शिरली, आणि मग…
थांब! व्हिडिओमध्ये ती दिसत होती. पण तिच्या मागे…
काळा रेनकोट घातलेला तो माणूसही दिसत होता.
रिया हादरली. ती हॉस्टेलमध्ये शिरली पण तो आत आला नाही. दारावरच थांबला आणि परत फिरून अंधारात गायब झाला.
थांब! व्हिडिओमध्ये ती दिसत होती. पण तिच्या मागे…
काळा रेनकोट घातलेला तो माणूसही दिसत होता.
रिया हादरली. ती हॉस्टेलमध्ये शिरली पण तो आत आला नाही. दारावरच थांबला आणि परत फिरून अंधारात गायब झाला.
मग त्याने फक्त तिला आवाज दिला होता का? आणि त्याला कसं माहिती होतं तिचं काही पडलंय म्हणे?
रियाच्या मनात शंकेची बीज रुजली होती.
त्या रात्री पुन्हा भिंतीतून ठकठक असा आवाज येऊ लागला. रियाला या वेळी सहन होत नव्हतं. ती उठली, आणि भिंतीवर कान लावला.
रियाच्या मनात शंकेची बीज रुजली होती.
त्या रात्री पुन्हा भिंतीतून ठकठक असा आवाज येऊ लागला. रियाला या वेळी सहन होत नव्हतं. ती उठली, आणि भिंतीवर कान लावला.
अचानक हळू आवाज आला, “मी इथे आहे… मला बाहेर काढा…”
हा नेहाचा आवाज असू शकतो? की कोणी अडकलेलं आहे?
रियाने टॉर्च घेतली आणि भिंतीजवळ नीट तपासलं. भिंतीच्या खालच्या भागात अतिशय सूक्ष्म, जवळजवळ नजरेला न दिसणारी फट होती. तिच्या पोटात धस्स झालं.
तिने हळूच फट ढकलली. भिंतीमागे एक अरुंद मार्ग होता… तिथे पूर्णपणे अंधार होता. भिंत आतील बाजूने पोकळ होती! रिया आत शिरली. मोबाईलचा फ्लॅशलाइट चालू केला. मार्ग फक्त एका व्यक्तीने रांगत जाण्याएवढाच होता.
सुमारे दहा फुटांनी मार्ग संपला. तिने पाहिलं,एक छोटी खोली होती. भिंतीवर खुणा, जमिनीवर तुटलेली चुघळ, आणि कोपऱ्यात एक बारीक वही. पण तिथे कोणीच नव्हतं.
वहीत काही पृष्ठे फाटलेली. उरलेल्या पानांवर लिहिलं होतं,“मी इथे 15 दिवसांपासून आहे, 307 सुरक्षित नाही.”
त्या खाली शेवटची ओळ, “मला काढून नेलंय… तो येतो रात्री.” रिया थरथरत बाहेर आली.
दुसऱ्या दिवशी तिने सगळं सुपरवायझरला सांगितलं.
सुपरवायझर हादरली. पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लपवलेलं दिसत होतं.
सुपरवायझर हादरली. पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लपवलेलं दिसत होतं.
रिया म्हणाली,“मला माहिती आहे, तुम्हाला आधीपासूनच काही माहिती आहे!” शेवटी सुपरवायझरने मान खाली घातली.
“हो… नेहा गायब झाल्यानंतर आम्हाला तिथं एक गुप्त मार्ग सापडला. पण तो कोणी केला? कधी केला? कळलं नाही आणि आम्ही प्रशासनाला सांगितलं तर हॉस्टेल बंद करण्याची वेळ येईल म्हणून आम्ही… लपवलं.”
रिया रागाने म्हणाली,“मग ठकठक कसली ? आवाज कोणाचा?”
सुपरवायझर म्हणाली, “दोन वर्षांत तिथे कोणीच राहत नव्हतं. आवाज येतो… पण कुणीच नसतं.”
रिया गोंधळली. मग मी ऐकलेला आवाज? वहित लिहिलेलं? CCTV मधील तो माणूस?
त्या रात्री रियाने रूम बदलली. 307 बंद केली गेली.
पण..
पण..
दोन दिवसांनी रिया कॉलेजकडे जात होती.
तेव्हा अचानक तिला बसस्टॉपजवळ एक ओळखीचा आवाज ऐकू आला, “थांबा… काही पडलंय तुमचं.”
रिया दचकून मागे वळली. काळा रेनकोट, हुडी, पांढरे हातमोजे. तोच माणूस!
तेव्हा अचानक तिला बसस्टॉपजवळ एक ओळखीचा आवाज ऐकू आला, “थांबा… काही पडलंय तुमचं.”
रिया दचकून मागे वळली. काळा रेनकोट, हुडी, पांढरे हातमोजे. तोच माणूस!
पण या वेळी… त्याने हुडी खाली केली. रिया थिजली.
तो गार्ड होता, तोच गार्ड जो रोज रात्री झोपायचा आणि ज्याला काहीच आठवत नव्हतं.
गार्ड शांतपणे म्हणाला, “नेहाही असंच मागे वळली होती.”
रिया मागे हटू लागली. गार्डचा आवाज आता बदलला होता, गंभीर, ओलसर.
“खोली 307… अजूनही कोणाला तरी हवी आहे…”
रिया पळू लागली. पावसाचे थेंब धुक्यात मिसळत होते.
मागून गार्डचा आवाज येत होता, “आता तू ऐकशील ठकठक… तुझ्यासाठीही जागा आहे.”
मागून गार्डचा आवाज येत होता, “आता तू ऐकशील ठकठक… तुझ्यासाठीही जागा आहे.”
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा